बाजारातील टॉमेटो सॉस मुलांसाठी ठरु शकतो घातक, असा बनवा घरच्या घरी केचप

Homemade Ketchup: तुम्ही आता घरच्या घरीही टॉमेटो सॉस बनवू शकता. त्यासाठी साहित्यही तुम्हाला अगदी कमी लागणार आहे. जाणून घेऊया घरच्या घरी सॉस बनवण्याची रेसिपी 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 21, 2024, 07:05 PM IST
बाजारातील टॉमेटो सॉस मुलांसाठी ठरु शकतो घातक, असा बनवा घरच्या घरी केचप  title=
how to make tomato ketchup at home without preservative recipe in marathi

How To Make Tomato Ketchup: भजी असो किंवा पापडी, कचोरी असो चटपटीत स्नॅक्ससोबत टॉमेटो सॉस आवडीने खाल्ला जातो. लहानमुलांना तर सॉस खूप आवडतो. अनेकदा चपातीला सॉस लावून दिला जातो. टोमॅटो केचप प्रिझरव्हेटिव्ह असल्याने खूप तो साठवून ठेवला जातो. म्हणजेच एका डब्ब्यात पॅक केलेला असते. टोमॅटो केचअपमध्ये साखर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं लहान मुलांसाठी टॉमेटो कॅचप नुकसानदायक ठरु शकतो. तुम्ही घरातल्या घरातही टोमॅटो कॅचअप बनवू शकता. 

टोमॅटो सॉस बनवण्यासाठीचे साहित्य

- 1 किलो टोमॅटोची पेस्ट
- 1 कप कॉर्न सिरप
- वाइट बी-व्हिनेगर
- पीठीसाखर
- मीठ
- कांद्याची पावडर
- लसणाची पावडर

असा तयार करा घरच्या घरी टोमॅटो कॅचप

- सगळ्यात पहिले एक पॅन घेऊन मध्यम आचेवर ठेवा

- आता वर देण्यात आलेले सर्व साहित्य पॅनमध्ये टाकून मिश्रण एकजीव करुन घ्या

- जवळपास 20 मिनिटांपर्यंत सॉस व्यवस्थित शिजू द्या. 

- पॅनवर झाकण ठेवून थोडा थोडा वेळाने चमच्याच्या सहाय्याने सॉस ढवळत राहा. 

- सॉस थोडा घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि थोडा थंड होऊ द्या 

- सॉस थंड झाल्यानंतर एका एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवून तीन आठवड्यापर्यंत फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि फ्रिजरमध्ये 6 महिन्यांपर्यंत राहतो.

- तुमच्या घरच्या घरी बनवलेला ताजा टोमॅटो केचप तयार आहे. 

या गोष्टी लक्षात ठेवा

- टॉमेटो सॉस बनवण्यासाठी टॉमेटो निवडताना लक्षात घ्या की खराब झालेले व नरम पडलेले टॉमेटो घेऊ नका. नाहीतर मग सॉसची चव बिघडू शकते आणि त्याला वेगळाच वास येऊ शकतो. 

- टॉमेटोची प्युरी बनवताना तो गाळून घेणे खूप गरजेचे आहे. 

- सॉस बनवताना त्यात कोणत्याही प्रकारचा फूड कलरचा वापर करु नका. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)