जे एक मिठी करू शकते ते शब्दांनाही जमत नाही; मिठी मारण्याचे प्रकार आणि त्यांचे अर्थ

Differant Types of Hugs and Their Meaning: आजच्या काळात, मिठी मारणे ही एक सामान्य गोष्ट बाब आहे. पण तुम्हाला मिठी मारण्याचे प्रकार असतात आणि त्यांचे अर्थ तुम्हाला माहिती आहे का? 

नेहा चौधरी | Updated: Feb 12, 2024, 12:08 PM IST
जे एक मिठी करू शकते ते शब्दांनाही जमत नाही; मिठी मारण्याचे प्रकार आणि त्यांचे अर्थ title=
hug day 2024 Words cannot match what a hug can do Types of hugs and their meanings types of hugs in marathi

Differant Types of Hugs and Their Meaning in Marathi: व्हेलेंटाइन वीकमधील सहावा दिवस हा Hug Day 2024 म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या प्रिय व्यक्तीला मिठी मारणे हा त्या नात्याबद्दल प्रेम व्यक्त करण्याची एक अबोल भाषा आहे. मिठी मारणे हा एक सुखद अनुभव असतो. प्रत्येक मिठीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या भावना निर्माण होतात. खरं तर आपल्या प्रिय व्यक्तीला मिठी मारल्यावर एक सुरक्षतेची भावना जाणवते. वैज्ञानिकांनी तर मिठी मारल्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला फायदा होतो, हे आपल्याला माहितीच आहे. पण तुम्हाला मिठीचा अर्थ आणि त्याचे प्रकार माहिती आहे का? खरं तर वेगवेगळ्या प्रकारची मिठी तुमचं नात्याच गुप्त उघड करते. (hug day 2024 Words cannot match what a hug can do Types of hugs and their meanings types of hugs in marathi)

मिठीचा अर्थ आणि त्याचे प्रकार !

एका बाजूने मारलेली मिठी (Side hug)

ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये आपण एका बाजूने मिठी मारणारे अनेक लोक पाहतो. पण तुम्हाला याचा अर्थ माहिती आहे का? जेव्हा दोन व्यक्ती एका बाजूनेच एकमेकांना मिठी मारतात तेव्हा ती मैत्रीच्या भावना व्यक्त होत असते. ही मिठी एखाद्याला प्रोत्साहन देण्यासाठीही मारली जाते. 

मागून मिठी मारणे (Hugging from behind)

मागून मिठी ही आपण आपल्या प्रिय व्यक्तीला मारत असतो. खास करुन जोडपी अशा प्रकारची मिठी मारतात. ही मिठी अतिशय रोमँटिक असली तरी हे एक प्रेम व्यक्त करण्याचा भाषा आहे. ही मिठी आपण आई वडील, बहीण भावाला देखील मारतो. 

मैत्रीपूर्ण मिठी (Friendly hug)

ही एक अतिशय मैत्रीपूर्ण मिठी असून या दोन लोक एकमेकांना हाताने मिठी मारताना आपण पाहिल आहे. दोघांच्या कंबरेमध्ये योग्य अंतर असते जेणेकरून त्याचा लैंगिक किंवा रोमँटिक असा वेगळे अर्थ त्या मिठीत येऊ नये अशी ही मैत्रीपूर्ण मिठी असते. खरं तर ही मिठी काही सेकंदाची असते. आनंदाने आणि त्या व्यक्तीला अभिवादन करण्यासाठी ही मिठी दिली जाते. 

हेसुद्धा वाचा - 'जादू की झप्पी' एवढी फायदेशीर का? जाणून घ्या काय आहेत मिठी मारण्याचे फायदे

कमरेभोवती मिठी मारणे (Hugging around the waist)

प्रेमी युगुल ही मिठी मारतात. प्रेम, जवळीक आणि सुरक्षित भावनेतून ही मिठी मारली जाते. ही एक रोमँटिक पोझ असून त्या व्यक्तीप्रती आपली अतिशय खास अशी भावना व्यक्त केली जाते. 

बेअर मिठी (Bear hug)

नाव जरी मजेशीर असलं तरी ही मिठी अनेक जोडपे मारतात पण त्याला बेअर मिठी म्हणतात हे त्यांना माहिती नसतं. जोडीदाराच्या छातीवर डोकं ठेवून आणि पोटावर हात ठेवून जी मिठी तुम्ही देता त्याला बेअर मिठी असं म्हणतात. ही मुठी म्हणजे उबदार आणि सुरक्षित भावनेतून दिली जाते. ही मिठी दिवसभरातील थकवा जोडीदाराच्या कुशीत नाहीसा करते. 

एकतर्फी मिठी (One-sided hug)

या प्रकारच्या मिठीत, दोन व्यक्ती एकमेकांच्या समोरासमोर असतात मात्र फक्त एकच व्यक्ती दुसर्‍याला मिठी मारण्यास उत्सुक असल्याच दिसतं. आपल्यासोबतही बऱ्याच वेळा असं झालं असेल ना. या मिठीत ती व्यक्ती आपले हात समोरच्या व्यक्तीभोवती गुंडाळतात त्याला एकतर्फी मिठी म्हणतात. ही मिठी कठीण काळात, संकटात, समोरच्या व्यक्तीला आधार देण्यासाठी दिली जाते. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती सर्वसामान्य बाबीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. )