नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचं अनंत अंबानीचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला तरीही त्याची चर्चा थांबायचं काही नाव घेत नाही. नीता अंबानी यांनी लग्नात 'कन्यादान' या शब्दाचा अर्थ समजावून सांगितला. स्वतः एक स्त्री, एका मुलीची आई आणि एका सुनेची सासू आहे. कन्येचं जीवनात किती महत्त्व आहे, हे मी जाणते. त्यामुळे 'पुण्यवंताच्या घरी मुलीचा जन्म होतो', असं नीता अंबानी सांगतात.
हा व्हिडिओ 'कन्यादान' सोहळ्याच्या काही मिनिटांपूर्वीचा आहे ज्यामध्ये नीता अंबानी आपल्या पाहुण्यांना हिंदू धर्माच्या या परंपरेबद्दल तपशीलवार सांगत आहेत. नीता अंबानींचा हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला.
कन्यादान सोहळ्यापूर्वी नीता अंबानी यांनी कन्यादान विधीचे महत्त्व सगळ्यांसमोर मांडले. नीता अंबानी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या की, 'मी यावेळी खूप आनंदी आणि भावूक आहे. कारण माझ्या हृदयाचे दोन तुकडे अनंत आणि राधिका आता एक होणार आहेत. हिंदू धर्मात लग्न हे एका आयुष्याचे वचन नाही तर सात जन्म एकत्र राहण्याचे वचन आहे. प्रत्येक जन्मात तुम्हाला तुमचा जोडीदार कोणत्या ना कोणत्या मार्गाने सापडेल हा विश्वास आहे. जसजसे आपण विवाहसोहळ्याकडे वाटचाल करत आहोत. तसतसे आपण सर्वात खास विधी करणार आहोत तो म्हणजे 'कन्यादान'. हा एक विधी आहे ज्यामध्ये वधूचे पालक त्यांच्या मुलीचा हात वराकडे सोपवतात. पण कोणताही पालक आपल्या मुलांपासून दूर जाऊ शकत नाही हे मला चांगलंच माहीत आहे.
नीता अंबानी पुढे म्हणाल्या की, 'मुली हे जगातील सर्वोत्तम वरदान आहेत. तिला माता लक्ष्मीच्या रूपात पाहिले जाते. भारतीय लग्न सोहळा हा 'समानतेचे सर्वात मोठे' उदाहरण आहे. वर पक्ष, वधु पक्ष असे काही नसते. ही दोन्ही कुटुंब समान असतात. मला शैला आणि वीरेनला सांगायचे आहे की; तुम्ही आम्हाला तुमची मुलगी देत नाही तर तुम्हाला मुलगा आणि नवीन कुटुंब मिळत आहे. आतापासून अनंत या कुटुंबातल्या राधिका इतकाच तुझा आहे. 'सौ राधिका अनंत अंबानी' यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. नीता अंबानींचे हे शब्द ऐकून तेथे उपस्थित अनेक लोक भावूक झाले आणि अश्रू पुसताना दिसले.
आजही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नवरा-बायकोचे किती पटते यापेक्षा सासू-सुनेचे किती सुर जुळतात हे महत्त्वाचे असते. नीता अंबानी यांनी आपल्या या शब्दांमधून घरातील सासूची भूमिका कशी हवी हे अधोरेखित केलं आहे.
मुलीचे पालक 'कन्यादान' करतात, ही बाबच मुळात चुकीची आहे. कारण दान हे वस्तूचं होतं. मुलगी तर पालकांची काळजाचा तुकडा असते. मग कुणी त्याचे दान कसे करु शकते. त्यामुळे पालकांनी देखील ही गोष्ट तेवढीच लक्षात ठेवणे गरजेचे आहे.