अनेक पालकांचा आक्षेप असतो मुलींसाठी वेगवेगळी युनिक अशी नावे असतात. पण मुलांसाठी मात्र नवीन अशी नावे नाहीत. त्यामुळे अशा पालकांसाठी आम्ही घेऊन आलोय खास नावे. मुलांची 25 नावे आणि त्याचे खास अर्थ.
विहान - सकाळ आणि पहाट असा या नावाचा अर्थ आहे.
हार्दिक - हृदयापासून आणि मनापासून असा या नावाचा अर्थ आहे.
तनुष - गणपती, भगवान शिव असा या नावाचा अर्थ आहे.
हर्षित - आनंदी, आनंददायक, हसणे, मजा असा या नावाचा अर्थ आहे.
अभिनंदन - आनंद, शुभेच्छा असा या नावाचा अर्थ आहे.
राजवर्धन - राजांचा राजा असा या नावाचा अर्थ आहे. मुलाचं अतिशय सुंदर असा ठेवा नाव.
स्वरुप - सत्य, सौंदर्य प्रेमी असा या नावाचा अर्थ आहे. स्वरुप हे नाव युनिक आहे.
स्वरित - मृदु आवाज; स्वर्गाच्या दिशेने; भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रकार असा या नावाचा अर्थ आहे. संगीत प्रेमींच्या घरी या नावाचा विचार करु शकतात.
वेदांग - वेद पासून, वेद असा या नावांचा अर्थ आहे. 'वेदांग' हे नाव युनिक आहे.
वर्जेश - भगवान कृष्ण, श्रीकृष्णाचं एक नाव असा नावाचा अर्थ. हरीचे भक्त या नावाचा विचार नक्कीच करु शकतात.
चित्रक - चित्रकार, कलाकार असा या नावाचा अर्थ आहे.
मृगेश - सिंह, मृग असा या नावाचा अर्थ आहे.
रौनक - प्रतिष्ठित; आनंद; गर्व आणि वैभव; कीर्ति असा या नावाचा अर्थ आहे. रौनक हे नाव अतिशय युनिक आहे.
ऋतुराज - सर्व हंगाम राजा, ऋतुंचा राजा, ऋतुंवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला ऋतुराज म्हटलं जातं.
पार्थ - राजा; तेजस्वी; चांदी; अर्जुन असा या नावाचा अर्थ आहे. पार्थ हे दोन अक्षरी खास नाव आहे.
विंदिप - तेजस्वी असा या नावाचा अर्थ आहे. विंदिप हे नाव युनिक आहे.
सक्षम - सक्षम या नावाचा अर्थ त्यामध्येच दडला आहे. खंबीर अशा स्वभावाच्या मुलाला हे नाव द्या.
रेयाश - सूर्याचा एक भाग, भगवान विष्णू असा या नावाचा अर्थ आहे.
नीरज - कमळाचे फूल असा या नावाचा अर्थ आहे. मुलासाठी हे नाव अतिशय युनिक आहे.
ईशान - इच्छा, आत्मविश्वास असा या नावाचा अर्थ आहे. 'ईशान' या नावाचा विचार करायला हरकत नाही.
लक्ष्य - ध्येय; गंतव्यस्थान; ज्याचे सर्वत्र एक विशिष्ट ध्येय आहे; तरुण - सूर्य, यंग, युवक, निविदा, प्रेम असा या नावाचा अर्थ आहे.
तनिष्क - दुर्गा देवी; परी; सोन्याची देवी, आशीर्वाद असा या नावाचा अर्थ आहे.
ईशान्य - ईशान्य ही दिशा आहे तसेच याचा अर्थ इच्छा असा देखील याचा अर्थ आहे. या नावाचा नक्की विचार करा.