Maharashtra Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : पंतप्रधान मोदी (PM Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. नागपूर ते शिर्डी या मार्गाचे ते उद्घाटन करतील. तसेच ते नागपूरहून वंदे मातरम् एक्स्प्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवतील.
11 Dec 2022, 11:26 वाजता
Narendra Modi LIVE Updates : AIIMS चं नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
LIVE | Inauguration of AIIMS | Nagpur@narendramodi#MahaSamruddhi #Nagpur #NarendraModi #Maharashtra #modiinnagpur #aiimsnagpur https://t.co/NqzZC7SzA7
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 11, 2022
11 Dec 2022, 10:55 वाजता
Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : समृद्धी महामार्ग आरंभबिंदू समृद्धी झिरो माईल पॉईंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं आहे.'महा समृद्धी' म्हणजे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण. नागपूर ते शिर्डी पहिल्या टप्प्याचं लोकार्पण. मोदी 10 किलोमीटर समृद्धी महामार्गावर सफर
LIVE| हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते लोकार्पण@narendramodi#MahaSamruddhi #Nagpur #NarendraModi #Maharashtra https://t.co/LrsqRoEOXp
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 11, 2022
11 Dec 2022, 10:53 वाजता
Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : समृद्धी महामार्ग आरंभबिंदू समृद्धी झिरो माईल पॉईंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं आहे.मोदी समृद्धी महामार्गावर दहा किलोमीटरचा प्रवास करणार असून त्यानंतर 'महा समृद्धी' म्हणजे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण.
11 Dec 2022, 10:30 वाजता
Narendra Modi LIVE Updates : नागपूर मेट्रो फेज 2 चं पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ. नागपूरकरांना मेट्रोचं गिफ्ट
LIVE | #NagpurMetro फेज 2 चा शुभारंभ#MahaSamruddhi #Nagpur #NarendraModi #Maharashtra https://t.co/fnFxGlxdTA
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 11, 2022
11 Dec 2022, 10:24 वाजता
Narendra Modi LIVE Updates : नागपूर मेट्रो फेज 1 चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी दरम्यान मोदींनी मेट्रोची सफर केली. या सफरदरम्यान मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
LIVE| Walkthrough of Exhibition on Nagpur Metro Phase-I | Nagpur
नागपूर मेट्रो फेज १ चा शुभारंभ#MahaSamruddhi #Nagpur #NarendraModi #Maharashtra https://t.co/i5diEIvLmX— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 11, 2022
11 Dec 2022, 10:07 वाजता
Narendra Modi LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशनला दाखल झाले आहे. मोदी मेट्रो प्रदर्शनाची पाहणी आणि नंतर मेट्रोची सफर करणार आहेत. याच मेट्रोने ते 10.20 ला खापरी मेट्रो स्थानकावर पोहोचतील. खापरी इथे ते मेट्रोच्या दोन मार्गांंचं लोकार्पण करतील.
11 Dec 2022, 09:56 वाजता
Narendra Modi LIVE Updates : मोदींचा 'समृद्धी दौरा' ! पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरातील रेल्वे स्टेशनवर जाऊन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगत सिंग कोश्यारी उपस्थित होते.
LIVE | Hon PM @narendramodi ji flagging off Nagpur to Bilaspur #VandeBharat Express
नागपूर ते बिलासपूर 'वंदे भारत' एक्सप्रेसचे उद्घाटन | नागपूर#MahaSamruddhi #Nagpur #NarendraModi #Maharashtra https://t.co/bY201dxhyG— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 11, 2022
11 Dec 2022, 09:47 वाजता
Narendra Modi LIVE Updates : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे होणार वेळ आणि इंधनाची बचत... लिहू या यशाची नवी परिभाषा, महाराष्ट्राची समृद्धीची भाग्यरेषा. या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे होणार वेळ आणि इंधनाची बचत...
लिहू या यशाची नवी परिभाषा, महाराष्ट्राची समृद्धीची भाग्यरेषा.
#Hinduhrudaysamrat #BalasahebThackeray #Maharashtra #SamruddhiMahamarg #समृद्धीमहामार्ग #EknathShinde #DevendraFadnavis pic.twitter.com/YBbTwqQS2E— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 10, 2022
11 Dec 2022, 09:20 वाजता
Narendra Modi LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नागपूर विमानतळावर आगमन झालं आहे.
11 Dec 2022, 08:47 वाजता
Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 9.25 वाजता मोदी यांचं नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर 9.40 वाजता ते नागपूर रेल्वे स्ठानकाला भेट देतील. तिथे 9.45 ते 9.55 वाजता वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. सकाळी 10 वाजता फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशनला भेट देतील. 10.10 वाजता मेट्रो प्रदर्शनाची पाहणी आणि नंतर मेट्रोची सफर करतील. याच मेट्रोने ते 10.20 ला खापरी मेट्रो स्थानकावर पोहोचतील. खापरी इथे ते मेट्रोच्या दोन मार्गांंचं लोकार्पण करतील. त्यानंतर 10.45 ला समृद्धी महामार्ग आरंभबिंदू समृद्धी झिरो माईल पॉईंटवर आगमन होणार. 10.45 ते 11.00 दरम्यान समृद्धी महामार्गावर दहा किलोमीटरचा प्रवास आणि नंतर मगामार्गाचे लोकार्पण होणार. पुढे 11 वाजता रस्ते मार्गाने मिहान प्रकल्पाकडे प्रस्थान होणार. 11.15 ते 11.25 या वेळेत मिहान एम्सचे औपचारिक उद्घाटन करणार. साधारण 11.30 वाजता टेम्पल ग्राऊंड एम्स सार्वजनिक कार्यक्रम आणि नव्या प्रकल्पाचं उद्घाटन करणार. दुपारी 12.35 वाजता नागपूर विमानतळाकडे प्रस्थान करणार आणि 12.55 वाजता नागपूरहून गोव्यासाठी रवाना होणार.