Maharashtra News Updates | Marathi News LIVE : एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

Latest Maharashtra News : Marathi Live News : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, राजकीय, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे वेगवान live अपडेट्स  

Maharashtra News Updates | Marathi News LIVE : एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

27 Nov 2022, 22:40 वाजता

बल्लारपूर रेल्वे स्थानकात पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू

Chandrapur slab collapsed : चंद्रपूरच्या बल्लारपूर (Ballarpur)रेल्वे स्थानकात पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय तर 13 प्रवासी जखमी झाले. 2 जण गंभीर जखमी आहेत. मरण पावलेल्या महिलेचं नाव निलिमा  रंगारी असं आहे. 48 वर्षीय निलिमा रंगारी शिक्षिका होत्या. रेल्वे प्रशासनानं गंभीर जखमींना एक लाखांची तर किरकोळ जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केलीय. काजीपेठ पॅसेंजर येणार असल्यानं प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी झाली होती. मोठ्या संख्येनं लोक पादचारी पुलावर होते. त्याचवेळी पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला. काही प्रवाशांना ओव्हरहेड वायरचा स्पर्श झाला. दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकात एकच धावपळ उडाली. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या ओव्हर हेड वायरसह पादचारी पुलाचा भाग पुन्हा एकदा दुरुस्त करण्याची तयारी सुरू आहे.

बातमीची लिंक - https://bit.ly/3VesjuU

 

27 Nov 2022, 20:09 वाजता

Raj Thackeray Live(Maharashtra Political News) : राहुल गांधी म्हणजे म्हैसूर सँडल सोप- राज ठाकरे, सावरकरांबाबत बोलायची लायकी आहे का? दयेचा अर्ज ही सावरकरांची रणनीती, रणनीती कळत नाही तो गुळगुळीत मेंदूचा. सावरकरांवरील विधानावरून राज ठाकरेंचा राहुल गांधींवर घणाघात.

बातमीची लिंक - https://bit.ly/3u40xW9

 

27 Nov 2022, 19:40 वाजता

Raj Thackeray Live(Maharashtra Political News) : कुणीही येऊन काहीही बरळतंय, कोश्यारींचं वय काय बोलतात काय? महाराष्ट्र काय आहे हे कोश्यारींनी सांगू नये. तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात? राज ठाकरेंचा कोश्यारींना सवाल. राज्यातील राजकारणाचा दर्जा घसरलाय- राज ठाकरेंची टीका.  राज्यातला मंत्री महिलांचा अपमान करतो, देशातलं वातावरण बिघडलंय- राज ठाकरे.

बातमीची लिंक - https://bit.ly/3u40xW9

27 Nov 2022, 19:18 वाजता

Raj Thackeray Live(Maharashtra Political News) : आमच्या आंदोलनाला यश तरीही आम्हालाच प्रश्न- राज ठाकरे, आमचं आंदोलन देश फोडण्यासाठी नव्हतं, 'मुख्यमंत्रिपदावर असताना तब्येतीचं कारण सांगायचे', हिंदुत्व, हिंदुत्व म्हणणारे कुठे गेले होते? राज ठाकरे यांचा सवाल. एकनाथ शिंदेंनी रात्रीतून कांडी फिरवली, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला. कट्टर हिंदुत्ववादी घरात माझा जन्म, भोंगे उतरावावे ही बाळासाहेबांची इच्छा, मनसेने मशिदीवरील भोंगे उतरवले- राज ठाकरे. भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक.

बातमीची लिंक - https://bit.ly/3u40xW9

27 Nov 2022, 19:13 वाजता

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मनसे कार्यकर्त्यांना कानमंत्र

Raj Thackeray Live(Maharashtra Political News) : मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं (Raj Thackeray)मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, प्रत्येक गटाध्यक्ष हा राज ठाकरे असतो- राज ठाकरे. महाराष्ट्राचा सगळ्या बाजूंनी खोळंबा, वातावरणात निवडणूक दिसत नाही- राज ठाकरे. मनसेच्या आंदोलनाला सर्वाधिक यश- राज ठाकरे.

