Maharashtra News Live Updates : एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

Maharashtra News Updates: Live Marathi News : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, बातम्यांचे वेगवान Live अपडेट्स     

Maharashtra News Live Updates : एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

10 Nov 2022, 08:09 वाजता

One Nation One Election (Maharashtra Political News Live) : देशात 2024 मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका (Loksabha & Vidhansabha Election) एकत्रित घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission) तयारी आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी स्पष्ट केलंय. केंद्र सरकारने (Central Government) पुढाकार घेतल्यास वन नेशन, वन इलेक्शनची (One Nation One Election) तयारी केली जाईल असंही निवडणूक आयुक्तांनी म्हटलंय. One Nation One Election (Maharashtra Political News Live)

10 Nov 2022, 07:22 वाजता

Pratapgad Afzal Khan Kabar : प्रतापगडावर (Pratapgad) असलेल्या अफजल खानाच्या कबरीच्या (Afzal Khan kabar) आजूबाजूला अनधिकृत बांधकाम (Illegal Construction) हटवलं जातंय. अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी शासकीय वाहनांचा ताफा दाखल झाला असून, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. प्रतापगडावर अफजल खानाच्या (Afzal Khan) कबरीच्या भोवती उदात्तीकरण झाले होते. त्यामुळे कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू झालीय. आजच्या दिवशीच म्हणजे 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. शिवप्रतापदिनीच अफजल खानाच्या कबरीजवळील कबर म्हणजेच अनधिकृत बांधकाम हटवलं जातंय.

10 Nov 2022, 07:17 वाजता

Sanajay Raut (Maharashtra Political News Live) : संजय राऊतांना (Sanjay Raut) हायकोर्टानं (High Court) दिलासा दिलाय. मात्र ईडीच्या (ED) याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. राऊतांच्या जामिनाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला. राऊतांच्या जामिनावर महिनाभर झालेल्या युक्तिवादानंतर पीएमएलए कोर्टानं जामीन मंजूर केला. हायकोर्ट एका तासात तो निर्णय कसा बदलू शकते, असा सवाल कोर्टानं ईडीच्या वकिलांना विचारला. यावर तातडीने सुनावणी घेणं शक्य नाही... कोर्टाची वेळ संपत आलेली आहे. त्यामुळे आज सुनावणी घेण्यात येईल, असं कोर्टानं स्पष्ट केलं. (Maharashtra Political News Live)