13 Dec 2022, 20:00 वाजता
आरोपींवरील 307 कलम मागे, निलंबन रद्द
Devendra Fadanvis | Maharashtra Political News : चंद्रकांत पाटलांवर (Chandrakant Patil) शाईफेक प्रकरणातील आरोपींना लावलेलं 307 कलम मागे घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadanvis) यांनी पोलिसांना दिले आहेत. तसंच या प्रकरणात निंलबित करण्यात आलेल्या 11 पोलिसांचं निलंबनही मागे घेण्याच्या सूचना फडणवीसांनी दिल्याची माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिलीय. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यावर 307 कलम लावण्यात आलं होतं.
बातमी पाहा - https://bit.ly/3FsSAPw
13 Dec 2022, 19:06 वाजता
राज्यात पुन्हा जलयुक्त शिवार योजना
State Cabinet Decision | Maharashtra Political News : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय. शिंदे-फडणवीस (Eknath Shinde-Devendra Fadanvis) सरकारनं जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील गावं पुन्हा जलसमृद्ध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारच्यावतीनं सांगण्यात आलं. राज्यातील शाळांना अनुदान, 1100 कोटींना मान्यता. मुंबई महापालिकेतील 250 शाळांमध्ये स्कील सेंटर सुरू करणार. शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवण्यासाठी सलोखा योजना. स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार. पुणे जिल्ह्यातील आंबेगांव बु. मधील शिवसृष्टी प्रकल्पास 50 कोटी अनुदान देण्याचा निर्णय.
बातमी पाहा - https://bit.ly/3WbPDK6
13 Dec 2022, 17:59 वाजता
बसचालकाचा विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ
Drunked School Bus Driver | Marathi News LIVE : नवी मुंबईत (Navi Mumbai)स्कूल बसचालक दारूच्या नशेत,उलवेमधल्या IMS शाळेचा स्कूल बसचालक दारू पिऊन बस चालवत असल्याचा प्रकार समोर आलाय. सकाळी दारूच्या नशेत बस चालवत असल्यामुळे बसमधल्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. उलवेमधल्या एका वाहनाला धडक दिल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. मात्र या अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याला इजा झाली नाही. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी या दारूड्या ड्रायव्हरला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मात्र यामुळे स्कूल बसमधल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
बातमी पाहा - https://bit.ly/3Hy1sGq
13 Dec 2022, 15:10 वाजता
मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली
G-20 Conference : आजपासून मुंबईत सुरू होत असलेल्या G20 परिषदेसाठी मुंबई महापालिकेने नियमावली जारी केलीय. मुंबईत हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. परिषदेदरम्यान हवेची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी मुंबई महापालिका सरसावलीय. पुढील 10 दिवसांसाठी मुंबईतली सर्व बांधकामं थांबवण्यात आली आहेत. तसंच रस्त्यावरील धूळ पुढील 10 दिवस रोजच्या रोज हटवण्याचे आदेश सर्व वॉर्डांना जारी करण्यात आलेत. याशिवाय मुंबईच्या ज्या भागात हवेची गुणवत्ता सर्वात कमी आहे तिथे ट्रॅफीक सिग्नल्सवर पाण्याचे फवारे मारण्यात येणार आहेत.
13 Dec 2022, 15:08 वाजता
राज्यात कांद्याचा भावात मोठी घसरण
Amol Kolhe | Maharashtra Political News : राज्यात कांद्याचा भावात मोठी घसरण झालीय. एका महिन्यात कांद्याचे दर 10 ते 12 रुपयांनी घसरलेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय. लासलगावच्या बाजारात कांद्याला 10 ते 24 रुपयांचा बाजारभाव मिळतोय. कांद्याला MSP च्या कक्षेत आणता येईल का ? जेणे करून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, अशी विचारणा खासदार अमोल कोल्हे यांनी आज लोकसभेत केलीय.
13 Dec 2022, 13:13 वाजता
16 डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर
Eknath Shinde | Maharashtra Political News : 16 डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. रत्नागिरीतील बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेणार आहेत. रिफायनरीला काहींचा विरोधही आहे. त्यामुळे स्वत: मुख्यमंत्री रिफायनरी प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री अनेक विकासकामांचा शुभारंभदेखील करणार असल्याची माहिती मिळतेय. राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार वेगाने पावलं टाकत असल्याचं यातून दिसतंय.
13 Dec 2022, 12:53 वाजता
जालन्यात ढाब्यावरील वॉचमेनला जिवंत जाळलं
Jalna Murder : जालन्यात एका ढाब्याच्या वॉचमनला जिवंत जाळल्याची घटना घडलीये. जालना-संभाजीनगर रोडवरील राजस्थानी ढाब्यासमोर ही घटना आहे. तुकाराम शिंदे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते या ढाब्यावर वाॅचमनचं काम करत होते. रात्री 2 ते 4 वाजल्याच्या दरम्यानची ही घटना आहे. एका शेकोटीवर त्याला टाकून जिवंत जाळल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.
13 Dec 2022, 12:35 वाजता
परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
Chandrashekhar Bawankule | Maharashtra Political News : परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंबेडकरी संघटनांकडून बावनकुळेंना काळे झेंडे दाखवण्यात आले. चंद्रकांत पाटलांनी फुले, आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी संघटना आक्रमक झाली. यावेळी पोलिसांच्या बंदोबस्तात बावनकुळेंचा ताफा निघून गेला.
13 Dec 2022, 12:19 वाजता
राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली
Maharashtra Political News : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली. सत्तासंघर्षावर 10 जानेवारीला पुढील सुनावणी होणार. 7 बेंचच्या जजेसकडे प्रकरण सोपावण्याची ठाकरे गटाने मागणी केली. मात्र, ही मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. नबाब रेबिया केसमध्ये 5 जजेस होते म्हणून 7 जजेसचे बेंच असावे अशी मागणी केली. निवडणूक आयोगाच्या सुनावणीपूर्वी कोर्टातील सुनावणी घ्यावी अशीही मागणी ठाकरे गटाने केलीय.
13 Dec 2022, 12:00 वाजता
Rajnath Singh Live | Political News : 'तवांगमध्ये भारत-चीनमध्ये चकमक', '9 डिसेंबरला चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न', 'भारताचा एकही सैनिक शहीद झाला नाही', 'आपल्या परक्रमाने चिनी सैनिकांना मागे ढकललं',' फ्लॅटमिटींगमध्ये चीनला कठोर इशारा' 'तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीवरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य.
बातमी पाहा- चीनच्या घुसखोरीबाबत राजनाथ सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले सीमाभागात...