Pee Stain Jeans: भारतीय बाजारपेठेत कपड्यांना मोठी मागणी आहे. भारतीय युवा वर्गाला समोर ठेऊन अनेक मोठ-मोठे परदेशी ब्रँड कपड्यांच्या नवनव्या फॅशन (Fashion) आणत असते. यात कोणती स्टाईल कधी ट्रेंड करेल याचा अंदाज घेणं मोठं कठिण आहे. फाटलेल्या जीन्स, बॅग जीन्स, सिक्स पॉकेट जीन्सची तरुण वर्गात मोठी क्रेझ आहे. विशेषत: तरुणींमध्ये अशा जीन्स परिधान करण्याची आवड आहे. यात आता नव्या स्टाईलची भर पडली आहे. प्रसिद्ध ब्रिटिश मेन्सवेअर ब्रँड असलेल्या Jordancula ने एक नवी जीन्स बाजारात आणली आहे. पण या जीन्सचा स्टाईल पाहून हसावं की रडावं हे युजर्सना कळत नाहीए.
विशेष म्हणजे या जीन्सला तरुण वर्गात मोठी मागणी असून हजारो रुपये खर्च करुन ऑनलाईन ऑर्डर केल्या जात आहेत. जीन्सच्या चेनजवळ गडद रंगाचा डाग ठेवण्यात आला आहे. पाहाताच क्षणी पॅन्टवर सू-सूचा (Urine) डाग आहे असं वाटेल. जीन्स परिधान करणाऱ्या व्यक्तीने पॅन्ट ओली केली का असा प्रश्न बघणाऱ्याला पडेल. पण केवळ डिझायनर डागनेच या जीन्सकडे लोकांचं लक्ष वळवलंय नाहीए, तर या जीन्सच्या किंमतीनेही युजर्सना हैराण केलं आहे.
हजारो रुपयांची जीन्स
पी स्टेन जीन्स (Pee Stain Jeans) असं या जीन्सला नाव देण्यात आलं असून बाजारात याची किंमत 811 डॉलर म्हणजे भारतीय रुपयात याची किंमत 67,600 रुपये इतकी आहे. पण तुम्हाला ही जीन्स पँट घेण्याची इच्छा असेल तर ऑनलाईन सेलमध्ये याची किंमत 50000 हजार रुपये इतकी आहे. पण या जीन्सला इतकी मागणी आहे की ऑनललाईन सेलमध्येही ही जीन्स पँट आऊट ऑफ स्टॉक आहे.
लोकांची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर या जीन्सचा फोटो व्हायरल झाला आहे. यावर लोकांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या डिझायनची खिल्ली उडवली आहे. एका युजरने अशी जीन्स बनवण्याचा विचार कोणाच्या डोक्यात आला असेल असा प्रश्न विचारला आहे. एका युजरने म्हटलंय पॅंटवर सू-सूचा डाग असल्याचीही स्टाईल असू शकेत का? कंपनीने या युजर्सच्या या प्रश्नांना उत्तर देताना युवा वर्गासाठी कूल स्टाईल असल्याचं म्हटलं आहे.
भारतात कपड्यांची बाजारपेठ
भारतात कपड्यांची बाजारपेठ जागतिक स्तरावर सहाव्या क्रमांकाची सर्वाधिक उलाढाल होणारी बाजारपेठ आहे. Zara, H&M, Marks & Spencer, Gap आणि अगदी अलीकडे जपानी रिटेलर Uniqlo सारख्या जागतिक ब्रँड्सनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. भारत सरकारने सिंगल-ब्रँड रिटेलमध्ये स्थानिक सोर्सिंगचे नियम शिथिल केले आहेत, ज्यामुळे उद्योगाला आणखी चालना मिळाली आहे.