Maharashtra News Live Updates : एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

Maharashtra News Updates: Live Marathi News : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, बातम्यांचे वेगवान Live अपडेट्स     

Maharashtra News Live Updates : एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

10 Nov 2022, 13:04 वाजता

Ind Vs Eng Live Updates T20 World Cup 2nd Semi Final : टीम इंडियाच्या बॅटींगला सुरुवात, रोहित- राहूल उतरले मैदानात.
भारत : 6/0

10 Nov 2022, 11:40 वाजता

Sanjay Raut on Devendra Fadanvis (Maharashtra Political News Live) : जेलमधून बाहेर आल्यावर संजय राऊतांनी (Sanjay Raut) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) वक्तव्याचं स्वागत केलंय. राजकारणातील (Politics) कटुता संपवली पाहिजे असं काही दिवसांपूर्वीच फडणवीसांनी वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्याबाबत राऊतांनी फडणवीसांचं कौतुक केलंय. ते उपमुख्यमंत्री असले तरी तेच राज्य चालवतायत, त्यामुळं फडणवीसांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिलीय. (Maharashtra Political News Live)

बातमीची लिंक - https://bit.ly/3TqcfVo

 

10 Nov 2022, 11:38 वाजता

Sanjay Raut (Maharashtra Political News Live) : संजय राऊत (Sanjay Raut) आज शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेण्याची शक्यता आहे...रुग्णालयात रुटीन चेकअप केल्यानंतर दोन्ही नेत्यांची राऊत भेट घेणार असल्याचं बोललं जातंय. कालच संजय राऊतांची जेलमधून जामिनावर सुटका झालीय. राऊत आणि पवारांचे स्नेह सर्वांनाच माहिती आहे. पवार दोन दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमधून बाहेर आलेयत. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राऊत सिल्व्हर ओकवर जाण्याची शक्यताय. (Maharashtra Political News Live) 

10 Nov 2022, 11:14 वाजता

Arunachal Pradesh Earhquake : अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) जाणवले भूकंपाचे (Earthquake) धक्के. भूकंपाची तीव्रता 5.7 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आलीय. अरुणाचल प्रदेशमधील सियांग जिल्ह्यात भूकंपाचं केंद्रबिंदू होतं. नेपाळनंतरही अरुणाचल प्रदेशही भूकंपानं हादरलं.

10 Nov 2022, 11:10 वाजता

Maharashtra Kusti :  शरद पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सरचिटणीसपदी बाळासाहेब लांडगेंची नियुक्ती कायम असून ती योग्य आहे असा निर्णय आता हायकोर्टानं दिलाय. राष्ट्रीय कुस्ती संघटनेने महाराष्ट्र कुस्तीगीर समिती बरखास्त केलेली होती त्यानंतर बाळासाहेब लांडगे आणि त्यांचे सहकारी कोर्टामध्ये गेले होते. त्यावर आता कोर्टानं आपला निकाल दिला असून यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा मार्ग आता मोकळा झालाय.

 

10 Nov 2022, 10:55 वाजता

Sanjay Raut (Maharashtra Political News Live) : संजय राऊत (Sanjay Raut) आज शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेण्याची शक्यता आहे...रुग्णालयात रुटीन चेकअप केल्यानंतर दोन्ही नेत्यांची राऊत भेट घेणार असल्याचं बोललं जातंय. कालच संजय राऊतांची जेलमधून जामिनावर सुटका झालीय. राऊत आणि पवारांचे स्नेह सर्वांनाच माहिती आहे. पवार दोन दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमधून बाहेर आलेयत. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राऊत सिल्व्हर ओकवर जाण्याची शक्यताय. (Maharashtra Political News Live) 

10 Nov 2022, 09:46 वाजता

Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलात (Fire Brigade Recruitment) 910 पदं भरली जाणार आहेत. डिसेंबरपासून ही भरती सुरू होईल. या भरतीबाबत निविदाही काढण्यात आलीय. उमेदवारांची निवड करण्यासाठी 2 महिने, त्यानंतर प्रशिक्षणासाठी 6 महिन्याचा कालावधी लागेल. मुंबई अग्निशमन दलात मोठ्या प्रमाणात पदं रिक्त असून, उपलब्ध जवानांच्या मदतीने अग्निशमन दलाचा गाडा हाकला जात होता. त्यातून कर्मचाऱ्यांवर ताण पडत असल्याने पदभरतीचा निर्णय घेण्यात आलाय. 

10 Nov 2022, 09:05 वाजता

Shirdi Sai Temple Donation : शिर्डीत (Shirdi) साई बाबांच्या (Sai Baba) चरणी भाविकांनी भरभरून दान (Charity) केलंय. दिवाळीच्या सुट्टीत लाखो भाविकांनी शिर्डीत हजेरी लावली. यादरम्यान 15 दिवसांत तब्बल 18 कोटींचे दान साईबाबांच्या झोळीत जमा झालंय. या दानात 29 देशांतील 24 लाख 80 हजार रुपये किमतीच्या परकीय चलनाचाही समावेश आहे. तर 39 लाख 53 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने भाविकांनी दान केलंय.

बातमीची लिंक - https://bit.ly/3UCcUnO

10 Nov 2022, 08:51 वाजता

Sania Mirza & Shoaib Malik Divorce :  भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांनी वेगळं होण्याचं ठरवलंय. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता यावर शिक्कामोर्तब झालंय शोएब मलिकच्या जवळच्या एका व्यक्तीने सानिया आणि शोएब यांच्या घटस्फोटाबाबत (Divorce) माहिती दिलीये. दोघंही वेगळे राहात असून केवळ कागदोपत्री औपचारिकता बाकी असल्याचं त्यानं सांगितलंय. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली होती. सानियाच्या या पोस्टवरून शोएबसोबतच्या तिच्या नात्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरु झाली होती. 

10 Nov 2022, 08:39 वाजता

OBC Reservation (Maharashtra Political News Live) : ओबीसी राजकीय आरक्षण (OBC Reservation) आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासंदर्भात (Local Body Election) आज सुप्रीम कोर्टात (supreme court) महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. ९२ नगरपरिषदांच्या ओबीसींच्या निवडणुकीबाबत राज्य सरकारने दोन आठवड्याचा अधिक वेळ मागितला होता.  त्यानुसार कोर्टानं दोन आठवड्याचा वेळ वाढवून दिला. आता पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यात राज्य सरकारला आपली बाजू मांडावी लागणार आहे. मुंबई महापालिका प्रभाग रचनेबाबतच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं प्रभाग रचनेबाबत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्याबाबत याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टात जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. त्यानुसार मुंबई हायकोर्टात पुढील  लढाई लढावी लागणार आहे. (Maharashtra Political News Live)