Maharashtra News Live Updates : एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

Maharashtra News Updates: Live Marathi News : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, बातम्यांचे वेगवान Live अपडेट्स     

Maharashtra News Live Updates : एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

10 Nov 2022, 23:01 वाजता

Recruitment of teachers in State: पवित्र पोर्टलमार्फत(Pavitra Portal) होणार राज्यात शिक्षक भरती, शिक्षण विभागाने काढला जीआर. TAIT परीक्षार्थींना वयात 2 वर्षांची सवलत. राज्यातील(Maharashtra) सर्व शिक्षण संस्थांना नियम लागू, अनुदानित, विना अनुदानित, रात्र शाळा, शासकीय आणि अनुदानित अध्यापक विद्यालयातील(डी. एल.एड. कॉलेज)ला नियम लागू.

बातमीची लिंक - https://bit.ly/3hlHCTw

10 Nov 2022, 21:14 वाजता

Rahul Gandhi(Maharashtra Political News Live):  'भारत जोडो' यात्रेचा महाराष्ट्रात चौथा दिवस,  नांदेडमधील जाहीर सभेत राहुल गांधींचा(Rahul Gandhi) सत्कार.यात्रेत राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी, सुप्रिया सुळे(Supriya Sule) आणि जयंत पाटलांची(Jayant Patil) उपस्थिती, 'तपस्येमुळे महापुरूषांमधील अहंकार संपला', मात्र शेतकऱ्याला तपस्येचं फळ मिळालं नाही-राहुल गांधी. नोटबंदी आणि चुकीचा जीएसटी लागू केलाय. महाराष्ट्रातून उद्योग गायब होत आहेत- राहुल गांधी(Maharashtra Political News Live).

बातमीची लिंक - https://bit.ly/3UsCITB

 

10 Nov 2022, 18:28 वाजता

Sudhir Mungantiwar(Maharashtra Political News Live):  छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार परत आणणार. 2024 पूर्वी तलवार परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांचं मोठं विधान. लंडनमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार(Maharashtra Political News Live).

बातमीची लिंक - https://bit.ly/3Um0LU2

10 Nov 2022, 18:03 वाजता

Sanjay Raut (Maharashtra Political News Live): संजय राऊतांच्या(Sanjay Raut) जामिनावरील स्थगितीवर उद्या सुनावणी. ईडीच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी. राऊतांच्या जामिनावर हायकोर्टाची टांगती तलवार, राऊतांच्या जामिनाला ईडीचा विरोध(Maharashtra Political News Live).  

बातमीची लिंक - https://bit.ly/3Uok4Ml

10 Nov 2022, 17:34 वाजता

Jacqueline Fernandez Arrest at any moment?: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez)कोणत्याही क्षणी अटक होणार? जॅकलिनवर अटकेची टांगती तलवार, 200 कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनचं नाव. महाठग सुकेश चंद्रशेखर(Sukesh Chandrasekhar)सोबतची जवळीक भोवली, ईडीकडून त्रास होत असल्याचा जॅकलिनचा आरोप.

बातमीची लिंक - https://bit.ly/3EgX9wZ

10 Nov 2022, 16:47 वाजता

ICC T-20 World Cup India vs England Match : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या (ICC T-20 World Cup) दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा (Team India) इंग्लंडकडून दारूण पराभव, 10 विकेट्स राखून इंग्लंड(England) विजयी, जोस बटलर आणि अ‍ॅलेक्सची धुवाँधार बॅटिंग. भारताचं फायनलमध्ये जाण्याचं स्वप्न भंगलं.

बातमीची लिंक - https://bit.ly/3G3H6Uw

 

 

10 Nov 2022, 15:53 वाजता

Sanjay Raut meets Sharad Pawar: संजय राऊतांनी(Sanjay Raut)  सिल्व्हर ओकवर शरद पवारांची(Sharad Pawar) भेट घेतलीय. जेलमधून सुटल्यानंतर राऊतांनी आज सकाळी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यानंतर संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला(Maharashtra Political News Live).

बातमीची लिंक - https://bit.ly/3tjZvoI

 

10 Nov 2022, 15:08 वाजता

ICC T-20 World Cup India vs England Match : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या (ICC T-20 World Cup) दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियानं (Team India) इंग्लंडसमोर (England) विजयासाठी 169 रन्सचं टार्गेट दिलंय. टीम इंडियानं प्रथम बॅटिंग करताना 5 बाद 168 रन्स केल्या. हार्दिक पांड्यानं 63 (Hardik Pandya) तर विराट कोहलीनं 50 (Virat Kohli) रन्सची शानदार खेळी केलीय. 

बातमीची लिंक -  https://zeenews.india.com/marathi/sports/ind-vs-eng-semi-final-england-n...

10 Nov 2022, 14:02 वाजता

Uddhav Thackeray on Central Agencies (Maharashtra Political News Live) : केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या (Central Agencies) पाळीव प्राण्यांप्रमाणे वागतात, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलाय. जेलमधून सुटल्यावर संजय राऊतांनी मातोश्रीवर जाऊन आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हा आरोप केला. (Maharashtra Political News Live)

10 Nov 2022, 13:45 वाजता

Mumbai Alert : देशाची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) पुन्हा दहशतवाद्यांच्या (Terrorist Target) रडावर आलीये.. यावेळी हल्ल्यासाठी दहशतवादी ड्रोन (Drone) किंवा छोट्या विमानांसारख्या साधनांचा वापर करु शकतात असा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे मुंबई पोलिसांनी शहरात अलर्ट (Mumbai Police Alert) जारी केलाय. मुंबईत 23 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान हा दक्षतेचा इशारा देण्यात आलाय... या काळात मुंबईत ड्रोनच्या वापरावर बंदी घालण्यात आलीये... नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलाय.