22 Nov 2022, 23:45 वाजता
मुंबईत गोवरमुळे आणखी एका मुलाचा मृत्यू
Mumbai Measles: मुंबईत(Mumbai) गोवरमुळे आणखी एका मुलाचा मृत्यू. नालासोपारा येथील एक वर्षीय मुलाचा आज उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू, मुंबईत गोवरमुळे मृत बालकांची संख्या पोहचली अकरावर. मुंबईत सध्या गोवर रुग्णांची संख्या पोहचली 220 वर.
बातमीची लिंक- https://bit.ly/3Vo4IrD
22 Nov 2022, 23:16 वाजता
बोरिवलीत डान्सबारमध्ये छमछम सुरूच?
Dance bar in Borivali?: बोरिवलीमध्ये(Borivali) डान्सबारमधली छमछम सुरूच आहे, असं दिसतंय. मनसे नेते नयन कदम(Nayan Kadam) यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओच ट्विट केलाय आणि या डान्सबारसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवालही विचारलाय. डान्स बारचा हा व्हिडिओ समोर आल्यानं पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. मुंबईत बारमध्ये मुलींना नाचवणे आणि त्यांच्यावर पैशाची उधळण करणे या गोष्टींना कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र मुंबईच्या कस्तुरबा मार्गातील पार्कसाईट 14 ते 15 बार अवैधपणे पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असल्याचा मनसे नेते नयन कदम यांचा आरोप आहे. या व्हिडिओमध्ये दारू पिऊन झिंगलेले काही तरुण नृत्य करणाऱ्या मुलींवर पैशाची उधळण करत असल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदेंनी ठाण्यात तेरा बार तोडले आता आम्हीही बोरिवलीत बार तोडावेत का?, असा सवाल नयन कदम यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय.
बातमीची लिंक- https://bit.ly/3EvKaGF
22 Nov 2022, 22:29 वाजता
12 वी नंतरच्या ग्रॅज्युएशनसाठी चार वर्षे लागणार
UGC New Rule for graduation: पुढील शैक्षणिक वर्ष अर्थात 2023-24पासून ग्रॅज्युएशनसाठी नवा नियम लागू होतोय. 12 वीनंतर डिग्रीसाठी आता 4 वर्ष लागणार आहे. यूजीसीनं हा मोठा निर्णय़ जाहीर केलाय. देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये 12 वी नंतरच्या डिग्रीसाठी म्हणजेच ग्रॅज्युएशनसाठी चार वर्षे लागणार आहेत. याबाबतचा महत्त्वाचा निर्णय विश्वविद्यालय अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतलाय. पुढील आठवड्यापासून याबाबतची माहिती सर्व विद्यापीठांना पाठविली जाणार आहे. यामध्ये 45 केंद्रीय विद्यापीठांचा देखील समावेश आहे. तर अनेक डीम्ड टू बी विद्यापीठेदेखील हा अभ्यासक्रम स्वीकारण्यास तयार झालीयत.
बातमीची लिंक- https://bit.ly/3OqcBdL
22 Nov 2022, 20:53 वाजता
राज्यपाल कोश्यारींना हटवण्यासाठी हायकोर्टात याचिका
Petition for removal of Koshyari: महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारींना(Koshyari) पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल. राज्यपालांनी जनतेतील एकोपा आणि शांतता भंग केल्याचा याचिकेत आरोप. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा राज्यपालांनी अवमान केल्याचा याचिकेत ठपका. कलम 61 आणि 156 अंतर्गत राज्यपालांना हटवण्याचा निर्णय घेण्याची या याचिकेत मागणी. याचिकाकर्ते दीपक दिलीप जगदेव यांच्या वतीने ऍड नितीन सातपुते दाखल केली आहे याचिका. मुंबई उच्च न्यायालयानं दाखल करून घेतली याचिका. लवकरच सदर याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता.
बातमीची लिंक- https://bit.ly/3VeDyDX
22 Nov 2022, 19:44 वाजता
हार्ट ऑपरेशनसाठीचे स्टेंट होणार स्वस्त
Stents for heart surgery will be cheaper: हृदयविकार रुग्णांसाठी जीवरक्षक ठरणाऱ्या स्टेंटच्या(stent) किंमती लवकरच कमी होणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जीवनावश्यक औषधांच्या यादीत स्टेंटचा समावेश केलाय. केंद्र सरकारनं हा मोठा धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळं हार्ट ऑपरेशनमध्ये वापरलं जाणार स्टेंट स्वस्त होणाराय.भारतीय कायद्यानुसार स्टेंट हे औषध-नियंत्रण कायद्याच्या कक्षेत येते. ते जीवरक्षक असल्याने त्याचा समावेश आवश्यक औषधांच्या यादीत करून त्यांच्या किमतींवर नियंत्रण आणावे, अशी मागणी होती. सरकारच्या निर्णयानंतर आता स्टेंटच्या किमती लवकरच जाहीर केल्या जातील, असे सूत्रांनी स्पष्ट केलंय.
