कैलास पुरी, झी मीडिया
Pune News Today: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील जलतरण तलावात क्लोरीन गॅसची गळती (chlorine gas leak) झाल्याचा प्रकार मंगळवारी सकाळच्या सुमारास घडला आहे. गॅस लिकेज झाल्याने पोहण्यासाठी आलेल्या 20 ते 22 जणांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यातील 10 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, 10 वर्षीय मुलीला थोडा अधिक त्रास झाला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती क्रीडा अधिकाऱ्यांनी दिली आहे. (chlorine gas leak at pune)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी मधल्या जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज झाला होता. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली होती. सकाळच्या वेळेस व्यायामासाठी व पोहण्यासाठी अनेक जण जलातरण तलावात येत असतात. मंगळवारीही येथे नेहमीप्रमाणे वर्दळ होती. स्विमिंग पूलमध्ये पोहत असलेल्या 22 जणांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. तर, जलतरण तलावाच्या परिसरात क्लोरीन गॅस पसरल्याने काही मीटरपर्यंत नागरिकांना खोकला आणि गळ्याचा त्रास, श्वास घेण्यास त्रास होत होता. गॅस गळती झाल्यानंतर लगेचच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कासारवाडी स्विमिंग पूलाच्या समोरून वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले असून संबंधित व्यक्तींना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कासारवाडी इथं स्विमिंग पूल मध्ये क्लोरीन गॅस गळती मुळे अनेकांना त्रास झाला होता. त्यातील १० जणांना रुग्णालयात दाखल केले असून त्यातील १० वर्षीय मुलीला थोडा अधिक त्रास असल्याची माहिती क्रीडा अधिकाऱ्याने दिली आहे. तर संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.