कडाक्याच्या उन्हात चांगली झोप येण्यासाठी लोक घरात एअर कंडिशनर लावतात, पण काही लोकांना एसीचे तापमान कसे ठेवायचे ते समजत नाही जेणेकरून त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये. एसी चालवताना हवामानानुसार शरीराला थंडावा मिळतो पण अनेकदा याचा परिणाम विजेच्या बिलावर होताना दिसतो. रात्री गाढ झोप येण्यासाठी खोलीचे तापमान योग्य असावे. एसीचे तापमान कमी ठेवल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. रात्री चांगली झोप येण्यासाठी एसीचे तापमान किती असावे?
एसीची टेम्परेचर 24 पर्यंत असल्यास तापमान थंड राहतं. सोबतच विजेचं बिल देखील कमी येण्यास मदत होते. 90% हून अधिक लोकांना याबाबत माहितीच नसते. उर्जा मंत्रालयाच्या अंदाजानुसार, ही मोहीम यशस्वी झाल्यास एका वर्षात 20 अब्ज युनिट विजेची बचत होऊ शकते. आरोग्यही चांगले राहील आणि विजेचे बिलही कमी होईल. वैयक्तिकरित्या सांगायचे तर, 24 डिग्री तापमानात एसी चालवल्यास तुमच्या घराच्या वीज बिलात 15 ते 20 टक्के बचत होऊ शकते.