Kitchen Tips in Marathi : पूर्वीच्या काळात मातीच्या भांड्यावर स्वयंपाक केला जायचा. पण काळ बदला आणि त्या मातीच्या भांडीची जागा अल्युमिनियम, नॉनस्टिक, काचीची भांडी आणि चिनी मातीची भांड्यांनी घेतली. पण ट्रेंड पुन्हा बदलला आणि स्वयंपाक घरात मातीची भांडी आपल्याला दिसायला लागली आहे. तुम्ही बाजारातून माती भांडी घरी आणली असतील. तर ती मातीची भांडी स्वयंपाक योग्य आणि अन्न शिजवल्यानंतर मातीची भांडी वापरल्यावर कशी धुवावी, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही मातीच्या भांड्याबद्दल काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. तुम्ही या चुका टाळल्यास तुमच्या मातीच्या भांड्यांना तडा जाणार नाही. (Kitchen Tips in marathi How to wash clay pots or earthenware properly for cooking at home and after use Watch the VIDEO to know the tricks)
1. मार्केटमधून मातीचे भांडी आणल्यानंतर ते पाण्यात पूर्ण एक तास भिजवून ठेवा.
2. आता चोवीस तासानंतर ते भांड नुसती scrub नीट घासा.
3. त्यानंतर ही भांडी उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवा.
4. ही भांडी नीट सुकल्यानंतर त्याला तेल लावून पुन्हा उन्हात सुकण्यासाठी ठेवून द्या.
5. जेव्हा हे भांडे पूर्णपणे कोरड होईल म्हणजे ती अन्न शिजवण्यासाठी तयार आहेत.
सर्वात आधी मातीच्या भांड्याला लागलेले खरकटे पाण्याने धुवून घ्यावेत. त्यानंतर बेसन, ज्वारीचे पीठ किंवा राख यांनी भांड धुवून घ्या. मातीची भांडी धुण्यासाठी नारळाच्या शेंडीचा किंवा मऊ स्पंजचा वापर करा. आता ती भांडी पुन्हा नीट पाण्याने स्वच्छ धुवून टाका. धुतल्यानंतरही भांड्यांना चिवटपणा आणि वास येत असेल तर मातीच्या भांड्यावर लिंबू लावून भांडी घासून घ्या. अन्न शिजवल्यानंतर या भांड्यांमध्ये काही वेळासाठी गरम पाणी टाकून ठेवा. त्यानंतर 3 चमचे बेकिंग सोडा टाकून ते अर्ध्या तास ठेवा. मग ते स्वच्छ धुवून घ्या. मीठ हे सर्वोत्कृष्ट नॉन टॉक्सिक क्लिनर असल्यामुळे तुम्ही मीठाचा वापर करु शकता.
1. मातीची भांडी घेताना त्याचा तळ/बुड नीट तपासून घ्या. तो जाड हवा, नाहीतर उष्णतेने भांड्याला तडा जाऊ शकतो.
2. नवीन भांडे तेल घालून गॅसवर ठेवावं. शिवाय ती मंद आचेवर अन्न शिजवावे.
3. मातीच्या भांड्यांसाठी वेगळा स्क्रब किंवा स्पंज ठेवा.
4. भांडी धुवून झाल्यावर शक्य असेल तर उन्हामध्ये सुकवून घ्या.