बातमीची लिंक- https://bit.ly/3GCD0Ty
22 Nov 2022, 18:06 वाजता
अर्जेंटिनाचा सलामीच्या लढतीतच पराभव
FIFA 2022 Argentina Vs Saudi Arabia: फिफा वर्ल्डकपमधला पहिला धक्कादायक निकाल, अर्जेंटिनाचा (Argentina) सौदी अरेबियाने (Saudi Arabia) केला 2-1नं पराभव. अर्जेंटिनाला सलामीच्या लढतीत पराभवाचा धक्का, अर्जेंटिनाकडून एकमेव गोल मेस्सीकडूनच. एका गोलने पिछाडीनंतर सौदी अरेबियाने 2-1 ने मिळवला विजय.
बातमीची लिंक- https://bit.ly/3i32mzY
22 Nov 2022, 17:16 वाजता
पुण्यात रिक्षाचालकांचा संप
Pune Auto Rikshaw Strick: पुण्यात 28 नोव्हेंबरपासून ऑटो रिक्षाचा बेमुदत संप. बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात रिक्षाचालक आक्रमक. बेकायदा बाईक टॅक्सी बंद व्हावी म्हणून 28 नोव्हेंबरपासून पुण्यासह(Pune) पिंपरी चिंचवडमध्ये(Pimpri-Chinchwad) रिक्षचालकांचं "रिक्षा बेमुदत बंद" आंदोलन. संपात एकूण 12 रिक्षाचालक संघटना सहभागी होणार. 50 ते 60 हजार रिक्षाचालक होणार संपात सहभागी. अनेकवेळा निवेदन देऊन सुध्दा सरकार ऐकत नसल्याने रिक्षाचालकांच बेमुदत बंद, मागण्या मान्य होईपर्यंत रिक्षा सुरू करणार नाही, रिक्षाचालकांची माहिती.
बातमीची लिंक- https://bit.ly/3V0gngc
22 Nov 2022, 16:19 वाजता
'POKमध्ये ऑपरेशनसाठी तयार'
Indian Army ready for operation in POK: 'भारतीय सेना POKमध्ये ऑपरेशनसाठी तयार', नॉदर्न कमांडचे GOC लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं मोठं विधान. POKमध्ये कारवाई करण्यासाठी सेना सज्ज, फक्त सरकारच्या आदेशाची वाट पाहतोय असं उपेंद्र द्विवेदी यांचं विधान.
बातमीची लिंक- https://bit.ly/3tTz0GV
22 Nov 2022, 15:15 वाजता
नागपुरातील गांजाचं ओडिशा कनेक्शन
Nagpur Drugs Racket : नागपुरातील कापसी भागात जप्त करण्यात आलेल्या गांजा रॅकेटचा (Drugs Racket Expose) पोलिसांनी पर्दाफाश केलाय.. यातील मुख्य तस्कराला पोलिसांनी तेलंगणातून (Telangana) अटक केलीये..बाबुराव कामापर्थी असं या गांजा तस्कराचं नाव आहे... तो ओडिशातील (Odisha) गांजा नागपूरमार्गे मराठवाड्यात पाठवत होता.. यासाठी तो सेंद्रीय खतांच्या गोण्यांचा वापर करायचा... नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) केलेल्या कारवाईत त्याच्याकडून ट्रक भरुन गांजा जप्त केलाय.. या गांजाची बाजारातील किंमत 2 कोटी 33 लाखांच्या घरात आहे.
22 Nov 2022, 14:34 वाजता
टीम इंडियाचं टी-20 सीरिज जिंकण्याचं लक्ष्य
India vs New Zealand 3rd T-20 : न्यूझीलंडनं अखेरच्या टी-20मध्ये टीम इंडियासमोर 161 रन्सचं टार्गेट ठेवलंय. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर अर्शदीप सिंगनं (Arshdeep Singh) 3 विकेट्स घेत किवींची इनिंग रोखली. न्यूझीलंडनं (New Zealand) प्रथम बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 160 रन्सपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडतर्फे डिवॉन कॉन्वे (Devon Conway) 59 तर ग्लेन फिलिप्सनं (Glenn Phillips) 54 रन्सची खेळी केलीय.. न्यूझीलंडचे इतर बॅटर टीम इंडियासमोर ढेपाळले. आजची मॅच जिंकून सीरिज जिंकण्याची टीम इंडियाकडे (Team India) संधी आहे.