भारतात आजही लग्नाला अतिशय महत्त्व आहे. दोन जीवासोबत हे नातं दोन कुटुंबाच असतं. पण बदलत्या सामाजित परिस्थितीनुसार त्यात अनेक बदल होताना दिसत आहे. आज तरुण तरुणी एकटे राहणे पसंत करत आहेत. एवढंच नाहीतर गेल्या काही वर्षांमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपचा ट्रेंड वाढलाय. लग्न न करता एकत्र राहणे, तरुण तरुणी पसंद करत आहेत. पण आजही एक असा मोठा वर्ग आहे जो विवाह संस्थेला मानतो. पण एका रिपोर्टमधून लग्नाबद्दल धक्कादायक अहवाल समोर आलाय. त्या रिपोर्टनुसार 2100 वर्षांत लग्नाची संकल्पना संपुष्टात येणार आहे. होय, आज आम्ही तुम्हाला या रिपोर्टबद्दल सांगणार आहोत.
भारतीय समाजात, विवाह ही पती-पत्नी यांच्यातील अतूट बंधन आणि चालीरीतींशी निगडीत घटना आहे. मात्र, आता हळूहळू या अतूट नात्यात वितुष्ट आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. इतकंच नाही तर अनेक प्रकरणांमध्ये पती-पत्नीमधील किरकोळ मतभेदही घटस्फोटापर्यंत पोहोचताना पाहिला मिळत आहेत. दुसरीकडे, सोशल मीडियावर डेटिंग, लिव्ह-इन रिलेशनशिप, या सगळ्या संस्कृती ज्या परदेशापुरत्या मर्यादित होत्या, आता भारतामध्येही लोकप्रिय झाल्या आहेत.
तज्ज्ञांच्या मते, आता महिलांना स्वतंत्र राहायचं आहे आणि त्यांना लग्न नको आहे. या सगळ्याचा परिणाम असा होईल की येत्या सहा-सात दशकांत म्हणजे साधारण 2100 पर्यंत लग्न ही संकल्पना संपुष्टात येईल. तोपर्यंत कोणीही लग्न करणार नाही. तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार, सामाजिक बदल, वाढती व्यक्तिवाद आणि लिंग भूमिका विकसित झाल्यामुळे पारंपारिक विवाह यापुढे अस्तित्वात राहणार नाहीत.
त्याचबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप आणि अपारंपरिक संबंध वाढत आहेत. त्यामुळे लग्नाची गरज संपुष्टात येत आहे. याशिवाय तंत्रज्ञानातील प्रगती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे देखील एक कारण आहे. यामुळे भविष्यात मानवी संबंध वेगळे दिसू शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. विशेषत: महिलांना आता स्वावलंबी जीवन हवे आहे, त्यांना विवाहाच्या बंधनांमध्ये अडकायचं नाहीय. विवाह हे बंधन आहे, जिथे त्यांना स्वातंत्र्य नाही, त्यांना भविष्य नाही, ते त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकत नाहीत असे महिला मानतात.
लॅन्सेटच्या अभ्यासानुसार, सध्या पृथ्वीवर 8 अब्ज लोक राहतात. येत्या काही दिवसांत या संख्येत लक्षणीय बदल होणार आहेत. जागतिक स्तरावर लोकसंख्येचा प्रजनन दर झपाट्याने कमी होत आहे. या बदलाचा भविष्यात मानवावर अधिक परिणाम होईल, असं मानलं जात आहे. 1950 पासून सर्वच देशांमध्ये जन्मदर कमी होत आहे. 1950 मध्ये लोकसंख्येचा प्रजनन दर 4.84% होता. तर 2021 पर्यंत ते 2.23% पर्यंत कमी झालंय. 2100 पर्यंत ते 1.59% पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.