13 Dec 2022, 11:46 वाजता
अमरावतीत दर 15 तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या
Amravati Farmer Suicide | Maharashtra News Updates : अमरावतीत दर 15 तासाला एक शेतकरी आत्महत्या करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवतायत. अमरावती जिल्ह्यात गेल्या 11 महिन्यात 290 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय. राज्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त 13 जिल्हे आहेत. यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेले तिन्ही जिल्हे अमरावती विभागातील आहेत. यवतमाळमध्ये 269 तर बुलढाणा जिल्ह्यात 252 शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय. एवढ्या आत्महत्या जिल्ह्यात होत असताना जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप शेतकरी करतायत.
13 Dec 2022, 11:24 वाजता
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना धमकीचा फोन
Sharad Pawar | Maharashtra Political News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना धमकीचा फोन आलाय. मुंबईच्या निवासस्थानी फोनवरून धमकी देण्यात आली. अज्ञात व्यक्तीकडून पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
बातमी पाहा- शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबईच्या घरी फोन
13 Dec 2022, 10:35 वाजता
आमदार रोहित पवार बेळगावमध्ये दाखल
Rohit Pawar | Political News : आमदार रोहित पवार गनिमी कावा करत बेळगावात दाखल झाले आहेत. बेळगावमध्ये जाऊन रोहित पवारांनी शिवरायांना अभिवादन केलं. पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला भेट दिली.
बातमी पाहा- रोहित पवार गनिमी कावा करत बेळगावात दाखल
13 Dec 2022, 09:41 वाजता
Sanjay Raut Live | Maharashtra Political News : 'गुजरातचा जल्लोष सुरू असताना चीनची घुसखोरी', 'तवांगची घटना देशाच्या दृष्टीने धोक्याची', 'लडाखप्रमाणे तवांगवरही पहिल्यापासून चीनचा दावा, टतवांगबाबत सरकार गंभीर का नाही ?', खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला.
13 Dec 2022, 09:26 वाजता
Sanjay Raut Live | Maharashtra Political News : 'सरकार राजकारणात गुंतून पडलंय', 'सरकारचं चीन पाकिस्तानकडे दुर्लक्ष', 'सैनिक जखमी झाले की काही शहीदही झालेत','सरकार सैनिकांबाबत माहिती का लपवतंय ?' तवांग सीमेवर झालेल्या झटापटीवरून खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारला सवाल.
13 Dec 2022, 08:29 वाजता
मुंबईत गोवर झालेल्या मुलीचा न्यूमोनियामुळे मृत्यू
Mumbai Nimoniya : गोवरपाठोपाठ आता न्यूमोनियाचा संसर्ग वाढू लागलाय. मुंबईतील साकीनाक्यामध्ये राहणाऱ्या 4 वर्षांच्या मुलीचा न्यूमोनियाने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या मुलीला गोवर झाला होता. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, न्यूमोनियामुळे श्वसनप्रक्रिया बंद झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. गोवरचा संसर्ग बरा झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. गोवरमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे विविध प्रकारच्या संसर्गांचा जोर वाढू शकतो. यामुळे गोवर झालेल्या रुग्णांची काळजी घेण्याची गरज असल्याचं बालरोगतज्ज्ञांनी म्हटलंय.
13 Dec 2022, 08:16 वाजता
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी
Maharashtra Political News : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 29 नोव्हेंरला ही सुनावणी होणार होती. मात्र, न्यायाधीश आजारी असल्यानं ही सुनावणी होऊ शकली नव्हती. त्यामुळं ठाकरे गटानं 8 डिसेंबरला हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात मेन्शन केलं होतं. वैधानिकदृष्या हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असताना आणि सरकारच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले असताना यावर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटानं केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पुढील सुनावणी 13 डिसेंबरला होईल असं सांगितलं. त्यामुळे आज मुख्य सुनावणीच्या वेळापत्रका संदर्भात निर्णय घेतला जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आता महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या मुख्य सुनावणीला कधी सुरुवात होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
13 Dec 2022, 07:15 वाजता
राज्यात खासगी कंपन्यांच्या बाईक टॅक्सीवर आरटीओचा बडगा
Action on Bike Taxis : राज्यातील बाईक टॅक्सीवर आरटीओनं कारवाईचा बडगा उगारलाय. मुंबईच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी काही खासगी कंपन्यांकडून सुरू करण्यात आलेल्या बाईक टॅक्सी सेवेवर कारवाई केली जाणाराय. अॅपवर या बाईक टॅक्सी आता दिसणार नाहीत अशी व्यवस्था करण्याच्या हालचाली सुरू केल्यायत. या सेवेसाठी कंपन्यांनी अधिकृत परवानगी घेतलेली नाही, ही वाहतूक बेकायदा असून, ती रोखण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालक मालकांच्या संघटनांनी परिवहन आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत परिवहन आयुक्तांनी सायबर सेलला पत्र पाठवून अॅपवरून बाईक टॅक्सी डीसएबल करण्याची विनंती केलीय.
13 Dec 2022, 07:03 वाजता
राज्यपालांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी पुणे बंद
Pune Closed : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. राज्यपाल कोश्यारींना पदावरून हटवण्यात यावं ही यातील प्रमुख मागणी आहे. बंदच्या निमित्ताने शहरात मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार छत्रपती संभाजी राजे हे ही या मोर्चात सहभागी होणार आहेत. पुणे बंदच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये सुमारे साडेसात हजार पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.
बातमी पाहा- पुण्यात आज बहुतांश व्यवहार बंद, 7500 पोलीस तैनात