दिवाळीची साफसफाई करताय? कबुतरांमुळे दुर्गंधी पसरलीय? 5 टिप्स फॉलो करा पुन्हा फिरकणार पण नाही

दिवाळीची सुरुवात ही साफसफाईने होते. अशावेळी सर्वात मोठा टास्क असतो ते बाल्कनी किंवा गॅलरी स्वच्छ करण्याचा. अनेक ठिकाणी कबुतर घाण करुन ठेवतात. त्यामुळे दुर्गंधी आणि किटाणूंची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. तेव्हा अतिशय सोप्या टिप्सने करा ही घाण स्वच्छ. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 26, 2024, 01:26 PM IST
दिवाळीची साफसफाई करताय? कबुतरांमुळे दुर्गंधी पसरलीय? 5 टिप्स फॉलो करा पुन्हा फिरकणार पण नाही

फ्लॅटमध्ये राहणारी लोकं अनेकदा कबुतरांनी हैराण झालेले असतात. घरातील बाल्कनी ते अगदी छतापर्यंत कबुतरांचा उच्छाद असतो. कबुतरांच्या विष्ठेमुळे येणारी दुर्गंधी आणि त्यामुळे होणाऱ्या किड्यांमुळे अनेकदा लोक हैराण होतात. सततचा गुटर गूचा आवाज आणि दुर्गंध यामुळे नकोसं होतं. दिवाळी केली जाणारी सफाईमध्ये हा सर्वात मोठा टास्क असतो. अशावेळी खालील दिलेल्या सोप्या टिप्सच्या मदतीने करा दिवाळीची साफसफाई. 

Add Zee News as a Preferred Source

स्वच्छतेसाठी लागणारी सामग्री 

कबुतरांची घाण स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी काही गोष्टी तुमच्या जवळ असणे गरजेच आहे. यामध्ये स्क्रबर, पाण्याची बॉटल, विनेगर आणि बेकिंग सोडा आणि स्वच्छतेचे कपडे. या गोष्टी तुम्हाला घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करतील. 

डाग स्वच्छ करण्यासाठी 

सगळ्यात आधी रेलिंग किंवा गॅलरी स्वच्छ पाण्याने ओली करुन ती घाण नरम करुन घ्या. किंवा अडचणीच्या ठिकाणी पाण्याच्या बॉटलमध्ये पाणी भरुन घ्या. ते स्प्रे च्या मदतीने अडचणीच्या ठिकाणी मारा. यामुळे तेथील घाण ओली झाल्यावर थोडी मऊ होते.
 आणि तो परिसर स्वच्छ करण्यासाठी मदत होते. स्क्रॅचिंग टाळण्यासाठी काळजी घ्या, कारण यामुळे पृष्ठभाग खराब होऊ शकतो.

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरा

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा हा एक प्रभावी घरगुती उपाय आहे जो हट्टी कबुतराच्या विष्ठेचे डाग काढून टाकण्यास मदत करतो. एक कप व्हिनेगरमध्ये 2 चमचे बेकिंग सोडा मिसळा आणि हे मिश्रण डागांवर लावा. 10-15 मिनिटे राहू द्या जेणेकरून डाग व्यवस्थित मऊ होतील. नंतर स्क्रबरने हलक्या हाताने घासून स्वच्छ पाण्याने धुवा.

साफ केल्यानंतर रेलिंग पॉलिश करा

डाग काढून टाकल्यानंतर, रेलिंगची पृष्ठभाग कोरडी करा आणि मऊ कापडाने पॉलिश करा. जर तुमची रेलिंग धातूची असेल तर तुम्ही मेटल पॉलिश देखील वापरू शकता. हे रेलिंग चमकदार आणि सुरक्षित ठेवेल.

 भविष्यात काळजी घ्या

कबुतरांना बाल्कनीत येण्यापासून रोखण्यासाठी, आपण काही आवश्यक उपाय देखील करू शकता. जसे की बाल्कनीमध्ये कबुतरांना थांबवण्यासाठी जाळी किंवा स्पाइक लावणे इ. या गोष्टी बाजारात सहज उपलब्ध होतात.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More