तणाव आणि चिंता करतात लैंगिक जीवनावर परिणाम; शरीरात दिसतात 'हे' बदल

Sexual and Reproductive : तणाव आणि चिंता याचा आरोग्यावर नेहमी वाईट परिणाम होत असतो. तणावामुळे व्यक्तीच्या मनात अनेक नकारात्मक विचार येत असतात. याचा परिणाम लैंगिक संबंधावर देखील दिसून येतात. 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 12, 2024, 04:03 PM IST
तणाव आणि चिंता करतात लैंगिक जीवनावर परिणाम; शरीरात दिसतात 'हे' बदल title=

Sexual and Reproductive Health Awareness Day 2024 : चांगलं आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपण आपल्या शारीरिक आरोग्याची जितकी काळजी घेतली पाहिजे तितकीच मानसिक आरोग्याचीही घेतली पाहिजे. बदलती जीवनशैली आणि आपल्या कामाचा लोडचा मानसिक आरोग्यावर सर्वात वाईट परिणाम होतो. कामाशी संबंधित ताणतणावाचा परिणाम तुमच्या एकूण आरोग्यावर होतो. काहीवेळा तो इतका गंभीर असतो की, त्यामुळे नैराश्यासारख्या आजारांचा धोका वाढतो.

अनेकदा तणाव वागणुकीतून दिसत असतो. तणावामुळे डोकेदुखी, पोट खराब होणे, उच्च रक्तदाब किंवा छातीत दुखणे यासारख्या शारीरिक समस्या होण्याची शक्यता असते. मानसिक आरोग्याच्या बाबतीत, ताण जास्त असल्यास नैराश्य, चिंता, पॅनीक अटॅक आणि इतर भावनिक समस्या उद्भवू शकतात. याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तणाव आणि चिंताचा सर्वात जास्त परिणाम लैंगिक जीवनावर दिसून येतो. यामुळे सेक्स लाईफ तसेच पार्टनरसोबतचे नाते खराह होऊ शकते.  जाणून घेऊयात तुमच्या लैंगिक जीवनावर कसा वाईट परिणाम होतो. 

मासिक पाळी समस्या

तुम्ही जर तणाव जास्त घेत असाल तर मासिक पाळी अनियमित होऊ शकते. त्यामुळे शरीरात हार्मेानल बदल होतात. यामुळे वर्तनावर परिणाम करणारे मूड बदलू शकतात आणि तणाव वाढू शकतात. 

हार्मोनल असंतुलन

जेव्हा तणाव येतो त्याचा परिणाम शरीरातील स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी वाढते. कोर्टिसोल आणि एपिनेफ्रिनच्या वाढलेल्या प्रमाणाचे निरोगी सेक्स ड्राइव्हर परिणाम होतो. याचा जास्त परिणाम महिलांमधून होत असून स्त्रियांमध्ये लैंगिक उत्तेजना कमी करते,  ज्यामुळे लैंगिक जीवन प्रभावित होते.

मूड स्विंग

अनेकदा ब्रेकअपचे मुख्य कारण मूड स्विंग ठरते. शरीरातील हा बदल तुम्हाला तुमच्या जोडीदारापासून दूर करु शकतो.  जेव्हा आपण तणावग्रस्त असतो तेव्हा नातेसंबंध खरोखरच एक टोल घेतात. 

लैंगिक विकार

जेव्हा तुमचे शरीर तणावाखाली असते तेव्हा तुम्ही लोकांपासून भावनिकदृष्ट्या अलिप्त असता.  काही वेळा तुम्हाला अजिबात बोलावेसे वाटत नाही. तुम्ही लोकांपासून दूर जाण्याचा मार्ग शोधत होता. असे दिसते की तुम्ही तुमच्या जोडीदारापासून भावनिकदृष्ट्या अलिप्त आहात. सेक्स ही केवळ शारीरिक क्रिया नाही तर त्यात तुमच्या भावनांचाही समावेश होतो.