MVA Mumbai Morcha LIVE Updates : महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल मोर्चा आहे. या मोर्चात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. भायखळा एटीएस कार्यालय समोर मोर्चासाठी सकाळी 10 वाजता कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. मविआचा तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते जमवण्याचा प्रयत्न आहे. मविआचे प्रमुख नेते मोर्चात सहभागी झालेत. आणि जे जे फ्लायओव्हरवरुन हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ येऊन थांबणार आहे. या मोर्चात समाजवादी पक्षाचे मुस्लीम कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात हा हल्लाबोल मोर्चा.
17 Dec 2022, 08:30 वाजता
पुणे जिल्ह्यातूनही कार्यकर्ते मुंबईत दाखल
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाविकासआघाडीकडून राज्य सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात येतोय. त्यासाठी पुणे जिल्ह्यातूनही कार्यकर्ते दाखल होतायत. पुण्याच्या केसनंद गावातून मोहन यादव हे आपला मुलगा उद्धवसह बाईकचा रथ करुन मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झालेत.
17 Dec 2022, 08:30 वाजता
पुणे जिल्ह्यातूनही कार्यकर्ते मुंबईत दाखल
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाविकासआघाडीकडून राज्य सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात येतोय. त्यासाठी पुणे जिल्ह्यातूनही कार्यकर्ते दाखल होतायत. पुण्याच्या केसनंद गावातून मोहन यादव हे आपला मुलगा उद्धवसह बाईकचा रथ करुन मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झालेत. तसेच बारामतीमधूनही कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत.
17 Dec 2022, 08:28 वाजता
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : नाशिकमधून कार्यकर्ते मविआच्या हल्लाबोल मोर्चासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेयत...यावेळी हजारो कार्यकर्ते मुंबईत येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
17 Dec 2022, 08:27 वाजता
मुंबईत 2500 पोलीस बंदोबस्तासाठी
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाविकास आघाडीच्या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत अडीच हजार पोलीस बंदोबस्त होणार तैनात करण्यात आलेत.
17 Dec 2022, 08:23 वाजता
Maha Vikas Aghadi Morcha LIVE Updates : 10 च्या सुमारास जे जे ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार. महामोर्चासाठी 10वाजण्याच्या सुमारास ब्रिजवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. सध्या वाहतूक सुरळीत सुरु आहे.
17 Dec 2022, 08:05 वाजता
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : मोर्चासाठी वाहतूक बदल करण्यात आले असून पर्यायी मार्ग असे असणार आहेत.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी गॅस कंपनी चिंचपोकळी पुलावरून ऑर्थर रोड-सात रस्ता सर्कल - मुंबई सेंट्रल - डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग - ऑपेरा हाऊस महर्षी कर्वे रोडचा (क्वीन्स रोड) वापर करावा. किंवा सात रस्ता सर्कल - मुंबई सेंट्रल-ताडदेव सर्कल - नाना चौक एन. एस. पुरंदरे मार्ग या मार्गाचासुद्ध वापर करावा.
- भायखळा येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता डॉ. बी. ए. रोड खडा पारसी नागपाडा जंक्शन- दोन टाकी जंक्शन- जे. जे. जंक्शन महम्मद अली रोड याचा वापर करावा. किंवा नागपाडा जंक्शन मुंबई सेंट्रल-ताडदेव सर्कल- नाना चौक- एन. एस. पुरंदरे मार्ग या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
- लालबाग येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता बावला कम्पाउंड टी.बी. कदम मार्गाने व्होल्टास कंपनी उजवे वळण तानाजी मालुसरे मार्ग अल्बर्ट जंक्शन-उजवे वळण बॅरिस्टर नाथ पै मार्गाचा वापर करावा.
- मध्य मुंबईकडून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी चार रस्ता आर. ए. किडवाई मार्गाने बॅरिस्टर नाथ पै मार्गाने पी.डीमेलो रोडचा वापर करावा.
- नवी मुंबई, पुणे, ठाणे व नाशिक येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता देवनार आयओसी जंक्शन पूर्व मुक्त मार्ग पी. डिमेलो रोडचा वापर करावा. किंवा नवी मुंबई व पुणे येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता चेंबूर पांजरपोळ जंक्शन पूर्व मुक्त मार्ग पी. डिमेलो रोड याचा वापर करावा.
