फार्ट थांबवून ठेवणे शरीरासाठी घातक! तज्ज्ञांकडून समजून घ्या पोटातील हवा बाहेर काढणं का महत्त्वाचं?

Fart Holding : चारचौघांत असल्याने किंवा ऑफिसमध्ये काम करत असताना जर फार्ट आली तर आपण ती रोखून धरतो. कारण आपली चेष्टा व्हायला नको. त्यामुळे गॅस पोटातच राहतो. हा गॅस आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरतो. शिवाय कॅन्सरचीही भीती बळावते.     

नेहा चौधरी | Updated: Sep 16, 2024, 12:34 PM IST
फार्ट थांबवून ठेवणे शरीरासाठी घातक! तज्ज्ञांकडून समजून घ्या पोटातील हवा बाहेर काढणं का महत्त्वाचं? title=
Stopping the fart is dangerous for the body Understand from the experts why it is important to expel the air in the stomach

Fart Holding : नैसर्गिक गोष्टींमध्ये अडथळे निर्माण केल्यास त्यापासून आपल्याला धोका असतो. मग ते वातावरणातील असो किंवा आपल्या शरीराशी संबंध गोष्टी असो. ज्याप्रमाणे आपल्याला घाम येतो, लघवी येते अगदी शिंका येते आपण त्यात बाधा आणत नाहीत. कारण या गोष्टी नैसर्गिक आहे. तसंच पोटात गॅस तयार होणे आणि तो बाहेर निघण्यासाठी आपण फार्ट करतो. अनेक वेळा हे फार्ट रोखणे शक्य नसतं आणि चारचौघांत आपण फार्ट करतो. त्यामुळे आपली चेष्टा उडवली जाते. हेच एकमेव कारण असतं ज्यामुळे जगातील असंख्य लोक ऑफिस असो, सार्वजनिक ठिकाण असो किंवा अगदी घरातही फार्ट करण्यापासून स्वत:ला रोखतात किंवा प्रयत्न करतात. पहिला प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्यांदा मात्र फार्ट होतो तेव्हा हलका आवाज होतो. पहिल्यांदा तो जोरात असू शकतो शिवाय त्यातून दुर्गंधी येते. त्यामुळे लोकांना लाज वाटते आणि ते फार्ट थांबवतात. 

पण पोटात तयार होणारी ही गॅस शरीराबाहेर निघणे फार गरजेचं असतं. अन्यथा याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. एवढंच नाही तर आरोग्याचे अनेक गंभीर आणि हानीकारक समस्या निर्माण होतात. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. रेखा राधामोनी यांनी सांगितल्या आहेत  की, फर्टचे काही फायदे आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फर्ट न केल्याने शरीराला होणाऱ्या नुकसानीबाबत माहिती दिलीय. ही माहिती शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये असेही लिहिलंय की, आयुर्वेदानुसार फर्टिग चांगले आहे. श्वास घेणे किंवा घाम येणे यासारखी ही एक सामान्य प्रक्रिया आहे.

हेसुद्धा वाचा - Blood Cancer Symptoms : 'ही' आहेत ब्लड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं; कोणत्या चाचण्या कराव्यात?

पार्ट सामान्य का आहे?

डॉ. रेखा राधामोनी यांच्या मते, जेव्हा पचनक्रिया वेगवान होते तेव्हा गॅस तयार होतो. हा वायू तयार झाल्यावर तो शरीरात खालच्या दिशेने वाहत असतो. ज्याला inferiority complex किंवा fart म्हणतात. तहान लागणे, भूक लागणे आणि लघवी होणे ही एक सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. जे थांबू नये. यासोबतच डॉ. रेखा राधामोनी यांनी फार्ट थांबवणे याबद्दल होणारे तोटेही त्यांनी सांगितलंय. 

जर तुम्ही फार्ट जास्त वेळ धरून ठेवला तर वायू वरच्या दिशेने वाहू शकतो. यामुळे तुमची डोकेदुखी होते. जेव्हा तुम्ही गॅस थांबवता तेव्हा शरीरात निर्माण होणारा वायू तुमच्या शरीरात राहतो. जे नंतर मोठी समस्या बनते. फर्ट थांबवल्याने पचन प्रक्रियेवर परिणाम होतो. डॉ. रेखा राधामोनी यांच्या पोस्टनुसार, फार्टिंग थांबवण्याचा प्रयत्न केल्यास पोटात सूज येऊ शकते. यामुळे, बद्धकोष्ठता देखील समस्या निर्माण होते किंवा व्यक्ती चव घेण्याची क्षमता गमावू शकतो. 

हेसुद्धा वाचा - LDL Cholesterol Symptoms : 'ही' 6 लक्षणं तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागली तर समजून जा, शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलंय

जेव्हा तुम्ही फार्ट थांबवता तेव्हा पोटाचा सर्वात जास्त प्रवास करणारा भाग म्हणजे कोलन. फर्टच्या माध्यमातून अनेक प्रकारची रसायनेही शरीरातून वायूच्या स्वरूपात बाहेर पडतात. जे आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्यासाठी खरोखर हानिकारक आहेत. जेव्हा तुम्ही फार्टिंग थांबवता, तेव्हा अशी रसायने शरीरात राहतात. त्यामुळे कोलन कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. जेव्हा शरीरातील गॅस रोखतो तेव्हा आतड्यांवर देखील वाईट परिणाम होतो. विशेषत: आतड्यांचा खालचा भाग या वायूमुळे दाबाखाली येतो. त्यामुळे आतड्यांच्या कार्यावर परिणाम होतो. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)