राज्यातील ग्रामपंचायतींचा निकाल
18 Jan 2021, 13:52 वाजता
जाफ्राबाद तालुक्यातील ग्रामपंचायतींत भाजपची मुसंडी. १७ पैकी १३ ग्रामपंचायतीवर भाजप,२ वर राष्ट्रवादी,२ ग्रामपंचायती बिनविरोध. रावसाहेब दानवेंना घवघवीत यश
18 Jan 2021, 13:50 वाजता
कल्याण: म्हारळ ग्रामपंचायतमध्ये यंदा भाजपला धक्का. महाविकासआघाडीची सरशी. 17 मधील 11 जागांवर महाविकासआघाडीची बाजी. तर भाजपला 6 जागांवर यश
18 Jan 2021, 13:48 वाजता
वसई : सत्पाळा ग्रामपंचायत : मनसे, आदिवासी एकता परिषद आणि निर्भयच्या ग्राम समृद्धी पॅनलचे 11 पैकी 9 उमेदवार विजय तर बहुजन विकास आघाडी ला फक्त 2 जागा
पाली ग्राम पंचायतीमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व. 7 पैकी 6 उमेदवार बविआ कडे तर 1 जागा शिवसेनेकडे
18 Jan 2021, 13:46 वाजता
18 Jan 2021, 13:45 वाजता
नंदुरबार: नवापूर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर.14 पैकी 9 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा. तर उर्वरित ठिकाणी स्थानिक आघाडी विजय. नवापूर तालुक्यात काँग्रेसचा दबदबा कायम.
18 Jan 2021, 13:44 वाजता
रायगड: रोहा तालुक्यातील शेणवई ग्रामपंचायतीवर पहिल्यादाच भगवा. शेकापला धक्का. शिवसेनेला 5 जागा, शेकापला 4 जागा
18 Jan 2021, 13:43 वाजता
अहमदनगर : भाजपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांना धक्का.शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर, 9 पैकी 9 जागा विरोधी नंदू मुंढे यांच्या पॅनलने जिंकल्या.
18 Jan 2021, 13:42 वाजता
राळेगणसिद्धी ग्रामपंचायत निवडणूक : अण्णा हजारे यांच्या विचाराच्या राळेगण सिद्धी ग्रामविकास पॅनलकडे सर्वच्या सर्व 7 जागा. ९ पैकी 2 जागा बिनविरोध.
18 Jan 2021, 13:41 वाजता
पंढरपूरः देवडे ग्रामपंचायतीत ८५ वर्षांच्या कलावती शिंदे या भाजप परिचारक गटाकडून विजयी.
18 Jan 2021, 13:38 वाजता
अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक : नेवाळी ग्रामपंचायतीवर भाजपची बाजी, शिवसेनेला धक्का. नेवाळी ग्रामपंचायतीत 11 जागे पैकी 9 जागेवर भाजपचा विजय तर शिवसेनेचा 2 जगांवर विजय