बातमीची लिंक - https://bit.ly/3u40xW9

27 Nov 2022, 18:34 वाजता

चंद्रपूरच्या बल्लारपूर रेल्वे स्थानकात पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला

Chandrapur slab collapsed: चंद्रपूर- बल्लारपूर (Ballarpur)  रेल्वे स्थानकावर रेल्वे फुट ओवर ब्रिजचा स्लॅब कोसळला, प्रवासी पायी चालत असलेल्या एक स्लॅब कोसळून 13 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती, जखमींमध्ये 3 महिलांचा समावेश, काजीपेठ पॅसेंजर स्थानकावर येणार असल्यानं प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी झाली होती. काही प्रवाशांना ओव्हरहेड वायरचा अतिउच्च दाबाचा स्पर्श झाल्याने त्यांना गंभीर इजा झाल्याची प्राथमिक माहिती, बल्लारपूर रेल्वे स्थानकाचे अधिकारी कर्मचारी या सर्व जखमी प्रवाशांना करत आहेत मदत, सध्या बल्लारपूर रेल्वे स्थानक व ग्रामीण रुग्णालय परिसरात गर्दी, या भागात आणखी अपघात व चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पथक तैनात.

27 Nov 2022, 18:12 वाजता

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

Meeting of MNS group presidents: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) थोड्याच वेळात तोफ धडाडणार आहे. मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत...मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा गटाध्यक्षांचा मेळावा महत्त्वाचा आहे. पण, सीमा वाद, राज्यपालांचं शिवाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य यावर राज ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. 

बातमीची लिंक- https://bit.ly/3APuQUb

27 Nov 2022, 17:08 वाजता

आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची मुख्यमंत्री बिस्वांची ग्वाही

Chief Minister Shinde group arrived in Mumbai : गुवाहाटी दौरा आटपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत परतलेत. कामाख्या देवी दर्शन यात्रा सफल झाल्याचा एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) दावा. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिल्याची मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. या दौऱ्यात आसामच्या मुख्यमंत्र्यांसोबत आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याबाबत चर्चा झाली असून मुख्यमंत्री बिस्वा सकारात्मक असल्याची माहिती एकनाथ शिदेंनी दिलीय. कामाख्या देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक गुवाहाटीला जातात. महाराष्ट्र भवनाच्या वास्तूमुळे या भाविकांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील असा विश्वास एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवलाय (Maharashtra Political News). 

बातमीची लिंक- https://bit.ly/3gCuNV5

27 Nov 2022, 15:23 वाजता

आफताब तिहार जेल क्रमांक 4 मध्ये ठेवणार  

Shraddha Walker Murder Case Update : श्रद्धाचा मारेकरी आफताबची तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात आलीये..आफताबला जेल क्रमांक 4 मध्ये ठेवण्यात आलंय. जेलमध्ये आफताबवर 24 तास सीसीटीव्हीची करडी नजर ठेवण्यात येणार आहे. जेलच्या वॉर्डनं इतर कैद्यांपासून त्याला दूर ठेवलंय. त्याच्या खाण्यापीण्यावरही पोलीस करडी नजर ठेवून आहेत. पोलिसांच्या समोरच त्याला जेवण दिलं जातं. दरम्यान रात्रभर तो ब्लँकेट घेऊन आरामात झोपला होता अशी माहिती पोलिसांनी दिलीये

27 Nov 2022, 14:59 वाजता

बीएमसी मुंबईत दीड लाख मुलांना देणार अतिरिक्त लस

Mumbai Measles Vaccination  :  मुंबईतील गोवरचा फैलाव रोखण्यासाठी आता बीएमसीने जोरदार तयारी केलीय. मुंबईत जवळपास दीड लाख बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्याचा निर्धार बीएमसीने केलाय. त्यासाठी बीएमसीने दीड लाख मुलांच्या नावांची यादीच तयार केलीय. राज्य सरकारकडून परवानगी आल्यावर बीएमसीने तातडीने ही यादी तयार केलीय. जिल्हापातळीवर टास्कफोर्स तयार करून गोवरच्या स्थितीचा सतत आढावा घेतला जाईल. मुंबईत दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये गोवरचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे या भागांमध्ये बीएमसी अतिरिक्त लसीकरण करण्याची शक्यता आहे. सोमवारपासूनच ही मोहीम सुरू करण्याचे बीएमसीचे प्रयत्न आहेत. 

बातमी पाहा-  https://bit.ly/3ODicgX