- दक्षिण मुंबई येथून उत्तर आणि पश्चिम मुंबईकरिता महापालिका मार्ग मेट्रो जंक्शन जगन्नाथ शंकर शेठ रोड- प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पूल मरिन ड्राइव्ह मार्ग याचा वापर करावा.
- दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबई तसेच नवी मुंबई, पुणे, ठाणे व नाशिककरिता पी.डिमेलो रोडचा वापर करून पूर्व मुक्त मार्ग इच्छितस्थळी जाऊ शकतात.
- दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबईकरिता मरिन ड्राइव्ह - ऑपेरा हाऊस - लिमॅंग्टन रोड - मुंबई सेंट्रल सात रस्ता चिंचपोकळी डॉ. बी. ए. रोड याचा वापर करावा. महर्षी कर्वे रोड / मरिन ड्राइव्ह नाना चौक ताडदेव सर्कल मुंबई सेंट्रल सात रस्ता चिंचपोकळी किंवा डॉ. बी. ए. रोड याचा वापर करावा.
- सीएसएमटी स्टेशनकडून पायधुनी, भायखळा, नागपाडा येथे जाण्याकरिता महापालिका मार्ग मेट्रो जंक्शन- एल. टी. मार्ग चकाला डावे वळण जी.जे. जंक्शन दोन टाकी नागपाडा जंक्शन खडा पारसी जंक्शनपुढे जाता येईल.
17 Dec 2022, 07:45 वाजता
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महापुरुषांविषयी सत्ताधाऱ्यांच्या बेताल वक्तव्यातून त्यांचा केलेला अवमान, बेरोजगारी अशा असंख्य गोष्टींचा जाब या राज्य सरकारला विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून 'महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल' हा मोर्चा पुकारण्यात आला आहे. याचा एक टिझर प्रकाशित करण्यात आलाय.
महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महापुरुषांविषयी सत्ताधाऱ्यांच्या बेताल वक्तव्यातून त्यांचा केलेला अवमान, बेरोजगारी अशा असंख्य गोष्टींचा जाब या राज्य सरकारला विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून 'महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल' हा मोर्चा पुकारण्यात आला आहे. pic.twitter.com/vJ6wq6ZKFc
— NCP (@NCPspeaks) December 16, 2022
17 Dec 2022, 07:43 वाजता
मविआच्या मोर्चासाठी वाहतुकीत बदल
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : मोर्चाच्या ठिकाणच्या मार्गिका वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. मुंबईकरांनो पर्यायी मार्गांचा करा वापर, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे. मविआच्या महामोर्चासाठी मार्गात बदल केलेयत. रिचर्डसन्स क्रुडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल डॉ. दादाभाई नौरोजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गिका बंद असतील. भायखळ्यातून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या मार्गात बदल केलाय. भायखळा, लालबागमधूनही दक्षिण मुंबईकडे जाणा-या मार्गात बदल केला आहे.
17 Dec 2022, 07:41 वाजता
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल मोर्चा आहे. (Maharashtra Political News) या मोर्चात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. भायखळा एटीएस कार्यालय समोर मोर्चासाठी सकाळी 10 वाजता कार्यकर्ते जमण्यास सुरुवात होणार आहे. मविआचा तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते जमवण्याचा प्रयत्न आहे. मविआचे प्रमुख नेते 12 वाजेपर्यंत मोर्चाला येतील आणि जे जे फ्लायओव्हरवरुन हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ येऊन थांबणार आहे. या मोर्चात समाजवादी पक्षाचे मुस्लीम कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची शक्यताय. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात हा हल्लाबोल मोर्चा होणार आहे.
17 Dec 2022, 07:39 वाजता
Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाराष्ट्राचा वारंवार अपमान करणाऱ्या महाराष्ट्रविरोधी लोकांविरुद्ध महाविकास आघाडीच्या विशाल मोर्च्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. (Maharashtra Political News) आज सकाळी हा विराट मोर्चा निघणार आहे. तयारीला लागा, असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे.