Maharashtra News Updates | Marathi News LIVE : एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

Latest Maharashtra News : Marathi Live News : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, राजकीय, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे वेगवान live अपडेट्स

Maharashtra News Updates | Marathi News LIVE : एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

22 Nov 2022, 13:35 वाजता

सेक्सटॉर्शन रॅकेटचा मास्टरमाईंडला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सांगितला अटकेचा थरार.

 

Pune Sextortion Racket : ऑनलाईन सेक्सटॉर्शनद्वारे खंडणी मागणाऱ्या मास्टरमाईंडला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. दत्तवाडी पोलिसांनी या सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश केलाय. राजस्थानचं (Rajasthan) गुरुकोठडी गावाचा या संपूर्ण सेक्सटॉर्शनमध्ये समावेश असल्याचं समोर आलंय. आरोपींना पकडायला पोलीस वेशांतर करुन गावात पोहोचले.. तेव्हा त्यांच्यावर दगडफेक (Stone Pelting On Police) करण्यात आली. पोलिसांनी जीवावर उदार होत तब्बल अडीच किलोमीटर पाठलाग करत आरोपीच्या मुसक्या (MasterMind Arrest) आवळल्या... झारखंडमधल्या जमतारा गावासारखीच राजस्थानच्या या गावातल्या तरुणांना ऑनलाईन सेक्सटॉर्शनचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. पीडित लोकांना न्यूड फोटो पाठवून मग ब्लॅकमेल करण्याचा खेळ सुरु व्हायचा... 28 डिसेंबरला पुण्याच्या दत्तवाडी परिसरात सेक्सटॉर्सनला बळी पडलेल्या एका युवकानं आत्महत्या केली होती.

बातमी पाहा - ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनद्वारे खंडणी मागणाऱ्या मास्टरमाइंडला अटक

22 Nov 2022, 12:15 वाजता

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, दाऊदच्या हस्तकांकडून हल्ल्याचा कट असल्याचा मुंबई पोलिसांना ऑडिओ मेसेज

 

Prime Minister Narendra Modi Therat Message : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय...मुंबईतील वाहतूक पोलिसांच्या (Mumbai RTO) नंबरवर 7 ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून धमकी देण्यात आलीय...अंडरवर्ल्ड दाऊदचे (Dawood Ibrahim) हस्तक मोदींवर (Narendra Modi) हल्ला करणार असल्याचा धमकी देणा-याने दावा केलाय...मुस्तफा अहमद आणि नवाज अशी धमकी देणा-या व्यक्तीने नाव सांगितलीयत...तपासात धमकी देणा-याची ओळख पटली असून तो मानसिक रुग्ण असल्याचे समोर आलंय...ऑडिओ क्लिपसोबत इतरही काही कागदपत्र पाठवले होते...त्याची शहानिशा पोलिसांकडून केली जातेय...धमकी देणारा हा बिस्मा डायमंड कंपनीत दोन वर्षापूर्वी कामाला होता...त्याला कामावरून कमी केल्याची माहिती आहे...

बातमी पाहा - नरेंद्र मोदींना कोणी दिलीय जीवे मारण्याची धमकी?; घ्या जाणून

22 Nov 2022, 11:34 वाजता

रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याची आफताबची साकेत कोर्टात कबुली.

 

Shraddha Walkar Murder Update : आफताबने दिल्लीच्या साकेत कोर्टात धक्कादायक कबुली दिलीय. रागाच्या भरात श्रद्धाची (Delhi Crime News) हत्या केल्याचं आफताबनं न्यायमूर्तींसमोर कबूल केलंय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे आफताबला (Aftab) आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं, तेव्हा त्याने ही कबुली दिलीय. दरम्यान आफताबच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ करण्यात आलीय. आफताबची आता पॉलीग्राफ टेस्टही (Polygarph test) केली जाणार आहे. दिल्ली पोलिसांना त्यासाठी न्यायालयानं परवानगी दिली आहे. आफताब चौकशीत अनेक प्रश्नांची उत्तर चुकीची देतोय. त्यामुळे आफताबची नार्को टेस्ट केली (Narco Test) जाणार आहे. पण पॉलिग्राफ झाल्यानंतरच नार्को टेस्ट करण्यात येते. त्यासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी मागितली होती. 

बातमी पाहा - होय! मीच ठार केलं; Shradha Walkar ला जीवे मारणाऱ्या क्रूरकर्मा आफताबची न्यायालयात कबुली

 

22 Nov 2022, 10:56 वाजता

राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार?

 

Maharashtra Political News : राज्यात मध्यावधी निवडणूक लागण्याचे संकेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी (raosaheb danve) दिलेयत...मविआ सरकार (MVA Government) जाईल असं कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले...यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही...सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलीय...त्यामुळे जनतेची कामे करा, असा सल्ला दानवेंनी कार्यकर्त्यांना दिलाय...तर शिंदे फडणवीस सरकार 100 टक्के (Shinde-Fadanvis Government) पडणारच असं राऊतांनी (Sanjay Raut) म्हटलंय...त्यामुळे राज्यात मध्यावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय...

बातमी पाहा - राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार? रावसाहेब दानवे काय म्हणाले?

