ईशा अंबानी सारखी Glowing Skin हवीये? मग फॉलो करा 'या' टिप्स

Isha Ambani Shares Tips To Get Glowing Skin : ईशा अंबानीनं तिच्या ग्लोइंग स्किनचं सिक्रेट सगळ्यांसोबत शेअर केलं आहे. तुम्हालाही हवी असेल Glowing Skin तर फॉलो करा 'या' टिप्स

दिक्षा पाटील | Updated: Aug 5, 2024, 06:45 PM IST
ईशा अंबानी सारखी Glowing Skin हवीये? मग फॉलो करा 'या' टिप्स title=
(Photo Credit : Social Media)

Isha Ambani Shares Tips To Get Glowing Skin : फक्त मुकेश अंबानी नाही तर त्यांच संपूर्ण कुटुंब हे नेहमीच चर्चेत असतं. त्यात त्यांच्या घरातल्या सगळ्या स्त्री या चर्चेत असतात. काही दिवसांपासून नीता अंबानी या त्यांच्या लूक्समुळे चर्चेत होत्या. सगळ्या नेटकऱ्यांना प्रश्न होता की सुंदर दिसण्यासाठी त्या काय करतात जेणे करून वयाच्या 60 ठीत त्या 30 वर्षांच्या दिसतात. आता चर्चा आहे ती ईशा अंबानीच्या लूक्सची... नेटकऱ्यांना आता ईशाच्या स्किन केयर सीक्रेटविषयी जाणून घ्यायचं आहे. त्याचं कारण हे अनंत आणि राधिकाचं लग्न आहे. 

जेव्हा पासून अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली तेव्हापासून अंबानी कुटुंब हे सतत चर्चेत आलं. सगळ्यात आधी त्यांनी लग्नासाठी केलेला एकूण खर्च चर्चेत होता. आता त्यांच्या कुटुंबातील महिलांची सुंदरता चर्चेत आहे. अनंत आणि राधिकाचं लग्न 12 जुलै रोजी झालं. त्यानंतर संपूर्ण अंबानी कुटुंब हे पॅरिसला ओलम्पिक पाहण्यासाठी गेलं. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची लेक ईशा अंबानी देखील गेली आहे. 

ईशा अंबानी ही 32 वर्षांची आहे आणि तिनं  नोव्हेंबर 2022 मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. लग्नानंतर ईशा अंबानीचे हटके ड्रेसिंग करताना दिसते. त्यातही ती प्रत्येक ड्रेसमध्ये ती सुंदर दिसते.

ग्लोइंग स्क्रिन

ईशा अंबानीची खूप ग्लोइंग स्किन आहे. ईशानं नुकतंच एक कव्हर शूट केलं होतं. त्यावेळी तिनं तिच्या स्किन केअर रूटीनविषयी विचारण्यात आलं. ईशानं या प्रश्नावर उत्तर देत सांगितलं की माझं ब्यूटी सीक्रेट हे आहे की माझं कोणतंही ब्यूटी सीक्रेट नाही. ईशा ही जगातल्या सगळ्यात महागडे स्किन केअर प्रोडक्ट्स खरेदी करू शकते पण ती तिच्या चेहऱ्यावर काहीही लावत नाही. 

याचं कारण हे असू शकतं की स्किन आपोआप स्वत: हून रिपेयर होऊ शकते. त्यामुळे ती कोणतंही प्रोडक्ट न वापरता त्वचेची काळजी करते. दरम्यान, ईशा ही काही कार्यक्रम असेल तर मेकअप करते. पण रोज चेहऱ्याला ठरवून असं काही लावत नाही. 

कशी घेते मग त्वचेची काळजी? 

आपली त्वचा चांगली ठेवण्यासाठी ईशा खूप पाणी पिण्याचा सल्ला देते. आपण जितकं पाणी पिऊ तितकी आपली त्वचा ही हायड्रेटेड राहिलं आणि त्यामुळेच त्वचा ही ग्लोइंग राहिल. सगळ्यात आधी चेहऱ्यावर असलेली धूळ आणि ऑइल काढण्यासाठी ईशा ही जेन्टल क्लिन्झरचा वापर करते. त्याशिवाय ईशा ही तिच्या आहारावर देखील लक्ष देते. तिच्या आहारात तिनं फळं, भाज्या आणि त्यासोबतच ज्या सगळ्या पदार्थांमध्ये अॅन्टिऑक्सिडंट्स आहेत. त्यांचे सेवन करण्याला प्राधान्य देते. 

हेही वाचा : सकाळी उठल्या उठल्या नीता अंबानी पितात 'हे' खास पाणी, वयाच्या 60 व्या वर्षीही दिसतात फिट आणि Maintained

मेकअप करण्याआधी ईशा तिच्या चेहऱ्यावर मॉइश्चरायर लावते. त्याचं कारण म्हणजे त्यामुळे तुमची त्वचा ही निरोगी राहते त्याशिवाय त्वचेत ड्रायनेस राहत नाही. त्यासोबत ईशा रोज व्यायाम करण्यावर देखील भर देते.