काय? कपाळाचा आकारही सांगतो तुमच्या मनात चाललंय तरी काय... पाहा कसं ओळखाल

Personality Test by Forehead Shape: अनेकदा तुमचा चेहराच सारंकाही सांगून जातो असं म्हटलं जातं आणि ते खरंय. तुमच्या व्यक्तीमत्त्वाची अनेक रहस्य कळत नकळत तुमचं शरीररच सांगून जातं.   

सायली पाटील | Updated: Nov 12, 2024, 11:49 AM IST
काय? कपाळाचा आकारही सांगतो तुमच्या मनात चाललंय तरी काय...  पाहा कसं ओळखाल title=
Personality Test type of Forehead Reveals Your Hidden Personality facts

Personality Test by Forehead Shape: एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाविषयी नेमकं जाणून घ्यायचं असेल तर, यासाठीचा सर्वात उत्तम मार्ग कोणता? यासाठी कोणतं तंत्र नसून, फक्त निरीक्षणक्षमतेच्या बळावरही समोरच्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय चाललं असू शकतं याविषयीचा अंदाज बांधता येतो. यामध्ये महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे अमुक एका व्यक्तीचा चेहरा. 

व्यक्ती बोलायच्या आधीच त्या व्यक्तीचा चेहरा खूप काही बोलून जातो. मग ते डोळे असो, नाक असो, गाल किंवा अगदी कान आणि चेहऱ्यावरील तीळ असो. व्यक्ती आणि त्यांच्या प्रवृत्ती चेहऱ्यावरील घटक सहजपणे समोरच्यांपर्यंत ज्या गोष्टी पोहोचवणं अपेक्षित आहे त्या पोहोचवण्याचं काम करतात. कपाळही त्याच घटकांपैकी एक. 

मोठं कपाळ 

चित्रात दाखवल्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं कमाप रुंद आणि मोठं असल्यास ही व्यक्ती एकाच वेली अनेक कामं कौशल्यानं करण्यास समर्थ असते. महत्त्वाकांक्षा आणि बुद्धिचातुर्याच्या बळावर या व्यक्ती यश संपादन करतात. नव्या संधीसाठी तयार असतात, इतरांशी मोकळेपणानं संवाद साधतात. कधीकधी या व्यक्तींचा संताप मात्र अनावर होण्याची शक्यता असते. 

लहान कपाळ 

कपाळ लहान असणाऱ्या व्यक्ती सहसा एकट्यातच रमतात. ही मंडळी त्यांच्या मेंदूपेक्षा मनाचं जास्त ऐकतात, भावनांना प्राधान्य देतात. नकारात्मकता या व्यक्तींच्या आजुबाजूला भटकत नाही. पण, अनेकदा या व्यक्ती इतरांकडून दुखावल्या जातात आणि त्यांच्या मनावर मात्र यामुळं गंभीर परिणाम होतो. 

हेसुद्धा वाचा : रामायणातील ऐतिहासिक स्थळं प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी! हा Made In Sri Lanka व्हिडीओ पाहून भारतीय भारावले

वर्तुळाकार कपाळ 

तिसऱ्या आकृतीमध्ये दिसत असल्यानुसार कपाळ साधारण वर्तुळाकार असल्यास ही मंडळी समजण्यास अतिशय सहज आणि सोपी असतात. त्यांचा वावर इतरांसाठी हवाहवासा असतो. इतरांमध्ये वावरणं हा या व्यक्तींचा आवडीचा छंद. त्यांच्या येण्यानं उत्साहाता झराच जणू वाहू लागतो. 

M आकाराचं कपाळ 

कपाळावर केसांच्या रचनेतून साधारण M असा आकार तयार होत असल्यास ही मंडळी कलाप्रेमी आणि कामात अतिशय काटेकोर असतात. त्यांची कल्पनाशक्ती अफाट असते आणि ही मंडळी त्यांच्या संस्कारांसाठी कायम इतरांच्या लक्षात राहतात. ही मंडळी इतरांची काळजी घेतात. त्यांची साधी जीवनशैली अनेकांचीच मनं जिंकते. 

(वरील माहिती उपलब्ध संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)