मृत्यूनंतरही तुमच्या प्रिय व्यक्तीशी बोलता येणार! AI संशोधकांचा दावा

AI ही नवी टेक्नॉलॉजी माहित नाही अशी एकही व्यक्ती नसेल. कारण आता AI ने जवळपास सगळ्याच क्षेत्रात शिरकाव केला आहे. असं असताना AI बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. AI च्या मदतीने आता मृत व्यक्तीशी कनेक्ट होता येणार? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 29, 2024, 02:52 PM IST
मृत्यूनंतरही तुमच्या प्रिय व्यक्तीशी बोलता येणार! AI संशोधकांचा दावा title=

AI ही नवी टेक्नॉलॉजी माहित नाही अशी एकही व्यक्ती नसेल. कारण आता AI ने जवळपास सगळ्याच क्षेत्रात शिरकाव केला आहे. असं असताना AI बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. AI च्या मदतीने आता मृत व्यक्तीशी कनेक्ट होता येणार? 

आर्टिफिशल इंटलीजन्स (AI) हा आता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ज्यामुळे आता पूर्वी अशक्य वाट असलेल्या अनेक गोष्टी सहज आणि सक्षमपणे करता येणार आहेत. AI च्या मदतीने आता लोकं आपल्या जुन्या फॅमिली फोटोंमधून ऍनिमिटेड व्हिडीओ तयार करताना दिसत आहेत.

आता नव्या रिपोर्टनुसार, आता AI च्या नव्या संशोधक आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मृत झालेल्या जवळच्या प्रिय अशा व्यक्तीशी संपर्क साधता येणार आहे. 

मृत व्यक्तीसोबत बोलणं शक्य आहे का? 

मीडिया रिपोर्टनुसार, रिसर्चर आणि टेक्नॉलॉजी या नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे. या प्रोजेक्टचा टॉपिक अतिशय रोमांचक आणि हैराण करणारा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने आता मृत पावलेल्या व्यक्तीशी संवाद साधता येणार आहे. हे कसं होणार आहे, याबाबत अद्याप कोणतीच स्पष्ट माहिती नाही. एमआयटीटचे प्रोफेसर शेरी टर्कलने याबाबत माहिती दिली आहे. 

कसा होणार संवाद 

प्रोजेक्ट डिसेंबर अंतर्गत मृत व्यक्तीशी संवाद साधता येणार आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या ख्रिश्ती अँजलने AI चॅट द्वारे कॅमेरुन या मित्राशी संवाद साधला. कॅमेरुन या त्याच्या मित्राचा माहामारीच्या काळात मृत्यू झाला होता. ख्रिस्तीला या मित्राशी प्रोजेक्ट डिसेंबरद्वारे संवाद साधायचा आहे. 

टेक्नॉलॉजी आणि मानव यांच्या नात्यावर संशोधन

टर्कल गेल्या बऱ्याच काळापासून मानव आणि टेक्नॉलॉजी यांच्या नातेसंबंधावर संशोधन करत आहे. त्यांच्या माहितीनुसार, त्रज्ञानातील नवकल्पना त्यांच्या शिखरावर पोहोचत आहेत. अशावेळी या तंत्रज्ञानाचा अधिक विचार करण्याचा मत एमआयटी प्रोफेसर प्राध्यापिका शेरी टर्कले यांनी व्यक्त केलं आहे. 

AI मुळे भविष्य धोक्यात 

शेरी टर्कल यांनी याबाबत माहिती देताना भविष्यात AI च्या गैरवापराबाबतही सतर्क केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून AI आपल्या खासगी आयुष्यात दखल देत असल्याचं सांगून सतर्क केलं आहे. कारण जेव्हा अशी नवी टेक्नॉलॉजी येते तेव्हा त्याबद्दल आकर्षणही वाढतं. जर एखाद्या गोष्टीसोबत भावनिक गुंतागुंत झाली तर त्याच्यापासून वेगळे होणे कठीण होते.