Parenting Tips : मुलं सतत मोबाईलमध्ये असतात गुंग? त्यांना बिझी ठेवण्याचे 5 उत्तम पर्याय

मोबाईल शाप की वरदान? हा निबंधाचा विषय आज प्रत्येक पालकाच्या दिनचर्येतील महत्त्वाचा प्रश्न तयार होत चालला आहे. अशावेळी मुलांना आनंदाने व्यस्त ठेवण्याचे 5 पर्याय. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 26, 2024, 02:07 PM IST
Parenting Tips : मुलं सतत मोबाईलमध्ये असतात गुंग? त्यांना बिझी ठेवण्याचे 5 उत्तम पर्याय title=

Parenting Tips : मुलांना मोबाईलमधून बाहेर काढून चांगल्या प्रोडक्टिव कामात व्यस्त ठेवणे महत्त्वाचे असते. अशावेळी पालकांना काय करावे हे कळत नाही. आपलं काम व्हावं म्हणून आपण मुलांना मोबाइल देतो पण याच मोबाईलचं त्यांना व्यसन लागतं. 

मुलांचे मन ताजेतवाने ठेवण्यासाठी थोडे मनोरंजनही आवश्यक असते, परंतु मुले दिवसभर या गोष्टींमध्ये मग्न राहिल्यास ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वाईट आहे. बरं, इतरही अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही मुलांना मोबाईल न देता त्यांचा कंटाळा दूर करू शकता.

स्वयंपाकघरात सोबत 

स्वयंपाकात मुलांची मदत घ्या. त्यांना भाज्या खरेदी करणे, धुणे, सॅलड आणि सँडविच तयार करण्यासाठी मदत घेणे. सकस आहार आणि त्याचे फायदे याविषयी मुलांशी संवाद साधा. स्वयंपाकासोबतच स्वच्छतेबद्दल मुलांना सांगा. हे केवळ त्यांना व्यस्त ठेवणार नाही तर त्यांच्या खाण्याच्या सवयींवर देखील अतिरिक्त लक्ष देण्यास मदत करेल. 

मुलांचं रुटीन तयार करा 

मुलांपासून टीव्ही टाळायची असेल तर त्यांच रुटीन ठेवा. मुलांची खेळण्याची, अभ्यासाची, जेवणाची आणि अगदी टीव्ही पाहण्याची वेळ देखील निश्चित करा. मुलांचं एक रुटीन तयार केल्यामुळे तुम्हालाच फायदा होईल. यामुळे मुलांना कळत नकळत शिस्त लागेल. 

क्रिएटिव हॅबिट्स लावा 

मुलांना व्यस्त होण्यासाठी त्यांना क्रिएटिव हॅबिट्स लावणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या आवडीनिवडी ओळखून चांगल्या सवयींमध्ये मुलांना व्यस्त करुन ठेवा. सायकल चालवायला शिकवा, कॅरम आणि इतर खेळात व्यस्त ठेवायला शिका. मुलांना इतर क्लासेसमध्ये व्यस्त ठेवा. 

मुलांवर होतो परिणाम

  • आकडेवारीनुसार, 12 ते 18 महिने वयोगटातील मुलांमध्ये स्मार्टफोन वापरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हे स्क्रीन डोळ्यांच्या जवळ घेऊन डोळ्यांना हानी पोहोचवतात.
  • डोळ्यांवर थेट परिणाम होत असल्याने लहान मुलांना लवकर चष्मा लागणे, डोळ्यांमध्ये जळजळ आणि कोरडेपणा, थकवा येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 
  • स्मार्टफोन वापरताना ब्लिंक कमी करा. याला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणतात. पालकांनी लक्षात ठेवावे की स्क्रीनचे प्रदर्शन अर्ध्या तासापेक्षा जास्त नसावे. 
  • लहान वयातच स्मार्टफोनच्या व्यसनामुळे मुलांचा सामाजिक विकास होऊ शकत नाही. बाहेर खेळायला न गेल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत नाही. 
  • अशी प्रकरणे मानसोपचारतज्ज्ञांकडेही येतात ज्यात मुले त्यांच्या आवडत्या कार्टून पात्रांप्रमाणे वागू लागतात. त्यामुळे त्यांचा मानसिक विकास खुंटतो.