22 Nov 2022, 08:08 वाजता
अनिल परबांच्या साई रिसॉर्टवर आज हातोडा?
Kirit Somaiya on Anil Parab (Maharashtra Political News Live) : रत्नागिरीत दापोलीतल्या साई रिसॉर्टवर (Sai Resort) कारवाईसंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) ट्विट करून माहिती दिलीय. दापोली साई रिसॉर्टवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय...यासाठी सकाळी 10 वाजता दापोली पोलीस स्टेशनला सोमय्या जाणार आहेत...त्यामुळे आजच साई रिसॉर्टवर हातोडा पडणार का याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.
बातमी पाहा - अनिल परब याच्या साई रिसॉर्टवर कारवाई होणार? किरीट सोमय्या काय केलं ट्विट?
22 Nov 2022, 08:00 वाजता
6 महिन्यांच्या बालकांना गोवरची लस देण्याची शक्यता
Measles Outbreak : मुंबईसह राज्यातल्या विविध भागात गोवरचा (Measles Outbreak) उद्रेक पाहायला मिळतोय. त्यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालय अॅक्शन मोडवर आलंय. सहा महिन्यांच्या बालकांनाही आता गोवरची लस (Measles Vaccine) देण्याचा विचार केंद्र सरकार (Central Government) करतंय. सध्या गोवरची लस देण्याची वयोमर्यादा ही 9 महिने आहे. पण ती 3 महिन्यांनी कमी करुन सहा महिन्यांपर्यंत आणण्याचा विचार सुरु आहे. शून्य ते नऊ महिन्यांच्या आतल्या म्हणजे लसीकरण न झालेल्या बालकांना संसर्ग होत असल्यानं पालकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर निर्णय घेऊ अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी दिलीय.
बातमी पाहा - गोवरचा उद्रेक! सहा महिन्यांच्या बालकांनाही गोवरची लस?; भारती पवारांची माहिती
22 Nov 2022, 07:55 वाजता
लहान मुलांप्रमाणे वृद्धांना गोवरचा धोका
Measles Outbreak in Mumbai : गोवरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. 18 वर्षांवरील दोन संशयित रुग्ण आढळून आलेत. लहान मुलांप्रमाणेच 70 वर्षांवरील ज्येष्ठांनाही (Senior Citizen) गोवरची लागण होण्याची शक्यता निर्माण झालीय. बालकांचं लसीकरण सुरूय. मात्र वयोवृद्ध व्यक्तींना सध्या तरी कुठलीही लस देण्याच्या सूचना दिलेल्या नाहीत. वृद्धांना मधुमेह (Diabetes) किंवा रक्तदाब (Blood pressure) असल्यास त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. मुंबईतील गोवरचा वाढता धोका लक्षात घेता ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झालीय.
22 Nov 2022, 07:48 वाजता
संभाजीनगरमध्ये प्रेम प्रकरणातून पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू, तरुणीसुद्धा गंभीर जखमी..
Sambhajinagar Burn : संभाजीनगरात (Sambhajinagar) प्रेम प्रकरणातून स्वत:ला पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झालाय. प्रियकरानं प्रेयसीला जाळल्याचा धक्कादायक प्रकार काल समोर आला होता. 50 टक्के भाजलेल्या तरुणीवर उपचार सुरू आहे...मृत गजानन मुंडे (Gajanan Munde) हा तरुण संभाजीनगरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात पीएचडी करत होता. त्याचं तरुणीवर प्रेम होतं. पण, तरुणीनं लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागात तरुणाने तरुणीला पेटवलं आणि स्वत:लाही पेटवून घेतलं...आणि नंतर तरुणीला मिठी (Boy Burnt Himself and Hugged Girls) मारली. त्यामध्ये तरुणीही 50% भाजलीय. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत...पण, जळीत प्रकरणात मृत गजानन मुंडेच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल झालाय...आई वडिलांनी लग्न करण्यासाठी तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा जबाब तरुणीनं दिलाय...यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय...
बातमी पाहा - संभाजीनगरमधील जळीत प्रकरणातील तरुणाचा मृत्यू! तरुणीची स्थिती कशी?
22 Nov 2022, 07:42 वाजता
टीम इंडियाचं टी-20 सीरिज जिंकण्याचं लक्ष्य
India vs New Zealand 3rd T-20 : नेपियरमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात आज शेवटची टी-20 मॅच रंगणार आहे. दुसऱ्या टी-20मध्ये सूर्यकुमार यादवची तडाखेबंद बॅटिंग आणि त्यानंतर दीपक हुडाच्या बॉलिंगसमोर न्यूझीलंडची (New Zealand) दाणादाण उडाली होती. सध्या टीम इंडिया सीरिजमध्ये (Team India) 1-0 नं आघाडीवर आहे.. दुसरीकडे न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) शेवटच्या आजच्या टी-20 मॅचला मुकणार आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टीम साऊथी (Tim Southee) न्यूझीलंडचं नेतृत्व करेल.. त्यामुळं आजची मॅच जिंकून सीरिज जिंकण्याच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरेल.. तर आजची मॅच जिंकून सीरिज बरोबरीत करण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल.