चाणक्यांना कशी मिळाली आचार्य ही उपाधी? कोण होते त्यांचे गुरु?

Kautilya Philosophy : चाणक्य प्राचीन भारताचे एक लोकप्रिय अर्थशास्त्र, राजकीय व्यक्तीमत्त्व. आजही त्यांचे तत्त्व, विचार फॉलो केले जातात. चाणक्यने चंद्रगुप्त मौर्या यांना राजा बनवून मौर्य साम्राज्याची निर्मिती केली. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 5, 2024, 09:51 AM IST
चाणक्यांना कशी मिळाली आचार्य ही उपाधी? कोण होते त्यांचे गुरु?  title=

Chanakya Biography : आज अनेकजण आपल्या जीवनात आर्य चाणक्य यांची चाणक्य नीति फॉलो करतात. अगदी पैशाच्या व्यवहारांपासून ते पालकत्वापर्यंत सगळ्याच मुद्द्यांवर आर्य चाणक्य यांनी आपलं तत्वज्ञान मांडल आहे. पण आर्य चाणक्य कुणाला आपले गुरु मानायचे हे तुम्हाला माहित आहे का? 

अनेक ग्रंथांमध्ये चाणक्याचे बालपण आणि शिक्षण याविषयी सविस्तर माहिती अनेक ऐतिहासिक ग्रंथांमध्ये उपलब्ध नाही. त्यांच्या अभ्यासाबद्दल आणि गुरूबद्दल वेगवेगळ्या समजुती आहेत. चाणक्याच्या गुरूबद्दलही अनेक दंतकथा प्रचलित आहेत. काहींच्या मते त्यांचे गुरू योगी होते ज्यांनी त्यांना राजकारण आणि अर्थशास्त्राची गुंतागुंत शिकवली. या सर्व समजुती असूनही, चाणक्यच्या गुरूची ओळख आजपर्यंत एक रहस्य आहे.

आचार्य उपाधी कशी मिळाली? 
आचार्य चाणक्य यांना त्यांचे नाव गुरु चणक यांच्याकडून मिळालं होतं. 

खरं नाव? 
आचार्य चाणक्य यांच खरं नाव कौटिल्य होतं. 

शिष्याचे नाव? 
चंद्रगुप्त मौर्य आचार्य चाणक्य यांचे शिष्य होते. 

शिक्षण 
चाणक्य तक्षशिला विश्वविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे. 

चाणक्यांचे गुरु 
चाणक्यांच्या वडिलांचे नाव चणक आणि आईचे नाव चंडेश्वरी होते. असे मानले जाते की त्यांचे वडील त्यांचे गुरू होते.

करिअरची सुरुवात 
चाणक्य यांनी शिक्षकाच्या रुपात आपलं करिअर सुरु केलं होत. त्यानंतर सम्राट चंद्रगुप्त यांचे विश्वसनीय मार्गदर्शक बनले. 

जन्म कधी झाला?
आचार्य चाणक्य यांचा जन्म 350 इ.स. पूर्व एका ब्राम्हण कुटुंबात झाला. 

पत्नीचे नाव काय? 
आर्य चाणक्य यांच्या पत्नीचे नाव यशोधरा असे आहे. 

खऱ्या गुरुची लक्षणे 

चाणक्य नीतीनुसार, एक चांगला गुरु तुमचे जीवन ज्ञान आणि धर्माच्या दृष्टीने समृद्ध करू शकतो, तर एक कपटी आणि वाईट गुरू शिष्याचे जीवन उध्वस्त करू शकतो. खरे गुरू भ्रष्टाचार, लोभ, आसक्ती आणि अहंकारापासून दूर राहतात. त्यांचा उद्देश शिष्याला त्याच्या उन्नतीसाठी आणि समृद्धीसाठी तयार करणे हा आहे. खऱ्या आणि चांगल्या गुरूकडून मिळालेले मार्गदर्शन जीवनात अत्यंत मोलाचे ठरू शकते.

आचार्य चाणक्य यांच्या मते, खरा गुरू आपल्या शिष्याला आधार देतो. गुरू आपल्या चुकांमधून शिकतात आणि मग त्या चुका टाळण्यासाठी शिष्याला मार्गदर्शन करतात. तो आपल्या शिष्याच्या उणीवा ओळखतो. शिवाय, गुरू शिष्याच्या क्षमतांचा आदर करण्यास मदत करतात. तो शिष्याला त्याचे सामर्थ्य समजून घेण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करतो, जेणेकरून शिष्य त्याचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकेल.

गुरूचे कार्य केवळ शिक्षण देण्यापुरते मर्यादित नसून ते आपल्या शिष्यांना जीवनाच्या प्रत्येक बाबतीत मार्गदर्शन करतात. हे त्यांना त्यांच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि त्यांना योग्य मार्गावर चालण्यास प्रेरित करते. गुरूची जबाबदारी खूप मोठी असते, कारण तो समाज आणि राष्ट्राच्या कल्याणात महत्त्वाची भूमिका बजावतो. ते केवळ शिक्षणच देत नाहीत तर त्यांच्या शिष्यांचे चारित्र्य आणि संस्कारही करतात, ज्यामुळे समाजात चांगले नागरिक निर्माण होतात.