गरोदरपणात बियर पिणे किती योग्य? बाळावर काय होतो परिणाम? स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण

अभिनेत्री अदिती सारंगधरने गरोदरपणात फक्त बियर आणि सॅलड खाल्लं. बाळावर या सगळ्याचा काय होतो परिणाम? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 13, 2024, 03:28 PM IST
गरोदरपणात बियर पिणे किती योग्य? बाळावर काय होतो परिणाम? स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण title=

अभिनेत्री अदिती सारंगधर कायमच आपल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. तिची खलनायिका आणि साधी सरळ भूमिका प्रेक्षकांना कायमच भावते. अशातच सध्या अदिती सारंगधरचे गरोदरपणातील बियर डोहाळे चर्चेचा विषय आहे. 

अदितीने 'आरपार' युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गरोदरपणात बियर पिण्याचे डोहाळे लागल्याचा अनुभव सांगितला. आपण गरोदरपणात कोणताही भारतीय पदार्थ खाल्ला नाही तर फक्त सॅलड आणि बियर प्यायल्याचं अदिती सांगते. तिच्या डॉक्टरांनी देखील तिला दोन सीप बियर पिण्याचा सल्ला दिला. नऊ महिने फक्त अदितीचा हा आहार होता. 

गरोदरपणातील डोहाळे 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aarpaar | आरपार (@aarpaar.online)

अदिती सांगते की, माझ्या गरोदरपणात सुरुवातीच्या दिवसांमध्ये माझ्यामध्ये खूप उत्साह होता. तेव्हा मला बियर प्यायचे डोहाळे लागले होते. या दिवसांत मी भारतीय फूड खाल्लंच नाही मग मी गरोदरपणात बियर प्यायला लागले.  मी सॅलड खायचे आणि बियर प्यायचे. बियर प्यायले नाही तर मला कसं तरी व्हायचं. मला राग यायचा. तेव्हा मी काय करु असा प्रश्न डॉक्टरांना विचारला. तेव्हा मला त्यांनी दोन-दोन सीप घेण्याचा सल्ला दिला. मग मी नऊ महिने बियर प्यायचे. भात आणि  फोडणी वैगरे आली ना त्यातली एक एक मोहरी अशी काढून बाजूला करायचे.घरभर मोहऱ्या पडलेल्या असायच्या. त्यामुळे मी इंडियन फूडच बंद केलं. मग मी नऊ महिने सॅलड आणि बियरच खाल्ल प्यायलं होतं. 

 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओनंतर अनेकांना प्रश्न पडला की, गरोदरपणात मद्यप्राशन करणे योग्य आहे का? गरोदरपणात मद्यप्राशन केल्यावर त्याचा गर्भावर काय परिणाम होतो, याबाबत स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. संगीता रावदेव यांनी सांगितलं खरं कारण. 

गरोदरपणात कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल टाळावे कारण त्याचा थेट परिणाम न जन्मलेल्या मुलावर होतो. अगदी नॉन-अल्कोहोलिक पेयांमध्येही काही प्रमाणात अल्कोहोलचे प्रमाण असते आणि म्हणूनच गर्भधारणेदरम्यान आणि गर्भधारणापूर्व काळात ते टाळणे आवश्यक आहे.

अल्कोहोलच्या सेवनाने गर्भपात, मुदतपूर्व प्रसूती आणि अगदी मृत बाळंतपण होऊ शकतात. जरी जन्म झाला तरी, बाळाला फेटल अल्कोहोल सिंड्रोम असे म्हणतात ज्यामध्ये दृष्टी आणि श्रवण कमी होणे, विकृत वैशिष्ट्ये, वर्तणूक समस्या आणि बाळामध्ये विलंबित टप्पे यांचा समावेश होतो.

स्तनपान देणाऱ्या मातांनी, जर अल्कोहोलचे सेवन केले असेल, तर त्यांनी 3-4 तास स्तनपान टाळावे, कारण अल्कोहोल आईच्या दुधातही कमी प्रमाणात स्राव होतो.