Morning Routine : फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त आहात? मग सकाळी प्या 'हे' घरगुती ड्रिंक्स, तब्येत राहील ठणठणीत

फॅटी लिव्हर असल्यावर कितीही पोषक अन्न खा ते तुमच्या शरीराला लागणार नाही. कारण जर लिव्हरला सूज आली असेल तर ते नीट काम करत नाही. तेव्हा फॅटी लिव्हरची समस्या असल्यास सकाळच्यावेळी तुम्ही काही घरगुती ड्रिंक्सचे सेवन करू शकता.

Updated: Aug 15, 2024, 04:40 PM IST
Morning Routine : फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त आहात? मग सकाळी प्या 'हे' घरगुती ड्रिंक्स, तब्येत राहील ठणठणीत title=

Home Remedies For Fatty Liver : सध्या फॅटी लिव्हरची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जर वेळेवर याची तपासणी किंवा उपचार घेतले नाहीत तर जिवाला सुद्धा धोका निर्माण होतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की फॅटी लिव्हर म्हणजे नक्की काय? लाइफस्‍टाइल आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे लिव्हरमध्ये अनहेल्‍दी फॅट्स जमा होतात. यामुळे हळूहळू लिव्हर खराब होऊ लागतं आणि मग ते काम करणंच बंद होतं. फॅटी लिव्हर असल्यावर कितीही पोषक अन्न खा ते तुमच्या शरीराला लागणार नाही. कारण जर लिव्हरला सूज आली असेल तर ते नीट काम करत नाही. तेव्हा फॅटी लिव्हरची समस्या असल्यास सकाळच्यावेळी तुम्ही काही घरगुती ड्रिंक्सचे सेवन करू शकता. यामुळे तुमची तब्येत ठणठणीत राहील. घरगुती ड्र‍िंक्समुळे केवळ फॅटी लिव्हरची समस्या दुर होत नाही तर याने वजन कमी होण्यास सुद्धा फायदा होतो. तेव्हा काही घरगुती ड्रिंक्सबद्दल जाणून घेऊयात.

सकाळच्यावेळी या 6 घरगुती ड्र‍िंक्सचा करा समावेश :

 

ग्रीन टी: ग्रीन टी ही आरोग्यासाठी अतिशय उत्तम ठरते. ग्रीन टीमध्ये असणारे कॅटेचिन, एंटीऑक्सीडेंट शरीरासाठी खूप चांगले ठरतात.  ग्रीन टी हे लिव्हसाठी एक चांगलं डिटॉक्स ड्र‍िंक आहे.

हळदीची चहा : हळद ही शरीरासाठी उत्तम ठरते आणि आरोग्यासाठी सुद्धा त्याचे जबरदस्‍त फायदे आहेत.  शरीराच्या आतील दुखापत असो अथवा बाहेरील हळद उपयोगी ठरते. तुम्ही सकाळी हळदीचे पाणी, हळदीची चहा, हळदीचे दूध इत्यादी आरोग्यासाठी अतिशय उत्तम ठरतात. यामुळे सूज कमी होते, पचनक्रिया चांगली राहते. तुम्ही दररोज हळदीच्या चहाचे सेवन करू शकता.

बिटचा ज्यूस : बिटचा ज्यूस लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी मदत करते. यात एंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते. यामुळे रक्त सुद्धा शुद्ध होते आणि लिव्हर हेल्दी राहते.

लिंबू पाणी : सकाळी रिकाम्या पोटी वजन कमी करण्यासाठी तसेच लिव्हरमध्ये जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी मदत मिळते. लिंबूमध्ये व्हिटामिन सी ची भरपूर मात्रा असते. यात साइट्रिक एसिड असते जे आरोग्यासाठी उत्तम ठरते.

अॅपल सायडर व्हिनेगर : अॅपल सायडर व्हिनेगर हा फॅटी लिव्हर पासून सुटका मिळवण्यासाठी प्रभावी उपाय आहे. अॅपल सायडर व्हिनेगर उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

कॉफी : कॉफी फॅटी लिव्हर पासून सुटका मिळवण्यासाठी प्रभावी ठरते. WebMD च्या र‍िपोर्टमध्ये लिहिल्या एका अभ्यासानुसार दिवभरात 2 कप कॉफीच्या सेवनाने फॅटी लिव्हरची समस्या 44 टक्क्यांनी कमी होते. दिवसात ४ कप कॉफी प्यायल्याने फॅटी लिव्हरची समस्या 65 टक्क्यांनी कमी होते.

या गोष्टींची काळजी घ्या : फक्त लिव्हरसाठी नाही तर संपूर्ण आरोग्याची दक्षता घ्यायची असेल तर आहारात साखरचे सेवन करू नये. तसेच नियमित व्यायाम करावा ज्यामुळे फॅटी लिव्हरच नाही तर इतरही समस्या दुर राहतील. लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय वापरू शकता.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)