Narendra Modi LIVE Updates: 'गोसेखुर्द' प्रकल्पावरुन विरोधकांवर टीका

Maharashtra Samruddhi  Mahamarg Inaugration LIVE Updates: पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाच्या  ( Mumbai-  Nagpur Expressway ) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. नागपूर ते शिर्डी या मार्गाचे ते उद्घाटन करतील. तसेच ते नागपूरहून वंदे मातरम् एक्स्प्रेस गाडीला हिरवा  झेंडा दाखवतील. 

Narendra Modi LIVE Updates:  'गोसेखुर्द' प्रकल्पावरुन विरोधकांवर टीका

Maharashtra Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : पंतप्रधान मोदी (PM Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. नागपूर ते शिर्डी या मार्गाचे ते उद्घाटन करतील. तसेच ते नागपूरहून वंदे मातरम् एक्स्प्रेस गाडीला हिरवा  झेंडा दाखवतील.

11 Dec 2022, 08:09 वाजता

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway :  समृद्धी महामार्गाचे एकूण अंतर 701 किमी आहे.  त्यापैकी नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा एक्स्प्रेस वे लोकांसाठी खुला होणार आहे. उर्वरित मार्ग सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.  प्रकल्पात किमान 10 जिल्हे प्रत्यक्ष आणि 14 जिल्हे अप्रत्यक्षपणे जोडली जाणार आहेत. 6 लेनचा महामार्ग असून गरज भासल्यास 8 लेनपर्यंत वाढवता येऊ शकतो. या महामार्गावर 26 टोल टॅक्स काउंटर आहेत. या महामार्गासाठी अंदाजे खर्च 55000 कोटी इतका झाला आहे. या महामार्गावर वैद्यकीय सुविधा असून 108 क्रमांकावर रुग्णवाहिका उपलब्ध आहे. तर 15 रुग्णवाहिका, 15 जलद प्रतिसाद वाहने, 13 गस्ती वाहने कायम तैनात असणार आहेत. 

11 Dec 2022, 07:38 वाजता

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway या महामार्गामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून पर्यटनालाही चालना मिळण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षणीय स्थळं जोडण्यास हा महामार्ग उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पाची आखणी केलीय. हा महामार्ग नागपूर, मुंबई आणि संभाजीनगर या प्रमुख बाजारपेठेला जोडला जाईल. 

11 Dec 2022, 07:36 वाजता

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Samruddhi Expressway) असं नाव देण्यात आलं आहे. आज मोदी यांच्या हस्ते नागपूर - शिर्डी (Nagpur - Shirdi) या रस्त्याचे लोकापर्ण होणार आहे. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.  त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कार्यक्रमस्थळी जाऊन तयारीचा आढावा घेतला. समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो.

11 Dec 2022, 07:32 वाजता

Narendra Modi LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होत आहे. राज्य सरकारने जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयारीचा आढावा घेतला आहे.

11 Dec 2022, 07:32 वाजता

मुंबई (Mumbai) आणि नागपूरचं (Nagpur) अंतर आता 7 तासांवर येणार आहे कारण समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून आज पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.