आरोग्यदायिनी तुळशीच्या नावावरुन ठेवा मुलींची 'ही' नावे, परंपरा जपणारी अर्थपूर्ण नावे

Baby Name Inspired By Tulsi: तुळस म्हणजे पवित्र, तुळस प्रत्येक घरात आढळली जाते. तुळशीचे औषधी गुणधर्मदेखील आहेत. त्यामुळं प्रत्येक घरात तुळस असायलाच हवी. तुळशीपासून प्रेरित होऊन तुम्ही तुमच्या लेकीचं नाव ठेवू शकता. जाणून घ्या नाव आणि अर्थ  

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 21, 2023, 04:27 PM IST
आरोग्यदायिनी तुळशीच्या नावावरुन ठेवा मुलींची 'ही' नावे, परंपरा जपणारी अर्थपूर्ण नावे title=
Girl Names Inspired By Tulsi with meaning in marathi

Baby Name Inspired By Tulsi: तुलसीवृंदावन ज्याचे घरी। त्यासी प्रसन्न श्रीहरी, तुळशीचे महात्म्य सांगणारा अभंग तुम्ही ऐकले असतील. हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पवित्र तुळस ही प्रत्येक घरात असलीच पाहिजे. तिचे औषधी गुणधर्मही अनेक गंभीर समस्यांवर मात करतात. तुळस असणे म्हणजेच घरात जणू प्रसन्न श्रीहरीचे वास करते. संत नामदेवांनी त्यांच्या अभंगात तुळस असे ज्याचे द्वारीं। लक्ष्मी वसे त्याचे घरीं, असा उल्लेख केला आहे. तुमच्या घरच्या लक्ष्मीचे नावही तुम्ही पवित्र अशा तुळशीच्या नावाने ठेवू शकतात. 

दिवाळीनंतर थोड्याच दिवसांत तुळशीविवाह येतो. या दिवशी श्रीहरीसोबत तुळशीचा विवाह लावला जातो. दिवाळीत किंवा त्या महिन्यात जन्मलेल्या मुलींना तुळशीच्या नावावरुन प्रेरीत नावे ठेवा. ज्यामुळं कायम देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहिलं. जाणून घेऊया तुळशीवरुन मुलींची नावे आणि त्याचा अर्थ. 

आरात्रिका (Aaratrika): हिंदू शास्त्रानुसार आरात्रिका नावाचा अर्थ खूपच शुभ आणि सुंदर आहे. अरात्रिका म्हणजे तुळशी वृंदावनाजवळ लावण्यात आलेल्या संध्याकाळचा दिवा 

वृंदा (Vrunda): तुमच्या नाजूक आणि गोंडस परीसाठी या नावाची तुम्ही निवड करु शकता. तुळशीचे नाव वृंदा असेही आहे. वृंदा हे राधेचेही एक नाव आहे. 

स्रग्वी (Sragvi): स्रग्वी हे देखील तुळशीचे एक नाव आहे. या नावाचा अर्थ पवित्र, शांत, गृहप्रिय आणि वाश्वासार्ह असा होतो. 

सुरेज्या (Surejya): सुरेज्या हे देखील तुळशीचेच एक नाव असून याचा अर्थ देवतांचे प्रक्षिशक असा होतो. शास्त्रानुसार सुरेज्या नाव पवित्र मानले जाते. 

मधुपर्ण (Madhuparna): मधुपर्ण नावाचा अर्थ तुळशीचे पान असा होतो. या नावाच्या मुली आकर्षक असून समाजात त्यांच्या कामाचा ठसा उमटवतात. 

बिरुंथा (Biruntha): बिरुंथा या नावाचा अर्थही तुळशीचे पान असा होता. 

वृंद (Vrund): वृंद या नावाचा अर्थ पवित्र तुळस असा होतो. 

मंजिरी (Manjiri): मंजिरी नावाचा अर्थ खूपच सुंदर आहे. तुळशीची छोटी फुलं.  

हरिप्रिया (Haripriya): श्रीविष्णूला तुळस अतिप्रिय म्हणून तिला 'हरिप्रिया' म्हणतात.