चिमुकल्याला 2 वर्षे 22 भटक्या कुत्र्यांसोबत ठेवणाऱ्या आई-वडिलांना अटक, घरात सापडला 10 बॅगा कचरा

Pune child - Dog News​ : पोटच्या मुलाला 2 वर्ष कुत्र्यांसोबत कोंडून ठेवणाऱ्या लदोरीया यांच्या घरावर पुणे महानगर पालिकेने कारवाई केली आहे. या घरातून महापालिकेने 15 जिवंत कुत्र्यांची सुटका केली आहे. तर घरात 3 कुत्री मृतावस्थेत आढळून आलेत.

Updated: May 14, 2022, 03:25 PM IST
चिमुकल्याला 2 वर्षे 22 भटक्या कुत्र्यांसोबत ठेवणाऱ्या आई-वडिलांना अटक, घरात सापडला 10 बॅगा कचरा title=

पुणे : Pune child - Dog News : पोटच्या मुलाला 2 वर्ष कुत्र्यांसोबत कोंडून ठेवणाऱ्या लदोरीया यांच्या घरावर पुणे महानगर पालिकेने कारवाई केली आहे. या घरातून महापालिकेने 15 जिवंत कुत्र्यांची सुटका केली आहे. तर घरात 3 कुत्री मृतावस्थेत आढळून आलेत. या सगळ्या कुत्र्यांची रवानगी अ‍ॅनिमल शेल्टर होममध्ये करण्यात आली आहे. लदोरीया यांच्या घरातून 10 बॅगा कचरा सापडला आहे. मुलाला 22 कुत्र्यांसोबत डांबणाऱ्या आई-वडिंलाना पोलिसांनी अटक केली आहे. 

आई-वडिलांनी निर्दयीपणाचा कळसच केला. आपल्या पोटच्या मुलाला 18 भटक्या कुत्र्यांसोबत एका खोलीत तब्बल दोन वर्षे कोंडून ठेवले. या निर्दयी आई-बापाने मुलाचे लहानपण हिरावून घेतले. खेळण्या बागडण्याच्या वयात चिमुकला माणूसपण हिरावून बसला. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच खोलीत बंद असल्याने आणि सोबतच्या कुत्र्यांमुळे तो माणूस आहे हेच विसरुन गेला होता.  त्यामुळे मुलावर जे परिणाम होणार ते झालेत. ही संतापजनक घटना पुण्याच्या कोंडवा परिसरातील कुष्णाई इमारती घडली.

कुत्र्यांच्या सहवासात राहणाऱ्या चिमुकल्याची सुटका करण्यात आली आहे. कोंडवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले की, चाईल्ड लाईनच्या माध्यमातून या संतापजनक घटनेचा प्रकार पोलिसांना कळला. पोलिसांना हा प्रकार कळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोंडव्यातील कुष्णाई इमारतीमधील संबंधित खोलीजवळ पोलीस पोहोचले. घराच्या आतमधून कुत्र्यांच्या भूंकण्याचा खूप आवाज येत होता. घरात शिरणं पोलिसांना कठीण झालं होते. 

घराच्या आतमध्ये घाणीचं साम्राज्य होते. कुत्र्यांची विष्ठा ठिकठिकाणी पडली होती. संपूर्ण घरात दुर्गंधी होती. या दुर्गंधीत आणि 22 कुत्र्यांसोबत एक 11 वर्षांचा चिमुकला होता. मात्र त्याची अवस्था पोलिसांना देखील पाहावत नव्हती. मुलाची अवस्था दयनीय होती. आहार नसल्याने शरीर क्षीण झालं होतं. मुलाची वर्तणूक एखाद्या पशू प्रमाणे होती. मुलाला पाहाताच पोलिसांनी आणि चाईल्ड लाइनने मिळून तात्काळ त्या मुलाची सुटका केली. मुलाला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे. 

निर्दयी आई वडिलांना जेलची हवा

या मुलाच्या निर्दयी आई वडिलांना पोलिसांनी तात्काळ अटक केली.  स्थानिकांकडून मिळालेल्या माहिती नुसार या मुलाचे आई-वडील विक्षिप्त असल्याचे कळते आहे. मुलाच्या पालकांवर बाल संगोपन आणि संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.  या सगळ्या प्रकरणात सर्वात धक्कादायक माहिती चाईल्ड लाइनने दिली की,  हा मुलगा आक्रमक झाला आहे. तो अंगावर धावून देखील जायचा. इतकंच नव्हे तर त्यामुलाच्या शेजाऱ्यांनी मुलाला कुत्र्यांप्रमाणे चार पायावर चालताना देखील पाहिले.