PM मोदींचा भारतीय पालकांना 'या' गोष्टींपासून लांब राहण्याचा सल्ला; मुलांवर येतोय ताण

PM Narendra Modi Parenting Tips : 'परीक्षा पर चर्चा' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालकांना काही टिप्स दिल्या. ज्यामुळे मुलांचं जीवन अधिक आरामदायी आणि सुखकर होणार आहे. पण सोबतच पालकांनाही थोडा आराम मिळणार आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 15, 2023, 04:21 PM IST
PM मोदींचा भारतीय पालकांना 'या' गोष्टींपासून लांब राहण्याचा सल्ला; मुलांवर येतोय ताण title=

Parenting Tips : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात मुलांना आणि पालकांना त्यांच्याकडून काही टिप्स देत आहेत. या मालिकेच्या एका कार्यक्रमादरम्यान पीएम मोदींनी पालकांना परीक्षेच्या दिवसांमध्ये मुलांची तयारी करण्यासाठी आणि मुलांवरील तणावाचे ओझे कमी करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या.

जर तुम्ही देखील पालक असाल आणि तुम्ही तुमच्या पाल्याला परीक्षेसाठी तयार करत असाल, तर पीएम मोदींनी दिलेला सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. त्यांच्या सल्ल्याने तुमच्या मुलाचा तणाव तर कमी होऊ शकतोच पण तुमच्या दोघांमधील नातेही मजबूत होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया पीएम मोदींनी पालकांना काय सल्ला दिला आणि त्यानुसार मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे.

सोशल स्टेटस पाहू नका 

अनेकदा पालक आपल्या मुलांवर अभ्यासाचे ओझे टाकतात की, परीक्षेत कमी गुण मिळाले तर समाजाचे काय, मित्रपरिवाराचे काय करणार. तुम्हीही हे सगळं तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात घडताना पाहिलं असेल. यासाठी पंतप्रधान मोदींनी पालकांना आपल्या मुलांकडून समाजाप्रमाणे अपेक्षा ठेवू नयेत असे सांगितले. त्यामुळे त्याचा मानसिक भार वाढू शकतो.

मुलांना तुमच्या कृतीतून शिकवा 

पंतप्रधान मोदी यांनी पालकांना आपल्या कृतीतून मुलांना शिकवण्यास सांगितलं. जसे की, घरातील स्त्री किंवा मुलांची आई जसं मॅनेजमेंट करते अगदी त्याच पद्धतीने मुलांनी आपल्या अभ्यासाचं, वेळेचं नियोजन करावं. आणि पालकांनी देखील मुलांना यामध्ये मदत करावी. कारण मुलांना वेळेचे नियोजन करण्याचा अनुभव नसतो.  मोदी म्हणाले की, आई घरात सतत काम करत असते. त्यांना कोणतेही काम ओझे वाटत नाही. कारण कोणते काम किती तासात करायचे आहे हे त्याला माहीत असते. एवढेच नाही तर ते त्यांच्या अतिरिक्त वेळेतही आराम करतात. म्हणजे या काळात ते इतर काही काम करतात. पीएम मोदी म्हणाले की, विद्यार्थ्यांनीही त्यांच्या आईच्या कामातून त्यांचा वेळ सांभाळला पाहिजे. 

प्रत्येक मुलं वेगळं 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रत्येक मुलं वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही मुलांना कोणत्याही पिअर प्रेशरमध्ये अडकवू नका. त्यांच्या पद्धतीने त्यांना वाढू दे. मोकळेपणाने मोठे होऊ दे. उगाचच मुलांवर कोणतंही प्रेशर तयार करु नका. अनेकदा पालक मुलांच्या शिक्षणाचे स्टेट सिम्बॉल बनवतात. या सगळयाचा मुलांवर खूप परिणाम होतो. मुलांवर कोणत्याही पद्धतीचा ताण येणार नाही याची काळजी घ्या