Maharashtra News Live Updates: एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

Maharashtra News Updates: Live Marathi News : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, राजकीय, आरोग्य, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे वेगवान live अपडेट्स  

Maharashtra News Live Updates: एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

20 Nov 2022, 14:24 वाजता

शतकवीर 'सूर्या'

 

India Vs Newzeland 2nd T-20 : न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20मध्ये टीम इंडियानं रन्सचा डोंगर उभारलाय. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) शानदार सेंच्युरीच्या जोरावर टीम इंडियानं (Team India) न्यूझीलंडसमोर (New Zeland) 192 रन्सचं टार्गेट ठेवलंय. टीम इंडियानं (Team India) प्रथम बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 191 रन्स केल्यात. सूर्यकुमार यादवनं न्यूझीलंडच्या बॉलर्सची अक्षरशः धुलाई केली. त्यानं 11 फोर्स आणि 7 सिक्सरच्या जोरावर नाबाद 111 रन्सची तुफानी खेळी केली. सूर्याचा धडाका पाहता भारत 200चा पल्ला ओलांडणार असं वाटत होतं. मात्र 20व्या ओव्हरला टीम साऊदीने (Tim Southee) हॅटट्रीक घेतली. त्यामुळे भारताला 20 ओव्हर्समध्ये 191 रन्स करता आल्या. 

IND vs NZ Live: सूर्यकुमार यादवची तुफानी सेंच्युरी, टीम इंडियाने न्यूझीलंडला दिलं मोठं लक्ष्य

20 Nov 2022, 13:47 वाजता

Sanjay Raut On Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देताना शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जोरदार टोला लगावला आहे.(Maharashtra  Political News) महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चार वेळा अपमान केला. महाविकास आघाडी सोबत गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्वाभिमान दुखावला गेला. आता तर भाजपने आणि त्यांच्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. तरीही ते सत्तेला चिटकून बसले आहेत. आता तुमचा कोठे स्वाभिमान गेला, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

 

बातमी पाहा - Sanjay Raut : महाविकास आघाडीसोबत गेलो तेव्हा मुख्यमंत्र्यांचा स्वाभिमान दुखावला, आता कुठे गेला? - राऊत

20 Nov 2022, 12:36 वाजता

कोलकातामध्ये आई आणि मुलानं केले वडिलांचे 6 तुकडे

Kolkata Murder Case : कोलकात्याच्या (Kolkata Crime News) उज्ज्वल चक्रवर्ती हत्याकांडात मोठी खळबळजनक माहिती समोर आलीय. दिल्लीच्या आफताबने जशी श्रद्धाची (Shraddha Murder Case) हत्या केली, त्याच स्टाईलने उज्ज्वल चक्रवर्तीचीही (Ujjwal Chakraborty) हत्या करण्यात आली. नौदलाचे निवृत्त अधिकारी असलेल्या उज्ज्वल चक्रवर्तीचं आपल्या मुलासोबत कडाक्याचं भांडण झालं. याच वादात मुलाने वडिलांचा गळा दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने आईसोबत मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आफताबने वापरलेल्या पद्धतीचा वापर करण्याचं ठरवलं. सूत्रांच्या माहितीनुसार बाथरुममध्ये करवतीच्या सहाय्यानं मृतदेहाचे सहा तुकडे करण्यात आले. मुलाच्या या कृत्यात त्याच्या आईनेही साथ दिली. मग मुलाने आपल्या वडिलांच्या मृतदेहाचे हे तुकडे सायकलवरुन नेत त्याची विल्हेवाट लावली. 

बातमी पाहा - Crime News : श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती, आईच्या सांगण्यावरुन मुलाने वडिलांना संपवले; करवतीने केले 6 तुकडे

20 Nov 2022, 12:11 वाजता

नेटवर्किंगमधील मोठी कंपनी सिस्कोमधूनही नोकरकपात, चार हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता

 

Cisco Job Cutting : आयटी क्षेत्रावरचं मंदीचं सावट काही कमी होताना दिसत नाही. फेसबुक (Facebook), ट्विटरनंतर (Twitter) आता नेटवर्किंगमधली सर्वात मोठी कंपनी सिस्कोमधूनही नोकरकपात केली जाणार आहे. सिस्कोमध्ये जगभरात जवळपास 83 हजार कर्मचारी आहेत, त्यातल्या 5 टक्के कर्मचाऱ्यांना हटवण्यात येणार आहे. म्हणजे साधारण 4 हजार एकशे कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. व्यवसायाचं संतुलन राखण्यासाठी हे पाऊल उचललंय असं सिस्कोनं (Cisco) आपल्या निवेदनात म्हटलंय. विशेष म्हणजे यंदाच्या पहिल्या तिमाही निकालात सिस्कोचं उत्त्पन्न 13.6 अब्ज डॉलर इतकं नोंदवण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांची अधिक वाढ यात नोंदवण्यात आली आहे. तरीही कंपनीकडून नोकरकपात केली जाणार आहे.

20 Nov 2022, 10:40 वाजता

राज्यपालांचं विधान, राजकीय घमासान

 

Sanjay Raut On Governor : राज्यपालांनी छत्रपती शिवरायांचा (Shivaji Maharaj) अपमान केला, भाजप प्रवक्त्याने (BJP Spoke Person) महाराजांना माफीवीर म्हटलं तरी मुख्यमंत्री निषेधाचा स्वर काढत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा (Chief Minister Eknath Shinde) द्यावा, महाराष्ट्रातून या राज्यपालांना (Governor bhagat singh koshyari) हटवा अशी मागणी खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी केलीय. 

