अनेकदा आपण ऑफिसच्या कामांमध्ये इतके व्यस्त होतो की त्यावेळेचा ताण स्वतःकडे लक्षही द्यायला वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीमुळे मनावर आणि मेंदूंवर असंख्य ताण येतो. अशावेळी ही परिस्थिती कशी हाताळाल? असा प्रश्न सतत सतावत राहतो. कारण आपल्याला कळत असतं की, आपलं शांत राहणं हे कामाच्या दष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. पण तो शांतपण मिळवता येत नाही. सतत मनात येणारे विचार तुम्हाला गोंधळवून ठेवतात. पुढे दिलेल्या 4 टिप्समधून ओळखा की, पर्सनल लाईफ आणि वर्क लाईफ यांच्यात कसं सुवर्णमध्य साधाल?
तणाव आणि चिंता टाळण्यासाठी, तुमच्याकडे वेळेचे नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत आणि पुढील काही कामांचे नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे असते. कारण प्लानिंग केल्यामुळे तुम्ही शांत आणि व्यवस्थित पद्धतीने काम पूर्ण करु शकता. घर आणि काम यांच्यात योग्य नियोजन करु शकता.
तुम्ही झोपत असताना, तुमचे शरीर दिवसभरातील ताणतणाव आणि दबावापासून स्वतःला डिटॉक्स करते. जर तुम्ही तणावग्रस्त असाल आणि नीट झोपत नसाल तर त्यामुळे तुमची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे चांगली आणि गाढ झोप घ्या. कारण झोप चांगली असेल तर तुम्हाला काम करायलाही अतिशय फ्रेश वाटते.
एखाद्याशी बोलणे हा स्वतःला आराम मिळवून देण्याचा एक चांगला मार्ग आहे. यामुळे तुम्ही चांगल्याप्रकारे व्यक्त होता. जर तुम्ही एखाद्याशी कोणत्याही तणावाबाबत किंवा चिंतेबाबत बोललात तर तुम्हाला मोकळे वाटू शकते. तुमचा दिवस कसा होता आणि तुम्हाला कशाची चिंता वाटत आहे याबद्दल तुमचे सहकारी, मित्र आणि कुटुंबियांशी बोला. यानंतर तुम्हाला मोकळं वाटू शकतं.
दररोज सकाळी ध्यान, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि सजगतेवर लक्ष केंद्रित करा. या तणाव मुक्तीच्या टिप्स आहेत. यामुळे तुमचे मन तणावपूर्ण परिस्थितीपासून दूर ठेवण्यास मदत होऊ शकते. श्वास घेताना, चालताना किंवा खाताना या लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्ही मी टाईममध्ये राहू शकता.
या सगळ्यासोबतच स्वतःला वेळ देणे देखील तितकेच गरजेचे आहे. या काळात तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. तुमचे छंद जोपासा. फिरायला जा, एवढंच नव्हे तर निवांत असा कुटुंबासोबत वेळ घालवा.