Baby Names on Lakshmi : आपल्या लाडक्या लेकीला द्या माता लक्ष्मीच्या नावांवरुन गोंडस नाव, महत्त्वाचं म्हणजे तुमच्या लेकीवर कायम संपन्नतेचा राहील विशेष आशिर्वाद. घरात कन्येचे आगमन हे लक्ष्मीचे आगमन मानले जाते. भारतात स्त्रीला 'लक्ष्मी स्वरूप' म्हटले जाते. जर तुम्हाला तुमच्या मुलीला आयुष्यभर सुखी आणि समृद्ध पाहायचे असेल तर तुम्ही तुमच्या मुलीला देवी लक्ष्मीच्या 'या' 10 नावांपैकी एक नाव नक्कीच देऊ शकता.
माता लक्ष्मीला श्रीजा नावाने देखील ओळखले जाते, ज्याचा अर्थ भव्य आणि संपत्ती आणि वैभवाने संपन्न आहे. तुमच्या लाडक्या मुलीच्या आयुष्यात कधीही संपत्ती आणि समृद्धीची कमतरता येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिला माता लक्ष्मीचे नाव देऊ शकता.
सानवी हे माता लक्ष्मीचे अतिशय सुंदर आणि मॉडर्न नाव आहे. सानवीचा अर्थ आहे कमळाच्या फुलावर वास करणारी. माता लक्ष्मी कमळाच्या फुलावर विराजमान आहे. यामुळे तुम्ही मुलीला 'सानवी' हे नाव नक्कीच देऊ शकता. या नावामुळे लेकीच्या जीवनात कोणतेच कष्ट येणार नाहीत.
या नावाचा अर्थ आहे पाण्यात जन्म घेणारी. माता लक्ष्मीचा जन्म देखील समुद्रातून झाला आहे. म्हणून माता लक्ष्मी 'वरुणा' नावाने ओळखली जाते. देवी लक्ष्मीच्या नावावरुन ठेवा मुलीचे नाव.
तुम्ही देखील मुलीसाठी युनिक नाव शोधत असाल तर 'श्रीनिका' हे नाव अतिशय खास आहे. तुम्ही मुलीला श्रीनिका हे नाव देऊ शकता. याचा अर्थ आहे कमळाचे फूल.
'श्री' हे नाव अतिशय खास आहे. माता लक्ष्मीचा हे नाव एक अक्षरी असून मुलीसाठी परफेक्ट आहे. ज्याचा अर्थ आहे लक्ष्मी.
श्रेया हे नाव दोन अक्षरी सोपं आणि खास नाव आहे. ज्याचा अर्थ आहे देवी लक्ष्मी, शुभ आणि पूज्य. यामुळे तुमच्या लाडक्या लेकीचं जीवन सुख, समृद्धि आणि वैभवाने भरुन जातं. त्यामुळे लेकीला द्या 'श्रेया' हे दोन अक्षरी गोंडस नावे.
'कल्याणी' हे पारंपरिक आणि पौराणिक नाव आहे. 'कल्याणी' नावाचा अर्थ सर्वात शुभ आहे. तुम्ही तुमच्या मुलीसाठी माँ लक्ष्मीचे हे नाव देखील निवडू शकता.
'वसुधा' हे नाव तुम्ही खूप ऐकले असेल पण तुम्हाला माहित आहे का की हे देवी लक्ष्मीचे नाव आहे. वसुधा नावाचा अर्थ पृथ्वी असाही होतो. अतिशय पारंपरिक नावांचा नवा ट्रेंड आला आहे. तुम्ही या नावांचा विचार नक्की करू शकता.
'सुदीक्षा' हे नाव 'स' अक्षरावरुन अतिशय गोंडस नाव आहे. तुम्ही मुलीला युनिक नाव शोध असाल तर 'स' अक्षराने सुरू होत असेल तर तुम्ही तिचे नाव सुदीक्षा ठेवू शकता. माता लक्ष्मीला सुदीक्षा या नावानेही संबोधले जाते.
तुम्हाला तुमच्या मुलीसाठी 'शिरसा' हे नाव नक्की आवडेल. धनाची देवी माता लक्ष्मी हिला शिरसा म्हणून ओळखले जाते. या नावाच्या मुलीवर कायम राहिल धनसंपन्न लक्ष्मीचा आशिर्वाद