How to Make Poha Cutlet: भारतीय स्वयंपाक घरात पोहे सहज सापडतात. साध्या पोह्यांपासून अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी पोह्यांचा वापर केला जातो. पोह्यांपासून नाश्त्यासाठी तसेच स्नॅक्ससाठी अनेक प्रकारच्या रेसिपीमध्ये पोहे वापरता येतात. तुम्ही या पोह्यांपासून टेस्टी पोहा कटलेट बनवू शकता. नाश्त्यात काहीतरी नवीन खायचं असेल तर ही एक उत्तम रेसिपी आहे. पोह्यांपासून बनवलेला हा पदार्थ सर्वांनाच आवडेल. हे कटलेट बनवायला जास्त साहित्यही लागत नाही. चला कमी साहित्यात झटपट तयार होणाऱ्या पोहा कटलेटची रेसिपी जाणून घेऊयात.
2 कप पोहे, 2 उकडलेले बटाटे, 2 चमचे मैदा, 5 चमचे कॉर्न फ्लोअर, 2 कप ब्रेडचा चुरा, 1 चमचा आले-लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर ,1/2 टीस्पून गरम मसाला, 1/2 टीस्पून चाट मसाला, 1/2 टीस्पून सुकी कैरी पावडर, 2 टीस्पून चिरलेली कोथिंबीर, 2-3 कप तेल आणि चवीनुसार मीठ.