रात्री शांत झोप लागत नाही? मग परिधान करा असे कपडे, लगेच येईल झोप

Not Getting Enough Of Sleep At Night : रात्री शांत झोप लागत नाही... तर आजच बदला ही सवय

दिक्षा पाटील | Updated: Sep 1, 2024, 06:40 PM IST
रात्री शांत झोप लागत नाही? मग परिधान करा असे कपडे, लगेच येईल झोप title=
(Photo Credit : Freepik)

Not Getting Enough Of Sleep At Night : रात्री शांत आणि गाढ झोप येणं हे खूप महत्त्वाचं असतं. झोप जर शांत नसेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी अस्वस्थ वाटू लागतं. त्याचं कारण अनेकदा तुम्ही परिधान केलेले कपडे देखील असतात. त्यामुळे तुम्ही अनकम्फर्टेबल होतात. तर याविषयी डॉ. पयोज पांडे यांनी याविषयीची कारण सांगितली आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 'रात्री झोपताना तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करतात त्यावर सगळं अवलंबून असतं.'

1. मऊ आणि ब्रीदेबल कपडे परिधान करा 

रात्री झोपताना मऊ आणि ब्रीदेबल कॉटन, लिनन सारखे कपडे परिधान करा. हे कपडे ब्रीदेबल असतात. यामुळे तुम्हाला गरम होत नाही. 

2. सैल कपडे परिधान करा

झोपताना सैल कपडे परिधान करा चुकूनही टाईट कपडे परिधान करू नका. त्याचं कारण म्हणजे ब्लड फ्लो थांबू शकतं. नाईट गाऊन, पजामा आणि टी-शर्ट परिधान केलं. 

3. वातावरणानुसार कपडे निवडा

वातावरण जसं असेल त्यानुसार कपडे निवडा. उन्हाळ्यात हलक्या रंगाचे आणि तुमचं शरीर थंड ठेवतील असे कपडे परिधान करा. हिवाळ्यात गरम कपडे परिधान करा आणि त्यासोबत ते ब्रीदेबल आहेत ना याचीही काळजी घ्या. 

4. सिंथेटिक कपडा

सिंथेटिक कपडे जसे नायलॉन किंवा पॉलिस्टर झोपण्यासाठी योग्य नाही. ही कपडे अंगाला चिटकून राहतात. त्यामुळे सततच्या येणाऱ्या घामामुळे अॅलर्जी होण्याची शक्यता आहे. त्यासोबत हे कपडे शरीरातील गरमी बाहेर पडू देण्यापासून अडवतात. 

5. कमीत कमी आणि साधी डिझाइन

लेस, रिबन किंवा बटन असलेले याशिवाय डिझाइन असलेले कपडे झोपताना घालू नका त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकतात. साधे आणि कमीत कमी डिझाइन असलेले कपडे परिधान करा. 

6. रात्री परिधान करणारे कपडे हे स्वच्छ आणि फ्रेश असायला हवे

रात्री झोपताना तुम्ही जे कपडे परिधान करणार आहेत ते स्वच्छ असायला हवे. ते घामटलेले किंवा धूळ लागली नसेल याची काळजी घ्याल. त्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगलचं संक्रमण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे देखील झोपेत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे रोज रात्री झोपायच्या आधी स्वच्छ कपडे परिधान करा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)