Maharashtra News Updates | Marathi News LIVE : एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

Latest Maharashtra News : Marathi Live News : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, राजकीय, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे वेगवान live अपडेट्स  

Maharashtra News Updates | Marathi News LIVE : एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

27 Nov 2022, 10:18 वाजता

Sanjay Raut Live (Maharashtra Political News) : 'शिंदे सरकारला खोके सरकार म्हणून मान्यता मिळली आहे',संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला;नवी मुंबईत आसाम भवन आहे, महाराष्ट्राला; कोणी जागा देणार आहे का? संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल.

27 Nov 2022, 08:22 वाजता

पुण्यात 19 मार्गांवर PMPMLच्या लेडीज स्पेशल बस धावणार

Pune PMPML Bus : पुणेकर महिलांचा प्रवास आता सुखकर होणार. पुण्यात 19 मार्गांवर PMPMLच्या लेडीज स्पेशल बस धावणार. उद्यापासून पुण्यात लेडीज स्पेशल बस धावणार. लेडीज स्पेशल बसमध्ये वाहकही महिलाच असणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत देणार बस सेवा.

27 Nov 2022, 07:44 वाजता

श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबची तिहार जेलमध्ये रवानगी

Shraddha Walker Murder Case Update : श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबची तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. इतर कैद्यांपासून आफताबला दूर ठेवण्यात येणार. आफताबवर 24 तास पोलिसांची करडी नजर असणार आहे. उद्या आफताबच्या नार्को टेस्टची शक्यता.

बातमी पाहा- श्रद्धाचा मारेकरी आफताब याची तिहार जेलमध्ये रवानगी

27 Nov 2022, 07:13 वाजता

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

Mumbai Local Mega Block : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक. मध्य रेल्वे मार्गावर (Central Railway) माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप-डाऊन या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक असेल.  सकाळी 10. 35 ते दुपारी 3. 35 पर्यंत 5 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर रेल्वेवर आज चुनाभट्टी-वांद्रे डाउन  हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक असेल. तर चुनाभट्टी/वांद्रे- छशिमटर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत वाहतूक सेवा बंद राहिल. 

बातमी पाहा-  रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक