27 Nov 2022, 13:52 वाजता
पुण्यात पानटपरीच्या वादातून एकाची निर्घृण हत्या
Pune Murder : पानटपरीच्या वादातून पुण्यात एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घराशेजारी पानटपरी टाकल्याच्या रागातून मध्यरात्री आशिष कांबळेंवर कोयत्याने वार करण्यात आले. यात गंभीर जखमी झालेल्या कांबळेंचा मृत्यू झालाय. याप्रकरणी खडकी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून, कोयतेही जप्त करण्यात आलं आहे..खडकी परिसरात अशा घटना घडत असताना पुणे पोलीस आयुक्त गप्प का?.असा सवाल उपस्थित केला जातोय.
27 Nov 2022, 13:36 वाजता
राज्यभरात गोवरचे 10 हजार संशयित रुग्ण
State Measles : राज्यातील गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर गेलाय. यातली एकूण 658 बालकं गोवरबाधित आहेत. तर गोवरनं राज्यातील 13 बालकांचा मृत्यू झाला. त्यातले 9 जणांचा मृत्यू संशयित आहेत. पण मृतांमध्ये लस न घेतलेल्या बालकांचा समावेश आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जातोय. बालवाड्या, पाळणाघरं, अतिजोखमीच्या भागांवर प्राधान्यानं लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय झालाय. तर केंद्रानंही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली आहे. (Maharashtra News Updates)
बातमी पाहा- राज्यात गोवरचा उद्रेक वाढला! रुग्णांचा आकडा किती?
27 Nov 2022, 13:17 वाजता
मनसेचा आज मुंबईत मेळावा
Raj Thackeray (Maharashtra Political News) : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज पुन्हा धडाडणार आहे. मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा गटाध्यक्षांचा मेळावा महत्त्वाचा आहे. पण, सीमा वाद, राज्यपालांचं शिवाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य यावर राज ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे.
बातमी पाहा- राज ठाकरे यांची तोफ आज पुन्हा धडाडणार
27 Nov 2022, 13:09 वाजता
मुंबईत 40 कोटींचं ड्रग्ज जप्त
Mumbai Drug : मुंबईत 40 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर DRIची कारवाई. 2 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आलं आहे. दोघांकडून 8 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. (Maharashtra News Live Updates)
27 Nov 2022, 13:01 वाजता
पुणे म्हाडाची 4500 घरांची सोडत पुढील आठवड्यात
Pune Mhada Home : पुण्यात म्हाडाच्या 4हजार 678 घरांची सोडत निघतेय. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही सोडत निघतेय. अर्ज भरतानाच कागदपत्रांची पूर्तता आणि छाननीसुद्धा होणारय. ही सगळी प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येईल. यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा होती. त्यानंतर विजेत्यांची प्रतीक्षा यादी जाहीर व्हायची. तर म्हाडाच्या विविध योजनेतली 2840 सर्वसमावेशक योजनेंतर्गत 1435 आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) 403 अशा एकूण 4678 सदनिकांचा समावेश आहे.
बातमी पाहा- पुण्यात म्हाडाच्या किती घरांची आणि कधी होणार सोडत?
27 Nov 2022, 11:50 वाजता
CM Eknath Shinde Live (Maharashtra Political News) : 'लपून छपून काम उजेडात येतात', 'उद्धव ठाकरे नैराश्याने ग्रासलंय', 'तर फ्रीज एवढे खोके कुठे जात होते सगळ्यांना माहिती', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला.
27 Nov 2022, 11:45 वाजता
CM Eknath Shinde Live (Maharashtra Political News) : 'आसाममध्ये महाराष्ट्र भवन करण्यास होकार' 'कामाख्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्यांसाठी महाराष्ट्र भवन','आसाममध्ये संस्कृतिक दालन','नवी मुंबईत आसाम भवन बिस्वांची मागणी', 'आसाममध्ये शिवजयंती साजरी होणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य.
'
27 Nov 2022, 11:40 वाजता
CM Eknath Shinde Live (Maharashtra Political News) : 'कामाख्या देवीचं मनोभावे दर्शन', 'आसामच्या मुख्यमंत्र्यांनी जंगी स्वागत केलं', 'आसामकडून महाराष्ट्राला प्रेम मिळालं', 'महाराष्ट्रात आल्यासारखं प्रेम दिलं', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य
27 Nov 2022, 11:03 वाजता
शिंदे गटाचे आमदार, खासदार मुंबईच्या दिशेनं रवाना
Shinde Group (Maharashtra Political News) : मुख्यमंत्री शिंदेंसह (Eknath Shinde) आमदार, खासदार गुवाहाटीवरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. काल शिंदे गटाच्या आमदारांनी कामाख्या देवीचं (Kamakhya Devi) दर्शन घेतलं. आता सगळेजण गुवाहाटी एअरपोर्टवर दाखल झाले आहेत. (Maharashtra Political News)
27 Nov 2022, 10:21 वाजता
Sanjay Raut Live (Maharashtra Political News) : '2 पक्षांतर करण्याऱ्या नेत्यांचं जमलं असेल', 'इतर भाषकांचा आम्ही सन्मान करतो' 'आसाम सरकारने आम्हाला दर्शनाला बोलावलं नाही','कामाख्या देवी न्यायदेवताही आहे' '40 जणांचा योग्य न्याय कामाख्या देवी नक्की करेल', संजय राऊत यांचा शिंदे गटाला टोला.