बातमी पाहा - "महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय"; राज्यपालांच्या विधानानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

20 Nov 2022, 09:17 वाजता

श्रद्धा वालकर मृत्यू प्रकरणात मोठे राज उलगडणार?

 

shraddha walkar news : श्रद्धा वालकर हत्याकांड (shraddha walkar Murder Update) प्रकरणात मोठी अपडेट समोर येतेय. दिल्ली पोलीस आता आफताबच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. लवकरच त्यासाठी आफताबच्या कुटुंबीयांशी (Aftab Poonawalla Family) संपर्क साधणार असल्याची माहिती आहे. दिल्ली पोलीस (Delhi Police) श्रद्धाच्या मोबाईलचाही शोध घेतायत. श्रद्धाचा मोबाईल सापडल्यास त्यातून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत श्रद्धाच्या अनेक मित्र-मैत्रिणींचे जबाब नोंदवले आहेत. शिवानी म्हात्रे, लक्ष्मण नादर, राहुल राय, श्रद्धाच्या कंपनीचा मॅनेजर यांचे जबाब पोलिसांनी घेतलेत. 

बातमी पाहा - श्रद्धा प्रकरणात मोठी अपडेट; अखेर पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईलचाही शोध...

20 Nov 2022, 08:33 वाजता

राज्यात पारा घसरला, धुळ्यात 7 तर निफाडमध्ये 7.4 अंश सेल्सिअस तापमान. वेण्णालेक परिसरात पारा 6 अंशांवर

 

State Cold Wave : राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. जम्मू-काश्मीर आणि लडाख परिसरात हिमवृष्टी होत असल्याने उत्तरेतील राज्यांसह महाराष्ट्रात (Maharashtra) थंडी वाढलीय. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर (Mahabaleshwar) आणि पाचगणीमध्ये (Panchgani) तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. महाबळेश्वरमध्ये पारा 12 अंशावर आलाय तर वेण्णा लेक परिसरात पारा 6 अंशापर्यंत घसरलाय. उत्तर महाराष्ट्रात थंडीमुळे हुडहुडी भरलीय. धुळ्यात 7, निफाडमध्ये 7.4 तर परभणीत 8.3 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीय. राज्यात आणखी दोन दिवस कडाक्याची थंडी राहणार असल्याचा अंदाज आहे.

20 Nov 2022, 08:06 वाजता

गोंदियात 'उडान' ठप्प

 

Gondia Airport : गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून फ्लाय बिगने गाशा गुंडाळला आहे. सेवा बंद करण्यासाठी देखभाल दुरूस्तीचा बहाणा करण्यात येत आहे असा आरोप कऱण्यात आलाय. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील (Gondia District) उडान सेवा (Uddan Seva) अवघ्या 5 महिन्यातच जमिनीवर आलीय. गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून (Gondia Airport) सात ते आठ वर्षांच्या कालावधीनंतर उडान अंतर्गत सेवा सुरू झाली होती. मात्र सेवा देण्याचं कंत्राट घेतलेल्या फ्लायबिगने आता देखभाल दुरूस्तीचं नाव देत सेवा बंद केली आहे. प्रफुल्ल पटेल विमान वाहतूकमंत्री असताना त्यांनी बिरसी इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ उभारलं होतं. या ठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्रही सुरू झालं होतं. इथून होत असलेल्या गोंदिया-इंदूर- हैदराबाद विमानसेवेला प्रतिसादही चांगला होता. मात्र केवळ शो बाजी करण्यासाठी विमानसेवा घाईत सुरु झाली होती असा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केलाय. 

20 Nov 2022, 07:43 वाजता

शिंदे गटाच्या गुवाहाटीला जाण्याच्या तारखेत बदल, 21 नोव्हेंबरला होता दौरा, लवकरच नवीन तारीख जाहीर करणार, गुलाबराव पाटलांची माहिती.

 

Shinde Camp Guwahati Tour Date Change : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्यासह शिंदे गटातील मंत्री आणि आमदार उद्या गुवाहाटीला जाणार नाहीत. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ही माहिती दिलीय. ते जळगावात बोलत होते. शिंदे गट उद्या गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार होते. मात्र आता लवकरच दौऱ्याची नवीन तारीख जाहीर होईल. 

बातमी पाहा - शिंदे गट गुवाहाटीला जाणार का? गुलाबराव पाटील यांनी दिले मोठे Update

20 Nov 2022, 07:37 वाजता

कतारमध्ये आजपासून फुटबॉलचा महासंग्राम

 

Qatar Fifa World Cup 2022 : आजपासून सुरु होतेय जगातली सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा. वर्ल्ड कपची (Fifa World Cup) सुरुवात होणार आहे यजमान कतार (Qatar) आणि इक्वेडोर (Ecuador) यांच्यातल्या मॅचने.  या मॅचमध्ये इक्वेडोरचं पारडं जड मानलं जातंय. कारण कतार या मॅचमधून पहिल्यांदाच वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण करणार आहे. इतिहासातली आकडेवारी पाहता आतापर्यंत फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये यजमान टीमला एकदाही सलामीच्या मॅचमध्ये पराभव पत्करावा लागलेला नाही. त्यामुळे कतारही तोच इतिहास गिरवणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल. पण सर्वांचं लक्ष यंदा लागलंय ते अर्जेन्टिना (Argentina) आणि पोर्तुगालच्या (Portugal) मॅचकडे. कारण अर्जेन्टिनाचा लायनल मेसी (Lionel Messi) आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo ) यांचा हा शेवटचा वर्ल्ड कप मानला जातोय. आजपासून सुरु होणाऱ्या फुटबॉलच्या महासंग्रामाची फायनल 18 डिसेंबरला होणार आहे.