अंडं की पनीर! सर्वात जास्त प्रोटीन कशात? जाणून घ्या माहिती

Weight Loss Tips in Marathi : लठ्ठपणा कमी करण्यासाठी असो किंवा स्नायूंना बळकट करण्यासाठी आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवणे फार महत्वाचे आहे. प्रोटीन पेशींसाठी बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून काम करतात. शारीरिक व्यायाम करताना त्याचे सेवन वाढल्याने चरबी किंवा शिथिलता कमी होते आणि नसा मजबूत होतात. यामुळे तुम्ही अधिक निरोगी दिसू शकता. आहारात प्रोटीन घेण्याचा विचार येतो तेव्हा अंडी आणि पनीर हे दोन पदार्थ आठवतात.  

लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हे दोन्ही पदार्थ फायदेशीर आहेत. पनीर आणि अंडी या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक पोषक असतात. अंडी आणि पनीर दोन्ही प्रोटीन चांगले स्रोत मानले जातात. शाकाहारी लोकांना पनीरपासून तयार केलेले पदार्थ खायला आवडतात. जे लोक मांसाहार करतात त्यांना अंड्याचा आवर्जुन आहारात समावेश करतात. पनीरमध्ये पोषक तत्वांचा खजिना आहे. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी हे घटक असतात. दरम्यान, प्रोटीन तुमच्या शरीराला ऊर्जा पुरवतात. याशिवाय नसा मजबूत ठेवण्यासाठी शरीराला प्रथिनांचा पुरेसा पुरवठा आवश्यक असतो. अंडी आणि पनीर दोन्हीमध्ये भरपूर आरोग्यदायी गुणधर्म असतात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.  

दोन मोठ्या आकाराचे अंड्यांचे वजन सुमारे 100 ग्रॅम आहे. त्यातील प्रथिनांचे अंदाजे प्रमाण 14 ग्रॅम आहे. 100 ग्रॅम पनीरमध्ये प्रोटीनचे प्रमाण 14 ग्रॅम असते. अशा प्रकारे दोन्ही पदार्थांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जवळपास समान असते. तसेच दोन अंडी आणि पनीरमधील पोषक तत्वांमुळे तुमच्या नसा निरोगी आणि मजबूत राहतात. या दोन्ही पदार्थांमध्ये पुरेशा प्रमाणात पौष्टिक घटक असतात. यामुळे तुमच्या शरीरातील पेशींना पुरेसा ओलावा मिळतो आणि त्यामुळे आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. यामुळे स्नायू निरोगी राहतात.  

पनीर आणि अंडी आपल्या शरीराला कॅल्शियम पुरवतात. जेव्हा आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते, तेव्हा शरीर हाडांमधून कॅल्शियम शोषून घेते आणि ताण भरून काढते. या स्थितीत हाडे कमकुवत होऊ लागतात. परिणामी, हाडांशी संबंधित गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. शरीराची हानी टाळण्यासाठी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॉटेज पनीर किंवा अंड्यांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश करा. अंडी आपल्या हाडांना व्हिटॅमिन डी देखील पुरवतात.

अंडी खाल्ल्याने तुमच्या स्नायूंना खूप फायदा होतो. अंड्याचा भाग प्रथिने आणि अमीनो ऍसिडने समृद्ध आहे. किंवा पोषक तत्व शरीरातील स्नायू तयार करण्यास मदत करतात. अंड्याचे सेवन केल्याने नसाही मजबूत होतात. या कारणास्तव जे लोक व्यायाम करतात आणि जिममध्ये जातात, त्यांच्या आहारात अंड्याचा समावेश करतात. अंडी खाल्ल्याने शरीराला दिवसभर पुरेशी ऊर्जा मिळते. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
egg or paneer which protein source is best for health
News Source: 
Home Title: 

अंडं की पनीर! सर्वात जास्त प्रोटीन कशात? जाणून घ्या माहिती

अंडं की पनीर! सर्वात जास्त प्रोटीन कशात? जाणून घ्या माहिती
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
श्वेता चव्हाण
Mobile Title: 
अंडं की पनीर! सर्वात जास्त प्रोटीन कशात? जाणून घ्या माहिती
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, February 17, 2024 - 16:56
Created By: 
Shweta Chavan
Updated By: 
Shweta Chavan
Published By: 
Shweta Chavan
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
334