महाशिवरात्रीनिमित्त नंदीच्या नावावरुन ठेवा मुलाचे सुंदर नाव

Trending Baby Boy Names in Marathi: जर तुम्ही देखील भगवान शिवाचे भक्त असाल आणि शिवरात्रीच्या जवळपास बाळाचं बारसं असेल तर खालील नावांचा विचार करु शकता.   

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 1, 2024, 01:12 PM IST
महाशिवरात्रीनिमित्त नंदीच्या नावावरुन ठेवा मुलाचे सुंदर नाव  title=

Hindu Baby Boys Names on Lord Shiva in Marathi: येत्या 8 मार्च रोजी देशभरात शिवरात्रीचा उत्सव (Mahashivratri )साजरा होणार आहे. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाल्याचे मानले जाते. जर आपण शिव कुटुंबाबद्दल बोललो तर त्यात भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यासह त्यांचे दोन पुत्र भगवान गणेश आणि कार्तिकेय यांचा समावेश आहे, परंतु भोलेनाथकडे या कुटुंबाचा प्रवास नंदीशिवाय पूर्ण होत नाही. 

नंदी म्हणजे आनंद देणे किंवा आनंदाचा उत्साह. यावेळी शिवरात्रीच्या मुहूर्तावर आम्ही तुमच्यासाठी लहान मुलांसाठी भगवान शिवाच्या नंदी नावाशी संबंधित काही सुंदर नावे घेऊन आलो आहोत. जर तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर तुम्ही तुमच्या मुलासाठी येथे दिलेल्या नावांपैकी कोणतेही एक निवडू शकता. तुमच्या घरात मुलगा झाला असेल तर तुम्ही त्याला भोलेनाथचा स्वार नंदीशी संबंधित नाव देऊ शकता. मुलांसाठी नंदीची काही नावे आणि त्याचा अर्थ. 

आल्हाद आणि आर्जव

जर तुम्ही 'अ' अक्षरापासून सुरू होणारी नावे शोधत असाल तर तुम्ही 'आह्लाद' आणि 'आर्जव' या नावांचा विचार करू शकता. 'आह्लाद म्हणजे 'आनंद'. 'आनंद वाटणे' हा देखील या नावाचा आणखी एक अर्थ आहे. 'आर्जव' हे एक अद्वितीय नाव आहे ज्याचा अर्थ 'प्रामाणिक' आणि 'आनंदी' असा आहे.

अमितोष आणि आमोद 

अमितोष नावाचा अर्थ 'अनंत आनंद आणि आनंद' आहे तर 'आमोद' नावाचा अर्थ देखील अतिशय खास आहे. ज्याप्रमाणे 'नंदी' नावाचा अर्थ 'आनंद देणारा' असा होतो, त्याचप्रमाणे या दोन्ही नावांचा अर्थही आनंदाशी संबंधित आहे.

ध्रुविन आणि दिवित 

ध्रुविन नावाचा अर्थ 'एक महान व्यक्ती, आनंदी आणि बहुमुखी' असा आहे. दिवित चा अर्थ 'अमर असणे' असा आहे. याचा अर्थ ‘आनंद’ असा देखील होतो आणि हे एक अतिशय चांगले हिंदू नाव आहे. तुम्ही तुमच्या बाळाला या दोनपैकी एक नाव देऊ शकता.

नंदी 
प्रसन्न आणि आनंद असा नंदी नावाचा अर्थ आहे. नंदी हे नाव मुलासाठी नक्की निवडू शकता. नंदी या नावाचा अर्थ पाहता मुलासाठी हे नाव निवडू शकता. नंदी हे दोन अक्षरी नाव अतिशय खास आहे. 

भोला 

भोलेनाथाच्या नावावरुन मुलांची नावे. शिव शंकराच्या नावावरुन मुलांची नावे ठेवताना भोला किंवा भोलेनाथ या नावांचा देखील विचार करु शकता. भोलेनाथ म्हणजे देवाचे भक्त, भाविक असा देखील याचा अर्थ होतो.