Research : वयानुसार महिन्यातून किती वेळा शारीरिक संबंध ठेवणे योग्य? धक्कादायक आकडेवारी समोर

शारीरिक संबंधांबद्दल चर्चां करणे चुकीचे समजले जाते. नुकतच या विषयावर उघडपणे चर्चा झाली आहे. जगभरातील हजारो लोकांच्या लैंगिक जीवनाबद्दल एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. 

Updated: Sep 6, 2024, 11:45 PM IST
Research : वयानुसार महिन्यातून किती वेळा शारीरिक संबंध ठेवणे योग्य? धक्कादायक आकडेवारी समोर title=
Research According to age how many times a month is it appropriate to have physical relationship Shocking figures in front

Research : शारीरिक संबंधांबद्दल आणि त्यातील समस्यांबद्दल आजही खुलेपणे बोलं जातं नाही. अशा प्रकारच्या चर्चांना अनेकदा निषिद्ध मानलं जातं. शारीरिक संबंधाबद्दल बोलणं हे अश्लिलतेच लक्षण मानलं जातं. पण नुकताच एक अभ्यास करुन अहवाल सादर करण्यात आलाय. या अहवालातून हजारो लोकांच्या लैंगिक आयुष्याचं गुप्त उघड झालंय. 

इंडियाना युनिव्हर्सिटीच्या किन्से इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी एक अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या पिढीतील लोक एका महिन्यात सरासरी किती वेळा शारीरिक संबंध ठेवतात याची माहिती देण्यात आलीय. या रिसर्चमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या अहवालानुसार जनरेशन झेडचे लैंगिक आयुष्य हे मागील पिढ्यांपेक्षा खूपच कमी सक्रिय असल्याच समोर आलंय. 

या अहवालाचे शीर्षक 'द स्टेट ऑफ डेटिंग: हाऊ जनरल झेड Z इज रिडिफाइनिंग सेक्सुअलिटी एंड रिलेशनशिप्स' असं आहे. हा अहवाल फील्ड नावाच्या डेटिंग ॲपवरील 3,310 हून अधिक लोकांच्या डेटावर आधारित असल्याच सांगण्यात आलंय. या सर्चमध्ये 18 ते 75 वर्षांच्या वयोगटातील आणि 71 वेगवेगळ्या देशांतील लोकांवर अभ्यास करण्यात आला. त्यांच्या लैंगिक आयुष्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांना सर्वेक्षणात सहभागी करुन घेण्यात आलं.

अहवालाच्या आकडेवारीनुसार, सरासरी, जनरल झेड सहभागींनी गेल्या महिन्यात केवळ तीन वेळा शारीरिक संबंध ठेवल्याची नोंद आहे. त्याच वेळी, Millennials आणि Generation X मध्ये किंचित जास्त वेळा शारीरिक संबंध ठेवण्यात आलंय. या दोन्ही पिढ्यांनी गेल्या महिन्यात पाच वेळा शारीरिक संबंध ठेवले आहेत. बूमर्सने गेल्या महिन्यात सरासरी फक्त तीन वेळा शारीरिक संबंध ठेवले आहेत. हा डेटा दर्शवितो की जनरल झेड आणि बूमर्स जवळजवळ तितकेच कमी सक्रिय लैंगिक आयुष्य असल्याच दिसून आलंय. 

जनरल झेडच्या कमी शारीरिक संबंधामागील कारण काय?

संशोधकांचं म्हणणंय की जेन झेड पिढीतील लोकांकडे शारीरिक संबंधांसाठी कमी वेळ असतो कारण ते त्यांच्या करिअर आणि इतर गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करतात. अहवालानुसार, 'जनरल झेड आणि बूमर्स दोघांची लैंगिक वारंवारता जवळजवळ समान आहे, हे दर्शविते की सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर लोकांमध्ये सर्वात कमी सक्रिय लैंगिक आयुष्य आहे.' याव्यतिरिक्त, अहवालात असेही आढळून आलंय की जेन झेडमधील जवळजवळ निम्मे सहभागी अविवाहित होते, तर मिलेनिअल्स, जनरेशन एक्स आणि बूमर्सचे फक्त एक-पंचमांश (20%) अविवाहित होते.

Gen Z चे लैंगिक अनुभव

जरी Gen Z चे लैंगिक जीवन कमी सक्रिय असले तरी ही पिढी बेडरूममध्ये सर्वात साहसी आहे. अहवालात असं आढळून आले की 55% जनरल झेड सहभागींनी फील्ड ॲपवर कनेक्ट केल्यानंतर नवीन किंक शोधली. तुलनेत, मिलेनिअल्समध्ये हा आकडा 49%, जनरेशन X मध्ये 39% आणि बूमर्समध्ये 33% होता.

एका महिन्यातील किती वेळा शारीरिक संबंध ठेवणे योग्य?

संशोधकांचे म्हणणंय की, शारीरिक संबंध ठेवण्याची नेमकी संख्या प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते. काहींसाठी, आठवड्यातून एकदा शारीरिक संबंध ठेवणे पुरेसे असू शकतं, तर काहींना ते कमी वाटू शकतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघेही समाधानी असल्यास या शारीरिक संबंध ठेवण्यात हिताच ठरतं.