शाळा सुरु होऊन जवळपास महिना झाला अजूनही मुलं रडतात? किंवा काही मुलांना पहिल्यांदाच पालकांनी डे-केअरमध्ये ठेवायला सुरुवात केली असेल. ही सगळी मुलं अजूनही रडत असतील तर काय करावं? पालकांनी 5 गोष्टीचा नक्की अवलंब करावा.
शाळा हा मुलांचा पाया असतो. शाळेबद्दल मुलांच्या मनात कायम प्रेम-आदर निर्माण व्हायला हवा. पण सुरुवातीच्या काळातच मुलं शाळेत जायला खूप रडतात. मुलांच्या शाळेच्या आठवणीत फक्त रडणारे आपण एवढंच लक्षात राहतं. त्यामुळे या आठवणी मुलांसोबत राहू नयेत म्हणून पालकांनी विशेष प्रयत्न करावेत.
तसेच डे-केअर ही आताच्या पालकांची गरज आहे. अनेक पालक दोघेही कामाला जातात तेव्हा मुलांना सांभाळणारं एक विश्वासाचं घर लागतं. जी भूमिका डे-केअर निभावतात असतात. आजही अनेक मुलांच्या मनात डे-केअरबद्दल भीती आहे. ही भीती घालवण्यासाठी पालकांनी आणि डे-केअरमधील व्यक्तींनी विशेष प्रयत्न करावेत.
मुलांसाठी शाळा किंवा डेकेअर या दोन्ही गोष्टी अगदी नवीन असतात. मुलांच्या या जागेची सवय पालकांनी काही दिवस करुन देणे आवश्यक असते. अगदी पालकांनी मुलांसोबत काही दिवस शाळेत किंवा डे-केअरमध्ये जावं.
मुलांसाठी घर आणि पालक या व्यतिरिक्तच्या सगळ्याच गोष्टी नवीन असतात. अशावेळी त्यांची मानसिक तयारी करणे आवश्यक असते. त्यामुळे पालकांनी मुलांशी या गोष्टीवर
बोलावं. आपल्या नवीन शाळेत जायचंय किंवा आता तू दिवसभर एका काकूंकडे राहणार आहेस, या सगळ्याची माहिती द्यावी.
पालकांनी मुलांशी संवाद साधणं गरजेच आहे. कारण मुलांसाठी सगळ्या गोष्टी नवीन असतात. अशावेळी पालकांनी मुलांनी शाळा, डे-केअर तेथील आनंद, मज्जा यासारख्या गोष्टींवर संवाद साधावा. पालकांनी आपापसात देखील या विषयावर मुलांसमोर बोलावं. जेणे करुन पालकांना या जागेबाबत विश्वास आहे हा विश्वास मुलांमध्ये निर्माण होतो.
अनेकदा पालकच शाळा किंवा डे-केअरबाबत शाशंक असतात. त्यांचा हा अविश्वास किंवा मनात असलेली भीती मुलांपर्यंत पोहोचतात. कारण पालकांच्या मनातील भीती वाईब्सच्या रुपात मुलांपर्यंत पोहोचतात. मुलं या जागेसाठी तेवढे मोकळे होत नाहीत.
पालकांनी मुलांना शाळा आणि डे-केअरच्या सकारात्मक बाजू सांगितली हवी. त्यांचा शाळेचा किंवा-डेकेअरचा अनुभव मुलांसोबत शेअर करावा. यामुळे मुलांसाठी या दोन्ही जागेच्या सकारात्मक गोष्टी निर्माण होतात.