नवरात्रीत अनवाणी चालण्याचे धार्मिक- वैज्ञानिक कारण काय?

नवरात्रीच्या दिवसांत तुम्हीपण अनवाणी चालता काय? त्याचे फायदे-तोटेही समजून घ्या. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 8, 2024, 04:42 PM IST
नवरात्रीत अनवाणी चालण्याचे धार्मिक- वैज्ञानिक कारण काय? title=

नवरात्रीच्या वेळी रास, गरबा, हवन-पूजा, जागरण आणि नऊ रंगांची धूम असते, पण यावेळी अनेक लोक कडक उपवास करतात. काही जण तर या दिवसांमध्ये अनवाणी देखील चालतात. अनवाणी चालणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. पण नवरात्रीच्या दिवसांमध्ये अनवाणी चालताना वैज्ञानिक आणि धार्मिक कारण समजून घ्या. 

• अनवाणी चालण्याची सवय नसल्यामुळे, नवरात्रीत असे व्रत पाळल्यामुळे पायांना खूप त्रास सहन करावा लागतो. ही समस्या कमी करण्यासाठी, सकाळी सर्वप्रथम पायाची एक्सरसाईज करणे आवश्यक आहे. यामुळे पायाच्या नसा तणावमुक्त होण्यास मदत होते.

• अनवाणी चालताना पटकन चालण्याची चूक करू नका, जास्त प्रवास करू नका कारण उपवासात शरीराची ऊर्जा कमी असते, त्यामुळे जास्त चालल्याने खूप थकवा जाणवू शकतो.

. अतिशय खडबडीत रस्त्यावर कधीही अनवाणी चालू नका, म्हणजेच सपाट रस्त्यांवर चालल्याने पायांना फारसा त्रास होत नाही. त्याशिवाय, रस्त्यावरून चालताना, खाली पहा म्हणजे घाणेरड्या किंवा अडचणीच्या गोष्टींमुळे पायाला दुखापत किंवा संसर्ग होण्याचा धोका नाही.

• अनवाणी चालताना जेव्हा तुमचे पाय खूप दुखायला लागतात, तेव्हा घरी परतल्यानंतर, तुमचे पाय थोडे मीठ घालून कोमट पाण्यात बुडवून ठेवा आणि दुखण्यापासून लवकर आराम मिळेल. तुम्ही तुमच्या पायाच्या तळव्यालाही तेलाने मसाज करू शकता, यामुळे दुखण्यापासून आराम मिळतो.

• जेव्हा तुम्ही बाहेर अनवाणी फिरता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की, जेव्हाही तुम्ही घरी परतता तेव्हा सर्वप्रथम तुमचे पाय स्वच्छ पाण्याने धुवा. जर पायाला काही लागले असेल तर स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर कपड्याने पाय पुसून अँटीसेप्टिक क्रीम लावा, अन्यथा पायांना जास्त वेदना होऊन संसर्ग होण्याचा धोका असतो. रस्त्यावरून चालताना धूळ, चिखल, कचरा इत्यादींपासून काळजी घ्या.

• अनवाणी चालताना त्यामागचा वैज्ञानिक आणि धार्मिक भाव समजून घेणे आवश्यक आहे. कोणतीही कृती करताना सकारात्मक बाजू समजून घेणे अत्यावश्यक आहे. 

अनवाणी चालण्याचे दुष्परिणाम 

अनवाणी चालल्यामुळे पायाला दुखापत होऊ शकते. 
अशावेळी हील पेनची समस्या देखील जाणवते. प्लांटरफेशिआयटिस असे देखील संबोधले जाते. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)