पावसात खिडक्या-दरवाजे जाम झाले, 'या' घरगुती उपायांनी करा दुरुस्त

Monsoon Home Care Tips: पावसाळ्यात पाण्याचा शिडकावा आणि ओलावा यामुळे घराच्या खिडक्या आणि दरवाजे फुगतात किंवा गंजतात, त्यानंतर ते उघडण्यास आणि बंद करण्यास त्रास सहन करावा लागतो. तसेच दरवाज्याचा आवाज देखील येतो. अशावेळी घरगुती उपाय?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 15, 2024, 06:48 PM IST
पावसात खिडक्या-दरवाजे जाम झाले, 'या' घरगुती उपायांनी करा दुरुस्त  title=

Monsoon Home Care Tips: पावसाळ्यात उष्णतेपासून बराच आराम मिळतो. मात्र या काळात निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे काम अवघड होते. या काळात, एखाद्याला अनेकदा ओलावा, भिंतींमधील पाणी आणि कीटक आणि गळती या समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात सहसा घरातील फर्निचर आणि खिडक्या-दारांची विशेष काळजी घ्यावी लागते. या ऋतूत लाकूड फुगल्याने आणि लोखंडी गंज लागल्यामुळे दारे-खिडक्या उघडण्यास व बंद करण्यात अडचणी येतात. पावसाळ्यात अडकलेले दरवाजे आणि खिडक्या दुरुस्त करण्याचे काही सोपे उपाय आहेत. 

दरवाजा फ्रेम तपासा

पावसाळ्यात लाकडात सतत पाणी आणि ओलावा राहिल्याने फ्रेम आणि लाकडी दरवाजा अनेकदा फुगतात. त्यामुळे ते बंद करणे आणि उघडण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत, सर्वप्रथम दरवाजा खराब किंवा तुटलेला नाही याची खात्री करून घ्या. तसे असल्यास, ते बदला किंवा तो भाग कापून टाका आणि तेथे एक फ्रेम किंवा प्लास्टिक कट ठेवा.

दार कोरडे करा

दरवाजा आणि फ्रेममधून ओलावा काढून टाकण्यासाठी टॉवेल किंवा केस ड्रायर वापरा. याशिवाय, पावसाळ्यात दररोज त्यांच्या कडा स्वच्छ आणि कोरड्या करा. दरवाजा पाण्याने फुगल्यावर यासारख्या समस्या जाणवतात. 

बिजागरांवर तेल सोडा 

अडकलेले सांधे मोकळे करण्यासाठी तेल किंवा सिलिकॉन स्प्रे लावा. याशिवाय तुम्ही घरात असलेली मेणबत्ती वितळवून वापरू शकता. गंजलेल्या किंवा सुजलेल्या भागावर ते चोळून लावा. पावसात अडकलेला दरवाजा त्याच्या मदतीने सहज दुरुस्त करता येतो. पावसाळ्यात घाण साचत असल्याने काही वेळा खिडकी उघडण्यासाठी व बंद करण्यासाठी दुप्पट प्रयत्न करावे लागतात. अशा परिस्थितीत सर्वप्रथम खिडकीच्या रुळांमधील घाण ब्रश किंवा कापडाने स्वच्छ करा.

वंगण घालणे

ट्रॅक स्वच्छ केल्यानंतर, त्यांना सिलिकॉन स्प्रे किंवा तेल लावून ग्रीस करा. जर गंज असेल तर सँडपेपरच्या मदतीने ते काढून टाका. यासाठी, खिडकीच्या स्क्रू-बोल्टवरील गंज सँडपेपरने 5 मिनिटे घासून घ्या, यामुळे ते साफ होईल. हा उपाय तुम्ही लोखंडी दारासाठी देखील करू शकता.

इतर काळजी काय घ्याल? 

नियमित देखभाल: जाम होऊ नये म्हणून दारे आणि खिडक्या नियमितपणे स्वच्छ आणि ग्रीस करा.
ठेकणं तपासा: ठेकणांमुळे दरवाजे आणि खिडक्या जाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत दीमक आढळल्यास ताबडतोब उपचार करा.
वेदर स्ट्रिपिंग वापरा: पाण्याचा प्रवेश टाळण्यासाठी आणि जॅमिंग कमी करण्यासाठी दरवाजे आणि खिडक्यांभोवती वेदर स्ट्रिपिंग लावा.