close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

१.२६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त, पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा हात

एक कार संशयास्पद दिसून आली. पोलिसांनी कारची झडती घेतली. यावेळी कारमध्ये एक कोटी २६ हजार रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्यात.  

Updated: Jun 12, 2019, 07:59 PM IST
१.२६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त, पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा हात

हेमंत चापुडे / शिरूर : कवठे येमाई येथे एक कार संशयास्पद दिसून आली. कारमधील काही लोकांची माहिती घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्याबाबत पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी कारची झडती घेतली. यावेळी कारमध्ये एक कोटी २६ हजार रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्यात. पोलिसांनी या नोटा जप्त केल्या असून तिघांना याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई शिरुर पोलिसांनी केली. दरम्यान, पकडण्यात आलेल्या जुन्या नोटा प्रकरणी बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलासह एका मोठ्या उद्योजकाचा हात असल्याचे पुढे आले आहे.

शिरूर पोलीस कवठे येमाई येथे ८ जून रोजी रात्रीची गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना एका कार चालकाच्या संशयास्पद हालचालीमुळे शिरुर पोलिसांनी त्याची चौकशी केली. कारच्या सिटमध्ये जुन्या नोटा लपविल्याचे दिसून आले. एक कोटी २६ हजारांच्या जुन्या तोटा पोलिसांनी कारमधून जप्त केल्या. ५००, १००० रुपयाच्या नोटा आढळून आल्या आहेत. या नोटांबाबत कार चालक आणि त्यांच्या साथीदारांकडून समाधानकारण उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी या नोटा जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी गणेश शिवाजी कोळेकर (२५ रा. सविंदणे, समाधान बाळू नरे (२१ रा. अहमदाबाद ), अमोल देवराम दसगुडे ( २५ रा .कर्डीलवाडी) या तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या नोटा पुण्यातील एका बड्या बिल्डरच्या असल्याची माहिती समोर येत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक  नारायण सांरगकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस करत आहेत.