22 Nov 2022, 10:02 वाजता

इराणमधील हिजाबवादाचे कतार फिफा वर्ल्ड कपमध्ये पडसाद

 

Iran HIjab controversy : इराणमधल्या हिजाबविरोधी आंदोलनाची धग कतारमधल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये (Qatar Fifa World Cup 2022) पोहोचलीय. इराण विरुद्ध इंग्लंड मॅच (Iran vs England Match) सुरु होण्याआधीच चर्चेत राहिली. कारण इराणच्या फुटबॉल टीमने (Iran Football Team) आपल्याच देशाचं राष्ट्रगीत (Iran National Anthem) म्हणण्यास नकार दिला. राष्ट्रगीत सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत हे खेळाडू शांतपणे उभे राहिले आणि इराण सरकारविरोधी आंदोलनाला आपला पाठिंबा दाखवला.. गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये हिजाबविरोधात (Iran HIjab controversy) आंदोलन सुरु आहे. त्यातच आता फुटबॉलपटूंच्या या कृत्यामुळे ही आग आणखी भडकण्याची शक्यता आहे.

बातमी पाहा - राष्ट्रगीतावेळी इराणी खेळाडूंची 'ती' कृती चर्चेत; सरकारच्या 'या' गोष्टीला दर्शवला विरोध

 

 

22 Nov 2022, 09:37 वाजता

पुण्यात गुंडांची दहशत, दुकांनाची तोडफोड करत पैशांची मागणी

 

Pune Gang Terror :  मुंढवा (Mundhwa) केशवनगर भागात गुंडांनी दहशत माजवलीये. काही गुंडांनी धारदार शस्त्र (Goon Terror) घेवून दुकान फोडलंय. मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजरोसपणे गाड्यांची तोडफोड (Vandalism of vehicles) करण्यात आली. नागरिकांना धमकी देवून पैशाची मागणीही करण्यात आली. रात्रीच्या सुमारास ह्या गुंडांनी शस्त्राचा धाक दाखवत दुकानाची तोडफोड केली. त्यामुळे व्यापारी संघटना आक्रमक झालीये. गुंडांवर कडक कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा इशारा व्यापारी संघटनेनं दिलाय.

बातमी पाहा - पुण्यात गुंडांची दहशत; दुकानांची तोडफोड करत पैशांची मागणी; पाहा व्हिडिओ

 

22 Nov 2022, 09:21 वाजता

नवले पूल येथे अपघात, अखेर फरार चालकाला अटक

 

Pune Navale Bridge Accident Update : पुण्यातील नवले पुल अपघातातील कंटेनर चालकाला (Container Driver Arrest) सिंहगड पोलिसांनी अटक केलीय...मनीराम यादव (Maniram Yadav) असं कंटेनर चालकांचं नाव आहे...आरोपी मनीरामने उताराला कंटेनर बंद करून चालवल्याने नियंत्रण सुटून अपघात झाल्याचं समोर आलंय...या अपघातात 48 गाड्यांना कंटेनरने धडक दिली...यात सुमारे 40 ते 50 जण (40 to 50 People Injured)जखमी झाले...तर गाड्यांचं प्रचंड नुकसान झालंय...या घटनेनंतर आरोपी चालक फरार झाला होता...पण, त्याला चाकणच्या नाणेकरवाडीतून पोलिसांनी अटक केलीय...

बातमी पाहा - नवले पूल येथे अपघात, अखेर फरार चालकाला अटक

 

22 Nov 2022, 09:17 वाजता

मुंबई, मालेगावपाठोपाठ नाशिकमध्ये गोवरचा धोका.

 

Measles Outbreak : मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील गोवरचा धोका वाढलाय. नाशिकमध्ये गोवरचे 4 रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागात खळबळ उडालीय. संशयित चार बालकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईच्या लॅबमध्ये पाठविलेत.
लहान बालकांची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. नाशिकमध्ये गोवरचा धोका वाढू नये म्हणून आरोग्य विभाग सतर्क झालाय.

22 Nov 2022, 08:20 वाजता

राज्यभरात हाडं गोठवणारी थंडी

 

Maharashtra Cold Wave : राज्यभरात गारठा (Cold Wave) वाढलाय. सरासरीच्या तुलनेत तापमानात मोठी घट झाली असून, पुण्यात (Pune) दहा वर्षांतील सर्वाधिक थंडी पडलीय. तर जळगावात (Jalgaon) नीचांकी 8.2 अंश सेल्सिअस तापमान आहे...मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidharba) तापमानातील मोठी घट झालीय...मुंबईसह कोकण विभागातही (Mumbai And Konkan Cold Wave) थंडीचा कडाका पडला असून, राज्यभरात हाडं गोठवणारी थंडी पडलीय...

बातमी पाहा - राज्यभरात थंडीचा कडाका वाढला! कोणत्या जिल्ह्यांचा किती पारा?

 

22 Nov 2022, 08:12 वाजता

इंडोनेशियात भूकंपामुळं 162 जणांचा मृत्यू, 700 जण जखमी

 

Indonesia Earthquake : इंडोनेशियातील जावा बेट भूकंपानं (Earthquake) हादरलंय...5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आल्याने 162 जणांचा मृत्यू (162 deaths) झालाय...तर 700 पेक्षा अधिक लोक (700 people injured) जखमी झालेयत...भूकंपाच्या धक्क्याने हजारो घरं कोसळलीयत...भूकंपामुळे मोठी हानी झाली असून, जखमींवर उपचार सुरू आहेत...

बातमी पाहा - अतिप्रचंड भूकंपात 162 मृत्यू; कावऱ्याबावऱ्या नागरिकांचे चेहरे काळजात धस्स करणारं