Baby Boy and Girl Names on Lord Vitthal : 'आषाढी एकादशी' निमित्त आज सगळीकडे मंगलमय वातावरण आहे. या मंगलमय वातावरणाचा उत्साह दुप्पट करणारा प्रसंग म्हणजे या दिवशी बाळाचा जन्म झाला असेल तर ही खरंच आनंदाची बाब आहे. अशावेळी तुम्ही बाळासाठी इतर कोणत्याही नावांचा विचार न करता खालील नावे निवडा. कारण या नावांमध्ये दडला आहे पांडुरंगाचा आशिर्वाद.
सादर्श - पाडुंरग हा श्रीकृष्णाचे आणि विठ्ठलाचे रुप. 'सादर्श' या नावाचा अर्थ आहे. श्रीकृष्णासारखा दिसणारा 'तो'. मुलासाठी हे नाव सर्वोत्तम.
अरिजीत - शत्रुंवर विजय मिळवणारा असा 'तो'. आताच्या काळातील शत्रु म्हणजे नकारात्मक विचार, ईष्या, राग, द्वेष, आजार हे आहेत. यांवर विजय मिळवणारा असा तो 'अरिजीत'.
दर्श - पाडुरंगाप्रमाणे सुंदर रुप, सोज्वळ. माऊलीचं रुप आषाढी एकादशीला डोळ्यात भरून घेण्यासारखं असेल. या दिवशी जन्मलेल्या मुलासाठी हे दोन अक्षरी नाव 'दर्श'. या नावाने मुलाला हाक मारताना विटेवर उभ्या असलेल्या माऊलीचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.
वियांश - भगवान श्रीकृष्णाचा एक भाग, जीवनातील समृद्धपणा. पाडुरंग आपल्याला त्याच्या अभंगातून जीवन समृद्ध कसं करावं, हेच सांगत असतो. त्या अभंगाची आठवण म्हणून हे नाव मुलासाठी ठेवू शकतो.
आन्या -'आन्या' हे नाव भगवान विष्णूच्या आशीर्वाद आणि सकारात्मक उर्जेशी संबंधित आहे. हे नाव मुलीला ठेवल्याने तुम्हाला असे वाटेल की जणू भगवान विष्णूच्या कृपेचा वर्षाव तुमच्या मुलीवर होत आहे.
ईशानी - 'ईशानी' हे नाव ताकदीचे प्रतिनिधित्व करते. हे नाव स्त्रीत्व आणि पुरुषत्वाचे अतुलनीय उदाहरण आहे. ईशा म्हणजे देव आणि हे नाव ईशा या शब्दावरून पडले आहे. विष्णूशी संबंधित हे नाव तुम्ही तुमच्या मुलीलाही देऊ शकता. ईशानी सुद्धा खूप सुंदर नाव आहे.
अनिका - 'अनिका' म्हणजे चमक आणि सौंदर्य. भगवान विष्णूमध्ये हे दोन्ही गुण आहेत. तुम्ही तुमच्या मुलीला पांडुरंगाशी संबंधित हे सुंदर नाव देऊ शकता. 'अनिका' हे पारंपरिक तसेच आधुनिक नाव आहे, त्यामुळे तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाला हे नाव नक्कीच आवडेल.
भूमि - जेव्हा-जेव्हा विष्णू अवतरले तेव्हा भूमीने त्यांना आश्रय दिला. रामाच्या अवतारात भगवान विष्णूने सीतेच्या रूपात लक्ष्मी देवीशी विवाह केला होता आणि माता सीतेचा जन्म पृथ्वीपासून झाला होता. अशा प्रकारे भगवान विष्णू अनेक प्रकारे पृथ्वीशी जोडलेले आहेत.